24
पौलना विरोधमा खटला
पाच दिन नंतर प्रमुख याजक हनन्या, काही वडीलमंडळी अनी तिर्तुल्ल नावना एक वकील यासले लिसन कैसरियाले वना अनी त्यानी अधिकारीसना समोर पौलना विरूध्द आरोप करात.
त्याले बलावानंतर तिर्तुल्ल त्यानावर आरोप करू लागना, तो असा; “नामदार फेलिक्स महाराज, तुमनामुये आमले भलतीच शांती भेटेल शे अनी तुनी दुरदर्शीपणमुये या देशमा सुधारणा व्हई राहीनी. यामुये तिना आम्हीन सर्वी बाजुतीन अनी सर्व प्रकारतीन अनी सर्वीकडे आदर करतस. तरी तुमना आखो येळ वाया नही घालता तुले ईनंती करस की, मेहरबानी करीसन आमनं थोडसं ऐकी ल्या, हाऊ माणुस फक्त पीडा शे अस आमले दखास अनी हाऊ सर्व जगमाधला यहूदी लोकसमा बंड ऊठाडणारा शे अनी नासोरी पंथना पुढारी शे; यानी मंदिरले बी अपवित्र कराना प्रयत्न करा, त्याले आम्हीन धरं अनी आमना नियमशास्त्रप्रमाणे याना न्याय कराले आम्हीन दखी राहींतु; पण लुसिया सेनापतीनी ईसन मोठी जबरदस्ती करीसन याले आमना हातमाईन काढी लई गया.* यानी तुम्हीन चौकशी करशात तर ज्या गोष्टीसना आरोप आम्हीन त्यानावर करतस, त्या सर्वासबद्दल त्यानाकडतीनच तुमले समजी.” तवय यहूदी लोकसनी बी ह्यामा सहभागी व्हईसन सांगं की, हा, या गोष्टी असाच शेतस.
पौलनं भाषण
10 मंग अधिकारीनी बोलाकरता इशारा करा तवय पौलनी बोलाले सुरवात करी;
तुम्हीन बराच वरीस पाईन या लोकसना न्यायाधीश शेतस, हाई माले माहीत शे, म्हणीसन मी आनंदतीन मना बचावपक्ष मांडसु. 11 तुम्हीन स्वतः माहीती करू शकतस की, माले यरूशलेममा भजन कराकरता जाईन आखो बारापेक्षा जास्त दिन व्हयनात नही. 12 अनी मंदिरमा, सभास्थानमा किंवा कोणसंगे वाद करतांना किंवा शहरमा लोकसमा दंगा करतांना माले यहूदीसनी दखं नही; 13 ज्या गोष्टीसना दोषारोप त्या मनावर आत्ते करी राहीनात, त्यासले त्या आरोपसले साबीत करता ई नही राहीनं. 14 तरी येवढं तुमनाकडे कबुल करस की, जी वाटले ह्या खोटं म्हणतस ती वाटप्रमाणे जे जे नियमशास्त्रमा शे अनी जे संदेष्टासना लेखमा शे, त्या सर्वासवर ईश्वास ठिसन मी आमना पुर्वजसंना देवनी भक्ती करस. 15 अनी मी देववर तसाच ईश्वास ठेवस जसं स्वतः ह्या लोके ठेवतस की, चांगला अनी वाईट दोन्हीसनं बी पुनरूत्थान व्हई. 16 यामुये देवनाबद्दल अनी मनुष्यबद्दल मनं मन कायम शुध्द ठेवाना मी प्रयत्न करस.
17 मी बराच वरीस नंतर यरूशलेममा आपला लोकसले दानधर्म कराकरता अनी अर्पण कराकरता वनु; 18 अस करतांना त्यासनी माले मंदिरमा दखं की, मी मना शुध्दीकरणनी विधी करी राहींतु, मनासंगे लोकसनी गर्दी नव्हती, किंवा दंगा व्हई नही राहींता, 19 तरी तठे आशियाना कितलातरी यहूदी व्हतात; त्यासनं मना विरोधमा काय व्हतं तर त्यासनी तुमनापुढे ईसन मनावर आरोप लावाले पाहिजे व्हता; 20 किंवा यासनी तरी सांगानं की, मी धर्मसभानापुढे उभा व्हतु तवय मना कोणता आरोप यासले दखायना. 21 यासनामा उभा राहीसन, मरेलसना परत ऊठाबद्दल मना ईश्वास शे त्यानावरतीन मना न्याय आज तुमनापुढे व्हई राहीना.
22 फेलिक्सले ती शिक्षाना मार्गनी चांगलीच माहीती व्हती त्यामुये त्यानी खटला तहकुब करीसन सांगं, “लुसिया सेनापती ई तवय तुमना प्रकरणना निकाल लावसु.” 23 अनी त्यानी अधिकारीले हुकूम करा की यानावर रखवाली ठेवानी, तरी त्याले मोकळीक देवानी; अनी त्याना नातेवाईकसले त्यानी सेवा कराकरता मनाई करानी नही.
फेलिक्स अनी द्रुसिल्ला समोर पौल
24 मंग काही दिन नंतर फेलिक्स आपली यहूदी समाजनी बायको द्रुसिल्ला हिनासंगे वना, अनी त्यानी पौलले बलाईन ख्रिस्त येशुवरला ईश्वासबद्दल त्यानाकडतीन ऐकी लिधं. 25 तवय तुमनं चांगलं वागनं, स्वतःवर नियंत्रण अनी भावी न्याय यानाबद्दल तो भाषण करी राहींता तवय फेलिक्सनी घाबरीसन त्याले सांगं, “आते तु जाय, संधी सापडनी म्हणजे तुले बलावसु.” 26 आखो आपले पौल कडतीन पैसा भेटतीन अशी आशा बी त्यानी धरेल व्हती, यामुये त्याले परत परत बलाईन तो त्यानासंगे संभाषण करे.
27 पुढे दोन वरीस नंतर फेलिक्सना जागावर पुर्क्य फेस्त हाऊ वना; तवय यहूदी लोकसनी मर्जी राखाकरता फेलिक्स पौलले कैदखानामाच ठिसन गया.
* 24:7 काही मुळशास्त्रलेखमा हाऊ शास्त्रभाग सापडस नही 24:17 प्रेषित २१:१७-२८ 24:21 प्रेषित २३:६