27
पौलना रोमपावत जलप्रवास
जवय हाई ठरामा वनं की, आम्हीन जहाजमा बठीन इटली देशपावत जावानं तवय त्यासनी पौल अनी बाकीना बराच कैदीसले रोमी पलटनना युल्य नावना अधिकारी याना हातमा सोपामा वनं. तवय आम्हीन आशिया देशना किनारावरला बंदरसवरतीन जाणारं अद्रमुत्तीय नावना शहरना एक जहाजमा बठीन निंघनुत; तवय मासेदोनियामाधला थेस्सलनीक शहरना एक अरिस्तार्ख नावना माणुस आमनासंगे व्हता. दुसरा दिन आम्हीन सिदोनले पोहचनुत, तवय युल्यनी पौलवर मेहबानी करीसन त्याना मित्रसनी त्याले लागणाऱ्या वस्तु त्याले देवाले पाहिजे म्हणीसन त्यासनाकडे जावानी त्याले परवानगी दिधी. मंग आम्हीन तठेन निंघनुत तवय वारा समोरना व्हता म्हणीसन सायप्रस बेटना आडतीन गवुत. नंतर किलिकिया शहर अनी पंफुल्या शहर यासनासमोरना समुद्रतीन जाईसन आम्हीन लूक्या प्रांतना मुर्या बंदरवर पोहचनुत. तठे एक इटलीले जाणारं अस एक आलेक्सांद्रियानं जहाज अधिकारीला भेटनं त्यावर त्यानी आमले चढावं.
मंग बराच दिन बागेबागे जाता जाता मोठी मेहनततीन कनिदा बेटसमोर पोहचनु पण वारा पुढे जावु दि नही राहींता, म्हणीसन आम्हीन क्रेत बेट वरतीन सलमोन बेटसमोर गवुत. मंग मोठी मेहनततीन आम्हीन त्याना काठ धरीन सुरक्षित बंदर*वर पोहचनुत; त्यानाजोडे लसया शहर व्हतं.
तवय आमले बराच दिन व्हवामुये अनी तितलामा उपासना दिन बी व्हई गयात म्हणीसन त्या येळले समुद्रमातीन जाणं संकटमय व्हतं, म्हणीसन पौलनी त्याले अशी सुचना करी की, 10 “अहो भाऊसवन, या समुद्रप्रवासमा फक्त मालना अनी जहाजनाच नही तर आपला जीवना बी नुकसान अनी मोठी हानी व्हई, अस माले दखास.” 11 तरी अधिकारीनी पौलना सांगनाकडे लक्ष न देता जहाज चालाडनारा अनी जहाजना मालक यासनाकडे जास्त लक्ष दिधं. 12 ते बंदर हिवाळामा राहवाकरता सुरक्षित नव्हतं म्हणीसन बराच जणसनी सल्ला दिधा की, तठेन निंघा अनी जमी तर क्रेतामाधलं फेनीके बंदरमा जाईसन तठे हिवाळा पुरा कराना; कारण या बंदरनं तोंड नैर्ऋत्यकडे अनी वायव्यकडे शे.
समुद्रमा वादय ऊठस
13 मंग दक्षिण दिशाकडला वारा मंद वाही राहींता त्यामुये आपला बेत बराबर शे अस समजीन त्या तठेन नांगर उचलीन काठ धरीन क्रेत बेटना बाजुतीन गयात. 14 पण थोडा येळमा उत्तरपुर्व नावना तुफानी वारा तिकडतीन सुटना. 15 त्यामा जहाज सापडीन वाराना विरोधमा पुढे चाली नही राहींत म्हणीसन आम्हीन प्रयत्न करानं सोडीसन जठे वारा लई जाई तठे वाहत गवुत. 16 मंग कौदा नावना एक धाकला बेट वरतीन जातांना आम्हीन मोठा प्रयत्न करीसन नावले आपला ताबामा करी लिधी. 17 ती वर लीधी मंग जहाज हाकलनारासनी वस्तुसले खाल उतारीसन जहाजले खालपावत आवळीन बांधी लिधं. ती सुर्ती नावना बेटना वाळूमा फशी अशी त्यासले भिती वाटनी म्हणीसन त्यासनी पाल उतारीसन जहाजले तसच खोल पाणीमा राहु दिधं. 18 तवय वादयमुये आमना भलताच हाल व्हवु लागनात त्यामुये दुसरा दिन त्या माल फेकु लागनात. 19 अनी तिसरा दिन त्यासनी आपला हाततीन जहाजना अवजारं टाकी दिधात. 20 मंग बराच दिन सुर्य अनी तारा बी दिसनात नही अनी वादयना जोर आमले भलताच भासना, त्यामुये शेवट आमनी जगानी आशा अगदी संपीच गई.
21 नंतर बराच दिन सर्वाजन उपाशीच व्हतात; तवय पौल त्यासनामा उभा राहीसन बोलना, “भाऊसवन, तुम्हीन मनं ऐकाले पाहिजे व्हतं, क्रेत बेट वरतीन निंघालेच नको पाहिजे व्हतं, म्हणजे या हाल अनी हानी व्हती नही. 22 तर मी आते तुमले सांगस की हिम्मत धरा; तुमनामाधला कोणाच जिवना नाश व्हवाव नही, जहाजना नाश मात्र व्हई. 23 कारण ज्याना मी शे अनी ज्यानी सेवा मी करस त्या देवना स्वर्गदूत कालदिन रातले मनाजोडे उभा राहीसन बोलना, 24 ‘पौल भिऊ नको! तुले कैसरपुढे उभंच राहनं शे; अनी तुनासंगे ज्या जहाजमातीन जाई राहीनात त्या सर्व देवनी तुले देयल शे.’ 25 यामये भाऊसवन, हिम्मत धरा! मना देववर माले भरोसा शे की, जसं त्यानी माले सांगं तसच व्हई. 26 तरी आपले एक बेटवर पडनं पडी.”
27 नंतर चौदावी रातले भुमध्य समुद्रमा आम्हीन इकडे तिकडे हेलकावा खात राहींतुत तवय मध्यरातना येळले खलाशीसनी अंदाज करा की, आपण एखादा किनारानाजोडे ई राहीनुत. 28 जवय त्यासनी बुडीत टाकात तवय एक शे वीस फुट खोल पाणी भेटनं, थोडं पुढे जाईसन परत बुडीत टाक तवय नव्वद फुट खोल पाणी भेटनं. 29 तवय आपण कदाचित खडकवर आदळसुत अशी भिती त्यासले वाटनी म्हणीसन त्यासनी जहाजना मांगली बाजुतीन चार नांगर सोडात अनी आतुरतातीन दिन उगानी प्रार्थना करी राहींतात. 30 मंग पुढला भागतीन नांगर सोडानं निमित्त करीसन खलाशीसनी खाल नाव सोडीसन जहाजमातीन पळाले दखी राहींतात. 31 तवय पौल, अधिकारी अनी शिपाईसले बोलना, “ह्या जहाजमा नही राहीनात तर तुमनं रक्षण व्हवावु नही.” 32 तवय शिपाईसनी नावनी दोरी कापीन जहाजले जाऊ दिधं.
33 नंतर दिन उगाना येळले पौल सर्वासले जेवण खावाबद्दल ईनंती करीसन बोलना, “आज चौदा दिन तुम्हीन वाट दखत उपाशी राहेल शेतस, काहीच खादं नही.” 34 यामुये मी ईनंती करस की जेवण करी ल्या; त्यामुये तुमना जीव वाची राही; तुमनामझारना एकना बी डोकाना केसना नाश व्हवाव नही. 35 अस म्हणीसन त्यानी भाकर लिसन सर्वासना समोर देवना आभार मानात, अनी ती मोडीन तो खावु लागना. 36 मंग त्या सर्वासले धीर ईसन त्या बी जेवण करू लागनात. 37 त्या जहाजमा आम्हीन सर्वाजन दोनशे शाहत्तर जण व्हतुत. 38 जेवण खाईसन तृप्त व्हवानंतर त्यासनी समुद्रमा गहु टाकीन जहाज हलकं करं.
जहाजना नाश
39 दिन उगानंतर बी ती जागा कोणती हाई त्यासनी वळखं नही; पण एक खाडी अनी तिना सपाट किनारा त्यासले दखायना अनी जमनं तर त्यानावर जहाज लावानं असा त्यासनी ईचार करा. 40 मंग नांगर कापी टाकीसन ते त्यासनी समुद्र किनारले राहु दिधं, त्याच येळले कैदीसना बंधनं ढिला करात. अनी जहाजना पुढला पाल वारावर सोडीन सपाटीकडे वाट धरी. 41 या समुद्रमा वर येल जमीनले जहाज लागावर त्यासनी त्याले आखो पुढे घुसाडं अनी पुढला भाग फसीन गच्च बठना अनी मांगला भाग लाटासना जोरमुये फुटाले लागना.
42 मंग कोणीच कैदीनी पोहीसन पळी जावाले नको म्हणीसन त्यासले मारी टाकानं अस शिपाईसनी ठरायं. 43 तरी पौलले वाचाडानं अशी ईच्छातीन अधिकारीनी त्यासनी करेल बेतले आडवा वना अनी त्यानी हुकूम दिधा की ज्यासले पोहता येस व्हई, त्यासनी पहिले उडी मारीन काठवर जावानं; 44 तवय बाकीनासनी कोणी फळीसवर तर कोणी जहाजवरला कोणती बी वस्तुवर बठीन जावानं; असा सर्वाजन काठवर सुरक्षित पोहचनात.
* 27:8 सुरक्षित बंदर हाई एक बंदरनं नाव शे 27:37 दोनशे शाहत्तर काही शास्त्रलेखमा दोनशे पंच्याहत्तर लिखेल शे