28
मिलिता शहरमा पौल
असा आम्हीन वाचीन निंघनुत तवय त्या बेटनं नाव मिलिता से अस आमले समजनं. तठला आदिवासी लोकसनी आमनावर भलताच उपकार करात; म्हणजे पाऊस अनी गारठा व्हता म्हणीसन त्यासनी शिकोटी चेटाडीन आमना सर्वासना पाहुणचार करा. तवय पौलनी काटक्यासनी मोळी आणीसन शेकोटीवर टाकी, इतलामा तठेन गरमीमुये एक साप बाहेर निंघीसन पौलना हातले वेटाळा मारीन लटकी गया. त्या सापनी त्याना हातले लटकेल दखीन, आदिवासी लोके एकमेकसले बोलनात, “हाऊ माणुस हत्यारा शे, हाऊ समुद्रमा वाचना तरी न्यायदेवता त्यालु वाचु देवाव नही.” त्यानी तर त्या सापले ईस्तवमा झटकीन टाकं अनी त्याले काहीच इजा व्हयनी नही. तो सुजी जाई नहीतर अचानक मरी जाई अशी त्यासनी वाट दखी, अस बराच येळ वाट दखानंतर त्याले काहीच व्हयनं नही, अस दखीन त्या आपलं मत बदलीन बोलनात, “हाऊ कोणतरी देव शे!”
तठे त्या बेटना पुब्ल्य नावना एक मुख्य अधिकारी व्हता त्यानी जमीन आसपासच व्हती; त्यानी आमनं आगतस्वागत करीसन तिन दिन आदरतीन पाहुणचार करा. तवय अस व्हयनं की, पुब्ल्याना बाप तापमुये अनी आवरक्तमुये आजारी पडेल व्हता; त्यानाकडे मझार जाईसन पौलनी प्रार्थना करी अनी त्यानावर हात ठिसन त्याले बरं करं. हाई व्हवानंतर त्या बेटवर ज्या दुसरा लोकसले रोग व्हता त्या बी त्यानाकडे ईसन बरा व्हयनात. 10 तवय त्यासनी आमना बराच प्रकारतीन सन्मान करा अनी आम्हीन निंघनुत तवय आमले गरज व्हती असा सर्व वस्तु जहाजवर भरी दिध्यात.
मिलिता ते रोम प्रवास
11 तीन महीनानंतर आलेक्सांद्रियानं जुळा देव या निशाणना एक जहाज हिवाळा घालाकरता त्या बेटजोडे राहेल व्हतं त्यामा बठीन आम्हीन निंघनुत. 12 मंग सुराकूस आठे पोहचंनुत अनी तठे आम्हीन तीन दिन राहीनुत. 13 तठेन फिरीसन आम्हीन रेगियोनाले वनुत अनी पुढला दिन दक्षिण दिशाकडतीन वारा सुटावर दोन दिन नंतर आम्हीन पुत्युला शहरले पोहचनुत. 14 तठे आमले ईश्वासु बंधुजन भेटनात त्यासनी त्यासना घर आठवडा भर रावानी आमले ईनंती करी, असा आम्हीन रोमपावत वनुत. 15 तठला ईश्वासु बंधुजन बी आमनाबद्ल ऐकीन अप्पियानी बाजारपेठ अनी तीन उतारशाळा आठपावत आमले भेटाले वनात; त्यासले दखीन पौलनी देवना उपकारस्मरण करात अनी त्याले धीर वना.
पौल रोम शहरमा
16 आम्हीन रोम शहरमा गवुत तवय पौलले त्यानावर पहारा करनारा शिपाईससंगे येगळं रावानी परवानगी दिधी.
17 मंग अस व्हयनं की, तीन दिन नंतर पौलनी यहूदीसना ज्या मुख्य माणसे व्हतात त्यासले एकत्र बलायं, त्या एकत्र येवावर तो त्यासले बोलना, मना इस्त्राएली भाऊसवन, मी आपला लोकसना विरोधमा किंवा पुर्वजसंना संप्रदायना विरोधमा काहीच करं नही तरी माले यरूशलेममा कैदी करीसन रोमी लोकसना हातमा देवामा वनं. 18 त्यासनी चौकशी करावर मनाकडे मरणदंडना योग्य असा काहीच दोषारोप नव्हता म्हणीसन त्या माले सोडाले दखी राहींतात. 19 पण यहूदी लोकसनीच विरोध करामुये कैसर राजाकडे न्याय मांगनं माले भाग पडनं; तरी माले आपला लोकसवर काय दोषारोप कराना व्हता अस नही. 20 यानाकरता तुमनी भेट लिसन तुमनासंगे भाषण करावं म्हणीसन तुमले बलावं, इस्त्राएलना आशामिळता मी हाई साखळघाई बांधेल शे.
21 त्यासनी त्याले सांगं, “तुनाबद्दल यहूदीया मातीन आमले कोणतच पत्र वनं नही किंवा बंधुजनसपैकी तुनाबद्दल काहीच प्रतिकुल बातमी आनी नही किंवा काय सांगं नही. 22 तरी तुना ईचार काय शेतस ते तुनाकडतीन ऐकी लेवानं, हाई आमले योग्य वाटस; कारण हाऊ पंथनाबद्ल सांगा तर लोक त्यानाविरोधमा सर्वीकडे बोलतस, हाई आमले माहीत शे.”
23 तवय त्यासनी एक दिन पौलले निवडीन दिधा अनी हाई त्याले सांगा नंतर त्या दिन बराच लोके तो थांबेल व्हता तठे वनात; त्यासले देवना राज्यबद्दल साक्ष देवाकरता अनी येशुबद्दल मोशेना नियमशास्त्रवरतीन अनी संदेष्टासना लेखवरतीन त्यासनी खात्री पटाकरता तो सकायपाईन संध्याकायपावत त्या विषयसनी फोड करी राहींता. 24 त्यानी जे सांगं त्यावर बराच जणसनी ईश्वास ठेवा अनी बाकीना बराच जणसनी ठेवा नही. 25 त्यासनं आपसमा एकमत व्हई नही राहींतात म्हणीसन त्या ऊठीसन जावु लागनात, तवय पौलनी त्यासले एक वचन सांगं, पवित्र आत्मा यशया संदेष्टानाकडतीन तुमना पुर्वजसंसंगे बोलना ते ठिकच बोलना; 26 ते अस;
या लोकसकडे जाईन सांगा की,
तुम्हीन ऐकशात तर खरं, पण समजावुत नही,
अनं दखशात तर खरं, पण तुमले दखावनार नही;
27 कारण या लोकसनं अंतःकरण जड व्हयेल शे;
त्या कानसघाई मंद ऐकतस;
अनी आपला डोया त्यासनी बंद करेल शेतस,
यानाकरता की त्यासनी डोयासघाई दखाले नको,
कानसघाई ऐकाले नको,
मनघाई समजाले नको,
त्यासनी वळाले नको,
अनी मी त्यासले बरं कराले नको;
28 म्हणीसन तुमले माहीत असाले पाहिजे की हाई देवनं तारण गैरयहूदी लोकसकडे धाडेल शे; अनी ते त्या ऐकतीन. 29 तो अस बोलना त्यानानंतर यहूदी लोके आपआपलामाच भलताच वाद करत निंघणात.*
30 पौल आपला भाडाना घरमा पुरा दोन वरीस राहीना, अनी ज्या त्यानाकडे ई ऱ्हायेत त्या सर्वासनं तो स्वागत करे. 31 तो बिना अडथळाना, हिम्मत धरीसन देवना राज्यनी घोषणा करे अनी प्रभु येशु ख्रिस्तबद्दलन्या गोष्टी शिकाडे.
28:19 प्रेषित २५:११ * 28:29 काही शास्त्रलेखमा हाई वचन दखास नही