पौलाने लिहिलेले रोमकरास पत्र
पौलनी लिखेल रोमकरसले पत्र
वळख
रोमकरसले पत्र जवळजवळ प्रेषित पौलनी ५४-५८ सालमा येशु ख्रिस्तना जन्मनंतर लिखेल शे. पौलनी अजुन पावत रोमना प्रवास करेल नव्हता. यामुये त्यानी हाई पत्र रोममा ख्रिस्ती लोकसले माहिती देवाकरता धाडात. त्यानी यहूदी अनं गैरयहूदी या दोन्हीसले करिंथ शहरमाईन पत्र लिखेल व्हतं. त्या येळले तो तठे राही राहिंता. पौलनी लिखा त्यामुये पुरा राष्ट्र येशु ख्रिस्तवर१६:२६ विश्वास अनी आज्ञा पाळु शकतीन.
रोमनं पुस्तक प्रत्येक ठिकाणी अनं प्रत्येक येळले ख्रिस्ती लोकसकरता एक महत्वपुर्ण पुस्तक शे, कारण पौल स्पष्टपणतीन अनं चांगलाप्रकारतीन समजावस की, आम्हीन येशु ख्रिस्तना उध्दारनाविषयी सांगु शकतस, पौलनी येशु ख्रिस्तनं शुभवर्तमानले जुना नियमासले बी जोडात, काही विद्वानासना मत शे की, पुस्तकमा सर्वासमा महत्वपुर्ण पुस्तक शे. १:१६ जे सांगस, “माले शुभवर्तमाननी काहीच लाज नही, कारण हाई सर्वासना उध्दारकरता परमेश्वरनी शक्ती शे, ज्या मानतस; पहिले यहूदीकरता, मंग त्यासनाकरता ज्या गैरयहूदी शेतस. रोम १–१२ पहिला भाग धर्मशास्त्री शे, अनी दुसरा भाग १३–१५ मा ख्रिस्ती जिवनाकरता व्यावहारिक निर्देश शे.”
रूपरेषा
१. पौल सामान्य रूपतीन आपला परिचय दिसन आपला पत्रना सुरवात करस अनी सांगस की, तो कोणाकरता लिखी राहिना शे. १:१-१५
२. त्यानंतर तो येशु ख्रिस्तनाद्वारा मानवजातीनी स्थिती अनी उध्दारनाविषयमा लिखस १:१६–११:३६
३. त्यानानंतर पौल ख्रिस्ती जिवन जगाकरता व्यावहारिक निर्देश देस. १२:१–१५:१३
४. तो रोमना १६ अध्यायमा लोकसले बराच शुभेच्छा दिसन रोमनी शेवट करस.
1
प्रेषित व्हवाकरता बलायेल, देवना सुवार्ताकरता येगळा करेल ख्रिस्त येशुना दास, पौल याना कडतीन; देवनी त्यानाबद्दल, पहिलेच आपला संदेष्टासकडतीन, पवित्र शास्त्रलेखमा अभिवचन देयल व्हतं. ते त्याना पोऱ्याबद्दल शे, अनी जो शारीरिक रूपमा दावीदना कुळमा जन्मले वना. अनी पवित्र आत्माना दृष्टीतीन मरेलमातीन परत ऊठामुये, तो सामर्थ्यतीन देवना पोऱ्या ठराई गया; तो खिस्त येशु आपला प्रभु शे. त्यानाद्वारा आमले कृपा अनं प्रेषितपद हाई भेटेल शेतस, यानाकरता की, सर्व राष्ट्रसमा त्याना नावकरता ईश्वासतीन आज्ञापालन व्हवाले पाहिजे. त्यानामा तुम्हीन बी ज्या रोम शहरमा राहतस, येशु ख्रिस्तना व्हवाकरता बलायेल शेतस. रोममाधला तुमले सर्वासले, देवना प्रितीमाधला, अनी त्यासले आपला लोकं व्हवाकरता बलायलेसले;
देव आपला पिता अनं आपला प्रभु येशु ख्रिस्त यानाकडीन तुमले कृपा अनं शांती भेटो.
धन्यवादनी प्रार्थना
मी तुमनामाधला सर्वासकरता, पहिले येशु खिस्तनाद्वारा मना देवना उपकार मानस. कारण तुमना ईश्वासबद्दल सर्वा जगमा ऐकामा ई ऱ्हाईनं. मी देवना पोऱ्याना सुवार्तामा मना आत्माघाई ज्यानी सेवा करी ऱ्हायनु, तो देव मना साक्षी शे की, मी कायम मनी प्रार्थनामा तुमनी आठवण करस; 10 अनी हाई प्रार्थनामा ईनंती करस की, आते देवनी ईच्छातीन तुमनाकडे मनं येणं व्हावाले पाहिजे म्हणीसन मना मार्ग मोकळा व्हवाले पाहिजे. 11 कारण तुमले सामर्थ्य भेटाले पाहिजे म्हणीसन तुमले काही अध्यात्मिक कृपादान देवाणं यानाकरता मी तुमले भेटासाठे उत्सुक शे; 12 म्हणजे तुमना अनी मना ईश्वासतीन आपले एकमेकसले म्हणजे माले तुमनाबद्दल अनी तुमले मनाबद्दल समाधान व्हवाले पाहीजे. 13 भाऊसवन अनी बहिणीसवन, माले जसं बाकीना गैरयहूदीसमा ईश्वासनारासनं फळ भेटनं, तसच तुमनामा काही फळ भेटाले पाहिजे म्हणीसन, मी तुमनाकडे यावं, असं बराचदाव ठरायं व्हतं, पण आतेपावत अडथळा वनात, ह्यानाविषयी तुम्हीन अज्ञानी रावाले पाहिजे अशी मनी ईच्छा नही. 14 मी ग्रीक अनं ग्रीक नही असा, ज्ञानी अनं अज्ञानी, या सर्वसना देणेकरी शे. 15 म्हणीसन मी मनाकडतीन रोम शहरमा तुमले सर्वासले सुवार्ता सांगाले उत्सुक शे.
सुवार्तानं सामर्थ्य
16 कारण माले सुवार्ता सांगानी लाज वाटस नही, तर ती ईश्वास ठेवनारा प्रत्येकना तारणकरता, पहिले तर यहूदीले अनी गैरयहूदीले बी ते देवनं सामर्थ्य शे. 17 कारण सुवार्तामुये देवनं नितीमत्व ईश्वासतीन ईश्वासकरता प्रकट व्हस. कारण असा शास्त्रलेख शे की, “नितीमान ईश्वासतीन जगी.”
मनुष्य जातीना पाप
18 वास्तविकमा ज्या लोकेसना पापं अनी दुष्टता, सत्य दाबतस, असा लोकसना दुष्टतावर देवना क्रोध स्वर्गमातिन प्रकट व्हस. 19 कारण देवना प्रगट व्हनार ज्ञान त्यासनामा दखाई येस; कारण देवनी ते प्रगट करेल शे.
20 कारण जगना उत्पत्तिपाईन करामा येल गोष्टिसवरीन त्यानं सर्व काळनं सामर्थ्य, अनी देवपन ह्या त्याना अदुश्य गोष्टी समजी राहिनात अस स्पष्ट रितीतीन दखास, म्हणीसन त्यासनं कोणतच निमित्त नही शे. 21 कारण त्यासनी देवले वळखावर बी त्यासनी त्यानं देव म्हणीसन जे त्यानं गौरव शे तो त्यासनी करा नही, त्याना उपकार मानात नही. पन त्या आपलाच ईचारसमा ईचारहिन व्हयनात, अनी त्यासनं निर्बुध्द मन अंधकारमय व्हयनं. 22 त्या स्वतःले ज्ञानी समजतस पण त्या मुर्ख शेतस. 23 अनी त्यासनी अविनाशी देवना गौरव कराना सोडिसन, नाश करनारा माणुस, पशु, पक्षी, सरपटणारा साप यासना सारखी प्रतिमा बनाडी.
24 याकरता देवनी त्यासले त्यासना मनमाधलं वाईट वासना अनं अशुध्दतेना स्वाधीन सोडी दिधं अनी त्यासनी एकमेकसना शरिरना अनादर कराले पाहिजे म्हनीन त्यासले मोकळं सोडं. 25 त्यासनी देवना सत्य सोडिसन असत्य लिधं, अनी जग निर्माण करनारा देवना ऐवजी त्यासनी निर्मितिनी वस्तुनी उपासना अनी सेवा करी, तरी तो निर्माणकर्ता तर युगानुयुग धन्यवादित देव शे. आमेन.
26 ह्या कारणमुये देवनी त्यासले वाईट वासनासना स्वाधिन करी दिधं; त्यासना बायासनी बी त्यासना नैसर्गिक उपभोग सोडिसन अनैसर्गिक उपभोगना स्विकार करा. 27 तसच पुरूषनी बी स्त्रीयासनासंगे योन संबध ठेवानं बाजुले ठेयात अनं त्या एकमेकसनाविषयी वासनाघाई पेटीसन निंघनात पुरूषससनी पुरूषसंगे अनुचित कर्म करात अनी आपला ह्या निर्लज्ज कृत्यासमुये त्यासले त्यासनामा हाई शिक्षा भेटनी.
28 अनी त्यासले देवले ध्यानमा ठेवाले नही आवडामुये, देवनी त्यासले येगयेगळ्या गोष्टी करत ऱ्हावाले वाईट मनना स्वाधिन करं.
29 त्या सर्वा अनितीतिन, दुष्टतातिन, लोभतिन, अनी अनैतीकतातीन भरेल राहिसन त्या जळन, खुन, भांडानं, हेवा, दुष्ट भाव ह्यासपाईन पुरा भरेल, ह्या गोष्टि करनारा, चुगलखोर बनी गयात. 30 एकमेकसना निंदक, देवले दुष्ट म्हणनारा, टवाळखोर, गर्विष्ट, मी मोठा माणुस शे असा दखाडनारा, वाईट गोष्टी शोधनार, मायबापनी आज्ञा न माणनारा बनी गयात, 31 निर्बुध्द, वचन भंग करनारा, दया न करनारा, निर्दयी व्हयनात. 32 अनी ह्या गोष्टि करनारा मराना शिक्षाकरता पात्र शेतस, हाऊ देवना नियम त्यासले समजी राहिनं, पन ते त्या अस कराकरता, त्या असा गोष्टी करनारासले साथ बी देतस.
1:13 प्रेषित १९:२१ 1:16 मार्क ८:३८ 1:21 इफिस ४:१७,१८