2
देवना न्याय
1 दुसराले दोष लावनारा, अरे मनुष्य, तु कोण बी व्हशी, तरी तुनाकडे उत्तर नही; कारण तु ज्या गोष्टिसमा दुसरासले दोष लावस, त्यानामा तु स्वतःले दोषी ठरावस; कारण दोष लावनार तु बी त्याच गोष्टी करस.
2 पन आपलाले तर माहितच शे की, असा गोष्टी करनारासना न्याय, देवना सत्य प्रमाणतीन न्यायनिवाडा व्हई.
3 तर असा गोष्टी करनाराना न्याय करनारा, अनी स्वतःच त्याच गोष्टी करनारा, अरे मनुष्या, तु स्वतः देवना न्यायनिवाडामा सुटी जाशी असं समजस का?
4 किंवा देवनी दया तुले पश्चातापनाजोडे लैजाई ऱ्हायनी हाई न वळखीन तु त्याना ममताना, क्षमाशिलताना अनी सहनशीलताना धन तुच्छ मानी ऱ्हाईनास का?
5 पन तु आपला हट्टपनतीन अनं आपला पश्चात्तापहीन मनतीन आपला स्वतःकरता देवना क्रोध अनं खरा न्याय प्रकट होवाना दिनकरता साठाडीन ठेई ऱ्हाइना शे.
6 देव प्रत्येकले ज्याना त्याना कृत्यप्रमाणे प्रतिफळ दी.
7 म्हणजे ज्या ईश्वासमा धीर धरीसन चांगले कार्य करत ऱ्हातस अनं देवकडतीन गौरव, सन्मान अनं अनंत जिवन हाई मियाडाले दखतस त्यासले तो सार्वकाळना जिवन दी;
8 परंतु ज्या फुट पाडणारा सत्यले न मानीसन अनितीले मानतस त्यासनावर क्रोध अनं कोप,
9 संकट अनं क्लेश हाई येतीन. म्हणजे दुष्कृत्य करनारा मनुष्य, पहिले यहूदी अनी मंग गैरयहूदी, असं प्रत्येकना जिववर त्या येतीन.
10 पन चांगला कार्य करनारा प्रत्येक पहिला यहूदीले अनी गैरयहूदीले गौरव, सन्मान, अनं शांती बी देवकडतीन भेटी.
11 कारण देव भेदभाव न सर्वासना न्याय करस.
12 तर मोशेना नियमशास्त्रले सोडिसन राहनारा गैरयहूदी, जितलासनी पाप करेल व्हई, त्या नियमशास्त्रशिवाय नाश पावतिन, अनी मोशेना नियमशास्त्रले धरीसन चालणारा यहूदी, जितलासनी जर पाप करेल व्हतीन, तर त्यासना न्याय नियमशास्त्रमातिन व्हई.
13 कारण नियमशास्त्रले ऐकनारा देवनापुढे नितीमान शे अस नही, पन नियमशास्त्रले धरीसन चालनारा नितिमान ठरतीन.
14 कारण ज्यासले नियमशास्त्र नही, असा गैरयहूदी जवय स्वभावमा; नियमशास्त्रना गोष्टि करतस तवय त्यासले नियमशास्त्र नही, तरी त्या स्वतः स्वतःनाकरता नियमशास्त्र बनतस;
15 अनी एकमेकसमाधला त्यासना ईचार जवय एकमेकसवर आरोप करतस, किंवा एकमेकसना समर्थन करतस, अनी त्यासना मन बी त्यासना जोडले साक्ष देतस तवय त्या त्यासना मनवर लिखेल नियमशास्त्रना परिनाम दखाडतस.
16 जवय देव मना सुवार्ताप्रमाणे, तवय मानससना गुप्त ईचारसना न्याय खिस्त येशु कडतीन करी त्या दिनले हाई दखावामा ई.
यहूदी अनी नियमशास्त्र
17 आते जर, तु स्वतःले यहूदी म्हणीन, नियमशास्त्रना आधार लेस, अनी देवना अभिमान मिरावस;
18 तु देवनी ईच्छा समजस अनी चांगल्या गोष्टीसनी आवड धरस, कारण तुले नियमशास्त्रमाईन शिक्षण मिळेल शे;
19 अनी तुनी खात्री शे की, तुच आंधयासले वाट दखाडनारा शे, ज्या आंधारमा शेतस त्यासना उजाया,
20 अपुरीबुध्दीना लोकसना शिक्षक अनी भोळा लोकसना गुरू शे; कारण तुले खात्री शे की, नियमशास्त्रमा ज्ञानना अनं सत्यना स्वरूप शे;
21 तर मंग जो तू दुसरासले शिकाडस तोच तु स्वतःले शिकाडस नही का? चोरी करानी नही, असे तु जे गाजाडीसन सांगस तोच तु चोरी करस का?
22 व्यभिचार करानी नही, असं जे तु सांगस तोच तु व्यभिचार करस का? जे तु मुर्तिना विटाळ मानस तोच तु देवळसले लुटस का?
23 जर तु देवना नियमशास्त्रना अभिमान मिरावस तोच तु नियमशास्त्रना उल्लंघन करीसन देवना अपमान करस का?
24 कारण शास्त्रमा लिखेल प्रमाने, “देवना नावनी गैरयहूदीमा तुनामुये निंदा व्हई ऱ्हायनं.”
25 कारण जर तु नियमशास्त्रना आचरण करं तर सुंता खरच उपयोगी शे; पन त्यामा तु जर नियमशास्त्रना उल्लंघन करस तर तुनी सुंता व्हयेल ऱ्हाईसन बी ती नही व्हयेलसारखं शे.
26 म्हणीन कोणी गैरयहूदी माणुस जर सुंता न व्हयेल ऱ्हाईसन बी, नियमशास्त्रना नियम पाळस तर त्यानी सुंता न व्हईन बी सुंता व्हयनी अस गनामा येवावु नही का?
27 अनी शरिरमा सुंता न व्हयेल कोणी जर नियमशास्त्रना नियम पाळत व्हई, तर ज्या तुले शास्त्रलेख अनं सुंताविधी मिळेल ऱ्हाईसन बी तु नियमशास्त्रना उल्लंघन करस त्यामा तुना तो न्याय कराऊ नही का?
28 कारण बाहेरतीन ज्या नुस्ता यहूदी शेतस त्या यहूदी नहीत; किंवा बाहेरतीन नुस्ता शरिरमा सुंता शे ती खरच सुंता नही.
29 कारण जो मनाने यहूदी शे तो खरा यहूदी शे; अनी ज्याना मननी सुंता व्हयेल शे, अनी हाई देवना आत्माना कार्य शे, आध्यात्मिक अनुसरून शे, शास्त्रलेखले अनुसरून नही, अशी जी अंतःकरणनी सुंता शे ती सुंता शे. अनी त्यानी प्रशंसा मनुष्यकडतीन नही परंतू देवकडीन व्हई.