5
हनन्या अनी सप्पीरा
1 पण हनन्या नावना कोणी एक माणुस व्हता अनी त्यानी बायको सप्पीरा, यासनी आपली जमीन ईकी.
2 मंग त्यानी येल किम्मतमाईन काही भाग बायकोसंगे एकमत करीसन बाजुले काढी ठेवा अनं काही भाग प्रेषितसना पायजोडे आनीसन ठि दिधा.
3 तवय पेत्र बोलना, हनन्या, सैताननी तुना मनमा हाई गोष्ट का बरं घाली देयल शे की, तु पवित्र आत्मानासंगे लबाडी करानं अनी जमीनना किम्मतमातीन काही भाग मांगे ठेई लेवाना?
4 जोपावत जमीन ईकायेल नव्हती तवय ती तुनीच नव्हती का? अनी ईकाई जावावर बी तीनी किंमत तुनाजोडे नव्हती का? तु आपला मनमा अस कराना ईचार का बरं करा? तु माणुसनासंगे नही तर देवनासंगे लबाडी करेल शे!
5 हाई शब्द ऐकीसन हनन्या खाल पडना अनी जिव सोडी दिधा, हाई सर्व ऐकणारासले भलती भिती वाटनी.
6 मंग तरूण पोऱ्यासनी मझार ईसन त्याना शरिरले कापडमा गुंढाळीन बाहेर लई जाईसन पुरी दिधं.
7 मंग जवळजवळ तीन तासनंतर त्यानी बायको मझार वनी पण हाई घडेल घटनाबद्दल तिले काहीच माहीत नव्हतं.
8 पेत्र तिले बोलना, “माले सांगं, एवढालेच तुम्हीन जमीन ईकी का?”
तिनी उत्तर दिधं, हा, एवढालेच.
9 पेत्र तिले बोलना, “का बरं तु अनी तुना नवरानी मिळीसन प्रभुना आत्मानी परिक्षा लेवानं ठरायं? दख, ज्यासनी तुना नवराले पुरी दिधं त्यासना पाय दारजोडेच शेतस; त्या तुले बी उचलीसन बाहेर लई जातीन!”
10 तवय लगेच तिनी त्यासना पायजोडे पडीसन जिव सोडी दिधा अनी तरूण पोऱ्यासनी मझार ईसन तिले मरेल दखं, अनं बाहेर लई जाईसन तिना नवरानाजोडे पुरी दिधं.
11 यामुये सर्व मंडळीले अनं हाई ऐकणारा सर्वासले भलतीच भिती वाटनी.
चमत्कार अनी आश्चर्यकर्म
12 प्रेषितसना हाततीन लोकसमा बराच चमत्कार अनी आश्चर्यकर्म घडी राहींतात अनी त्या सर्व एकचित्त व्हईन शलमोननी देवडीमा एकत्र जमेत;
13 पण बाकीना लोकसमातीन त्यासनामा सामील व्हवानी कोणीच हिम्मत व्हयनी नही, तरी बी सर्व लोके त्यासले थोर मानेत.
14 प्रभुवर ईश्वास ठेवणारा माणसे अनी बायासनी गर्दी एकसारखी त्यासनामा मिसळतच जाई राहींती.
15 आठपावत की, लोके रोगीसले वाटवर अनीसन खाटलासवर अनी बिछानासवर झोपाडी देयत; यानाकरता की, पेत्र जर तठेन जाई तर कमीत कमी त्यानी सावली त्यासनापैकी काही जणसवर तर पडी.
16 आखो यरूशलेमना आसपासना गावमधला लोकसनी गर्दी रोगीसले अनं दुष्ट आत्मा लागेल लोकसले तठे लई येत; अनी त्या सर्व रोगी बरा व्हई जायेत.
न्यायसभानापुढे परत प्रेषित
17 तवय प्रमुख याजक अनी त्यासना सहकारी म्हणजे सदुकी पंथना लोके, ज्या प्रेषितसवर जळेत; त्या प्रेषितसना विरोधमा ऊठनात.
18 अनी त्यासनी प्रेषितसले धरीसन कैदखानामा टाकं.
19 पण रातले प्रभुना दूतनी कैदखानाना दरवाजा उघडी दिधा अनं त्यासले बाहेर अनीसन सांगं की,
20 जा अनी मंदिरमा उभा राहीसन, या नवा जिवनना संदेश सर्व लोकसले सांगा.
21 हाई ऐकीसन त्या पहाटलेच मंदिरमा जाईसन शिक्षण देवाले लागनात.
पण जवय महायाजक अनं त्यासना सहकारी वनात तवय त्यासनी ईसन धर्मसभा अनं यहूदी लोकसना वडीलमंडळ या सर्वासले एकत्र बलावं; अनी प्रेषितसले आणाकरता कैदखानामा धाडं.
22 पण ज्या अधिकारी तठे गयात त्यासले प्रेषित कैदखानामा सापडनात नहीत, म्हणीन त्यासनी परत ईसन सांगं की,
23 “आम्हीन कैदखानाले चांगलच बंद करेल अनी दारजोडे पहारेकरीसले उभं दखं; पण जवय आम्हीन दार उघडीन दखं, तर मझार कोणीच सापडनं नही!”
24 मंदिरना शिपाईसना सरदार अनं मुख्य याजकसनी हाई बातमी ऐकीसन, त्या गोंधळी गयात की प्रेषितसन काय व्हयनं, अनी याना काय परिणाम व्हई.
25 इतलामा कोणतरी ईसन त्यासले अस सांगं की, ऐका! ज्या माणसंले तुम्हीन कैदखानामा ठेयल व्हतं त्या तर मंदिरमा उभा राहीसन लोकसले शिकाडी राहिनात!
26 तवय अधिकारी शिपाईसनासंगे गया अनी त्यासले जुलुम नही करता लई वना; कारण लोके आपले दगडमार करतीन अशी त्यासले भिती वाटी राहींती.
27 त्यासनी प्रेषितसले अनीसन न्यायसभानापुढे उभं करं, तवय प्रमुख याजकनी त्यासले ईचारं की,
28 “आम्हीन तुमले कठोर आदेश देयल व्हता की, तुम्हीन या नावतीन संदेश देवाना नही, तरी बी तुम्हीन सर्व यरूशलेमले आपलं शिक्षण दिसन भरी टाकेल शे अनी तुम्हीन त्या माणुसना रक्तपातना दोष आमनावर आनाले दखतस का!”
29 तवय पेत्रनी अनी बाकीना प्रेषितसनी उत्तर दिधं, “आम्हीन माणुसपेक्षा देवनी आज्ञा मानाले पाहिजे.
30 ज्या येशुले तुम्हीन क्रुसखांबवर टांगीसन मारं, त्याले आमना पुर्वजसंना देवनी मरेल मातीन जिवत करं.
31 त्यालेच परमेश्वरनी आपली उजवी बाजुले अधिपती अनी उध्दारकर्ता अस उच्च करं कारण तो इस्त्राएल लोकसले पापसपाईन फिरानी अनी पापसनी क्षमानी संधी दि.
32 आम्हीन ह्या सर्व गोष्टीसना साक्षीदार शेतस अनी जो पवित्र आत्मा देवनी आपली आज्ञा पाळणारासले देयल शे, तो बी साक्षी शे.”
33 हाई ऐकीसन त्या दात मिट्ठ्या खावाले लागनात अनी त्यासले मारी टाकाना ईचार करा.
34 पण तठे गमलियेल नावना एक परूशी माणुस व्हता, तो शास्त्रशिक्षक अनी सर्व लोकसनी प्रतिष्ठीत मानेल व्हता; त्यानी न्यायसभामा उभा राहीन असा आदेश दिधा की, “या प्रेषितसले थोडा येळ बाहेर जावाले सांगा.”
35 मंग तो त्यासले बोलना, अहो इस्त्राएल लोकसहो, “तुम्हीन ह्या माणससंगे जे काय कराव शेतस ते ईचारपुर्वक करा.”
36 कारण तुम्हीन याद करा की, काही दिन पहिले थुदास नावना माणुस पुढे ईसन मी बी कोणतरी महान शे अस म्हणु लागना, अनी जवळजवळ चारशे माणसं त्याना मांगे चालु लागनात, पण त्याले मारी टाकं अनी जितला त्याना मांगे जाई राहींतात त्या सर्वासनी धांदल व्हई गई अनी त्या नष्ट व्हयनात.
37 त्या माणुसनंतर जनगणनाना दिनसमा गालीलमा राहणारा यहूदा ऊठना अनं त्यानी बराच लोकसले आपलाकडे करी लिधं, पण त्याले बी मारी टाकं अनं जितला त्याना मांगे जाई राहींतात त्या सर्वासनी दाणादाण व्हई गई.
38 म्हणीसन मी तुमले सांगस, आते ह्या माणसंविरूध्द काहीच करू नका; त्यासले सोडी द्या! कारण जर हाई योजना अनं हाई काम मनुष्यकडतीन व्हई तर नष्ट व्हई जाई.
39 पण जर हाई देवकडतीन व्हई तर तुमनाघाई नष्ट व्हवाऊ नही; मात्र तुम्हीन देवना विरोधी ठरशात! तवय त्यासनी त्यानं बोलणं मान्य करं.
40 त्यासनी प्रेषितसले मझार बलाईसन फटका मारात, अनी येशुना नावतीन अजिबातच बोलानं नही; अशी ताकिद दिसन त्यासले सोडी दिधं.
41 प्रेषित अस म्हणीसन आनंद करत धर्मसभापुढतीन निंघी गयात की, आपण तर येशुना नावकरता निदाण आपमान सहन कराना योग्य तरी ठरनुत.
42 अनी रोज मंदिरमा अनं घरघर शिकाडानं अनी येशु हाऊच ख्रिस्त शे हाई सुवार्ता गाजाडानं त्यासनी सोडं नही.