4
धर्मसभानासमोर पेत्र अनी योहान
पेत्र अनी योहान लोकसनासंगे बोली राहींतात तवय याजक, मंदिरना रक्षक अनं सदुकी ह्या त्यासनावर धाई वनात; कारण त्या लोकसले शिक्षण दिसन, येशु द्वारा मरेलस मातीन परत ऊठनं हाई व्हई अस त्या उघडउघड सांगी ऱ्हाईंतात, यामुये त्यासले राग वना. तवय त्यासनी पेत्र अनी योहानले धरं अनं संध्याकाय व्हयेल व्हती म्हणीन सकायपावत त्यासले कैदखानामा ठेवं. तरी बी वचन ऐकनारा बराच लोकसनी ईश्वास ठेवा, अनी जवळजवळ ईश्वास ठेवणारा माणसंसनी संख्या पाच हजारना वर व्हयनी.
मंग दुसरा दिन अस व्हयनं की, मुख्य याजकसना कुळमधला जेवढा व्हतात तेवढा यरूशलेममा एकत्र जमनात, त्यासना यहूदी आधिकारी, वडीलधारा अनं शास्त्री, अनी मुख्य याजक हन्ना, कैफा, योहान, आलेक्सांद्र. अनी पेत्र अनी योहानले मजारमा उभा करीसन ईचारं, हाई काम तुम्हीन कोणता सामर्थ्यतीन किंवा कोणा नावतीन करतस?
तवय पेत्र पवित्र आत्माघाई परिपुर्ण व्हईसन त्यासले बोलना, अहो, लोकाअधिकारीसवन अनं वडील लोकसवन, हाऊ लंगडा माणुसवर कसा उपकार व्हयना, म्हणजे तो कशाघाई बरा व्हयना, यानाबद्दल आमनी चौकशी व्हणार व्हई, 10 तर तुमले सर्वासले अनं इस्त्राएल लोकसले हाई समजाले पाहिजेल की, ज्या येशु ख्रिस्तले तुम्हीन क्रुसखांबवर खिळीन मारी टाकं, ज्याले देवनी मरेलस मातीन परत जिवत करं त्या नासोरी येशु ख्रिस्तना नावमा जे सामर्थ्य शे त्याघाई हाऊ माणुस बरा व्हईसन तुमनासमोर उभा राहेल शे. 11 शास्त्रलेख असं सांगस,
जो दगड तुम्हीन बांधकाम करनारासनी नापसंत करा,
तरी तो कोणशीला व्हयना तो दगड येशुच शे;
12 अनी तारण दुसरा कोणाकडतीन नही शे; ज्यामुये आपलं तारण व्हई अस दुसरं कोणतच नाव आकाशनाखाल लोकसमा देयल नही शे.
13 तवय पेत्रनी अनं योहाननी हिम्मत दखीसन, तसच ह्या अनपड अनं अज्ञानी माणसे शेतस अस समजनं तवय त्या नवल कराले लागनात; अनी ह्या येशुनासंगे व्हतात हाई बी त्यासनी वळखी लिधं. 14 तरी त्या बरा व्हयेल माणुसले पेत्र अनी योहानजोडे उभा राहेल दखीसन बी त्यासले त्यासना विरूध्दमा काहीच बोलता वनं नही. 15 मंग त्यासनी त्यासले न्यायसभाना बाहेर जावानी आज्ञा करी अनी त्या आपसमा ईचार करीसन बोलनात, 16 ह्या माणससले आपण काय करानं? कारण त्यासनाकडतीन खरोखर मोठा चमत्कार व्हयेल शे, हाई सर्व यरूशलेम मधलासले माहित शे; त्यामुये ते आपलाले नाकारता येवाव नही. 17 तरी हाई लोकसमा जास्त पसराले नको म्हणीसन त्यासले अशी ताकिद द्या की, यानापुढे तुम्हीन येशुना नावबद्दल कोणसंगे बोलानं नही.
18 मंग त्यासनी त्यासले बलाईन ताकिद दिसन अस सांगं की, येशुना नावतीन बोलानं नही अनी शिकाडानं बी नही. 19 पण पेत्र अनं योहान यासनी त्यासले उत्तर दिधं की, देवनं सोडीन तुमनं ऐकानं हाई देवना नजरमा योग्य शे की, अयोग्य शे हाई तुम्हीनच न्याय करा; 20 जे आम्हीन दखं अनी ऐकं त्यानाबद्दल बोलानं नही हाई आमनाघाई व्हवाव नही. 21 तवय त्यासनी त्यासले परत धमकाडीन सोडी दिधं; कारण त्यासले शिक्षा कशी करानी हाई लोकसमुये त्यासले सुची नही राहींत, कारण घडेल गोष्टीमुये सर्व लोके देवना गौरव करी राहींतात. 22 ज्या माणुसवर बरा व्हवाना जो चमत्कार घडेल व्हता, त्या माणुसनं वय चाळीस वरीस पेक्षा जास्त व्हतं.
ईश्वासनारासनी धैर्यकरता प्रार्थना
23 जवय पेत्र अनी योहानले तठेन सोडी दिधं तवय त्या आपला मंडळीकडे गयात, अनी जे काही त्यासले मुख्य याजकनी अनी वडील लोकसनी सांगेल व्हतं ते सर्व त्यासनी त्यासले सांगं. 24 हाई ऐकिसन त्या ईश्वासनारासनी एकचित्त व्हईसन देवले उच्चा आवाजमा बोलनात, हे प्रभु, आकाश, पृथ्वी, समुद्र अनं त्यासनामा जे काही शे त्या सर्वासना तुच निर्माणकर्ता शे! 25 आमना पुर्वज, तुना सेवक दावीद, याना तोंडघाई पवित्र आत्मानाद्वारे तु बोलनास,
गैरयहूदी का बरं खवळनात;
अनं लोकसनी व्यर्थ योजना का बरं कऱ्यात?
26 प्रभु अनी त्याना ख्रिस्तना विरोधमा
पृथ्वीना राजा उभा राहीनात,
अनं आधिकारी एकत्र जमनात.
27 कारण खरच ज्याना तु अभिषेक करा तो तुना पवित्र सेवक येशु ज्याले तु ख्रिस्त करं यानाविरूध्दमा या शहरमा गैरयहूदी लोके अनं इस्त्राएल लोके यासनासंगे हेरोद अनं पंतय पिलात ह्या एकत्र व्हईनात. 28 यानाकरता की, जे काही घडणार शे, तेच त्यासनी करावं कारण ती योजना तु तुना ईच्छाघाई अनं सामर्थ्यघाई पहिलेच करी ठेयल व्हती. 29 तर हे प्रभु, आते तू त्यासनं धमकाडनं दख; अनी आपल दाससले हाई परवानगी दे की, तुनं वचनले पुर्ण धैर्यतीन सांगतीन. 30 अनी बरं कराकरता तु आपला हात पुढे कर अनी तुना पवित्र सेवक येशु याना नावतीन आश्चर्यकर्म अनं अद्भुत चमत्कार घडतीन अस व्हवु दे.
31 त्यासनी प्रार्थना करावर ज्या जागमा त्या उभा व्हतात ती हादरी गई अनी त्या सर्व पवित्र आत्माघाई परीपुर्ण व्हईसन देवनं वचन धैर्यतीन सांगु लागनात.
ईश्वासी लोकसनं एकत्रीत जिवन
32 ईश्वासु लोकसनी गर्दी एक मन अनी एक जिव अशी व्हती; त्यासनामाईन कोणी बी आपली संपत्तीले स्वतःनी शे अस म्हणेत नही, तर त्यासनं सर्वकाही एकत्र व्हतं. 33 प्रेषित मोठा सामर्थ्यतीन प्रभु येशुना पुनरूत्थानबद्दल साक्ष दि राहींतात, अनी त्या सर्वासवर देवनी मोठी कृपा व्हती. 34 त्यासनामधला कोणलेच काही कमी नव्हतं त्या सर्वाजण जमीनना अनं घरसना मालक व्हतात त्या आपली जमीन, अनी घरे ईकीसन त्यानी किंमत आणेत. 35 अनी प्रेषितसना पायनाजोडे ठि देयत, मंग ज्यासले जशी गरज ऱ्हाये तसं प्रत्येकले वाटी देयत.
36 सायप्रस बेटमा जन्मेल योसेफ नावना लेवी व्हता त्याले प्रेषितसनी बर्णबा म्हणजे प्रोत्साहन देनारा असं नाव दिधं. 37 त्यानाकडे जमीन व्हती त्यानी ईकी दिधी, अनं तिना पैसा आनीसन तो प्रेषितसना पायजोडे ठि दिधा.
4:27 लूक २३:७-११; मत्तय २७:१,२; मार्क १५:१; लूक २३:१; योहान १८:२८,२९ 4:32 प्रेषित २:४४,४५