3
लंगडा भिकारी बरा व्हस
1 पेत्र अनं योहान ह्या दुपारना तिन वाजता प्रार्थना कराले वर मंदिरमा जाई ऱ्हाईंतात.
2 तवय तठे जन्मपाईन पांगया असा एक माणुस व्हता; त्याले मंदिरमा जाणारासपाईन भीक मांगाकरता रोज उचलीसन मंदिरना सुंदर नावना दरवाजाजोडे ठेयेत.
3 पेत्र अनं योहान ह्या मंदिरमा जाई राहीनात अस दखीसन त्यानी त्यासनाकडे भीक मांगी.
4 तवय पेत्र अनं योहान त्याले टक लाईन दखं अनी पेत्र बोलना, आमनाकडे दख!
5 तवय त्यासनापाईन काहीतरी भेटी हाई आशा लाईन त्यानी त्यासनाकडे ध्यान दिधं.
6 पण पेत्र त्याले बोलना, मनाजोडे सोनंचांदी काहीच नही, पण जे शे ते तुले देस; नासोरी येशु ख्रिस्तना नावमा चालु लाग!
7 मंग त्यानी त्याना उजवा हात धरीसन त्याले ऊठाडं, तवय त्याना पायसमा अनी गुडघासमा लगेच बळ वनं.
8 तो उडी मारीसन उभा राहीना अनं चालु लागना; अनी चालत, उड्या मारत अनं देवना स्तुती करत त्यासनासंगे मंदिरमा गया.
9 सर्व लोकसनी त्याले चालताना अनी देवना स्तुती करतांना दखं.
10 अनी मंदिरना सुंदर नावना दरवाजाजोडे बठीसन भीक मांगणारा तो हाऊच शे हाई त्यासनी वळखं, तवय त्यानाबद्ल जे घडनं व्हतं त्यानावरतीन त्यासले भलतच आश्चर्य अनी नवल वाटनं.
मंदिरमा पेत्रना संदेश
11 मंग तो पेत्र अनं योहान यासले चिटकी राहीना तवय सर्व लोके नवल करत त्यासनाकडे शलमोननी देवडी नावना ठिकाणमा धावत वनात.
12 हाई दखीसन पेत्रनी लोकसले सांगं, अहो इस्राएल लोकसहो, यानं नवल का बरं करतस? किंवा आम्हीन आमना सामर्थ्यमा अनी शक्तीघाई याले चालाले लावं अस समजीन आमनाकडे टक लाईन का बरं दखतस?
13 अब्राहाम, इसहाक अनं याकोब यासना देव, आपला पुर्वजसंना देवनी आपला सेवक येशु यानं गौरव करेल शे, त्याले तुम्हीन धरी दिधं अनं पिलातनी त्याले सोडी देवाना निश्चय करा, तरी पण तुम्हीन त्याले त्याना समोर नाकारी दिधं.
14 जो पवित्र अनं धार्मीक मनुष्य त्याले तुम्हीन नाकारी दिधं अनी एक खुनी माणुसले आमनाकरता सोडी द्या अशी मागणी करी.
15 अनी जिवनना अधिकारीले तुम्हीन मारी टाकं; पण देवनी त्याले मरेल मातीन जिवत करं याना आम्हीन साक्षीदार शेतस.
16 ज्या माणुसले तुम्हीन दखतस अनं वळखतस, हाऊ लंगडा माणुसले त्याना नावना ईश्वासमुये सामर्थ्य मिळेल शे; येशुवरला ईश्वासमुये याले तुमना सर्वासनादखत बरं करेल शे.
17 बंधुजनहो, तुम्हीन, तसच तुमना अधिकारीसनी बी जे करं ते अज्ञानमुये करं हाई माले माहित शे.
18 पण देवनी, आपला ख्रिस्तनी दुःख सहन करावं; अस ज्या सर्व संदेष्टासनाद्वारा पुर्वी सांगेल व्हतं ते त्यानी तसच पुर्ण करं.
19 यामुये तुमना पापसनी क्षमा व्हवाले पाहिजे म्हणीसन तुम्हीन पाप करनं थांबाडा अनं मांगे फिरा.
20 आत्मीकतानी शांतीनी येळ प्रभुकडतीन तुमनाकडे येवो अनी तो येशुले धाडी, ज्याले तुमनाकरता पहीलापाईन ख्रिस्त ठराई देयल शे.
21 सुरवात पाईन देवनी आपला संदेष्टासनाद्वारा जे सांगं, ते सर्व गोष्टी सांगेल प्रमाणे नव्या व्हतस नही त्या काळपावत येशुले स्वर्गमा ऱ्हाणं शे.
22 मोशेने बी सांगेल व्हतं, प्रभु जो तुमना परमेश्वर देव, तुमनाकरता मनामायक संदेष्टा तुमनाच भाऊसमातीन धाडी; तो जे काही तुमले सांगी त्याप्रमाणे तुम्हीन सर्व त्यानं ऐका;
23 अनी अस व्हई की, जो कोणी त्या संदेष्टानं ऐकावु नही त्याले देवना लोकसमाईन येगळं करीसन पुर्ण नष्ट कराई जाई.
24 आखो शमुवेलपाईन अनी परंपरानुसार जितला संदेष्टा व्हयनात तितला सर्वासनी ह्या दिनबद्दल सांगं.
25 तुम्हीन संदेष्टासना पोऱ्या शेतस, अनी तुना वंशपाईन पृथ्वीना सर्व लोके आशिर्वादित व्हतीन अस अब्राहामनासंगे बोलीन देवनी तुमना पुर्वजसंनासंगे करेल करारना तुम्हीन पोऱ्या शेतस.
26 देवनी आपला सेवकले ऊठाडीसन पहिले तुमनाकडे धाडं, यानाकरता की, त्यानी तुमले प्रत्येकले तुमना वाईट दुष्कर्मसपाईन मांगे फिराईन आशिर्वाद देत जावं.