7
स्तेफननं भाषण
1 प्रमुख याजक बोलना, “ह्या गोष्टी खऱ्या शेतस का?”
2 तवय स्तेफन बोलना, “भाऊसवन अनं वडीलजनहो, ऐका, आपला पुर्वज अब्राहाम हारान प्रांतमा जाईन राहीना त्याना पहिले जवय तो मेसोपोटामिया देशमा व्हता तवय गौरवशाली देवनी त्याले दर्शन दिधं,
3 अनी सांगं की, ‘तु आपला देश अनं आपला नातेवाईक सोडीसन त्या देशमा निंघी जा, जो मी तुले दखाडसु.’
4 तवय तो खास्दिया देशमाईन निंघना अनी हारान प्रांतमा जाईसन राहिना; मंग त्याना बाप मरावर देवनी त्याले तठेन काढीसन आते तुम्हीन राहतस त्याच देशमा आणं;
5 देवनी तठे त्याले त्याना हिस्सा दिधा नही, आठपावत की पाय ठेवाले सुध्दा जागा दिधी नही; तोपावत त्याले पोऱ्यासोऱ्या नव्हतात तरी ‘हाऊ देश तुना अनं तुनामांगे तुना वंशना स्वाधीन करी दिसु’ अस अभिवचन देवनी त्याले दिधं.
6 देवनी आखो अस बी सांगं की, ‘तुना वंश प्रदेशमा जाईसन परदेशी बनी राहतीन अनी त्या लोके त्यासले गुलाम बनाडीसन चारशे वरीस वाईट रिततीन छळतीन.
7 पण ज्या देशमा त्या गुलाम राहतीन त्या देशले मी स्वतः दंड दिसु, अनी त्यानानंतर त्या तठेन निंघीसन हाईच जागमा मनी सेवा करतीन.’
8 त्यानी त्याले ‘सुंताना करार लाई दिधा; हाऊ करार व्हवानंतर अब्राहामले इसहाक व्हयना; त्यानी सुंता अब्राहामनी आठवा दिन करी; मंग इसहाकनी आपला पोऱ्या याकोब ह्यानी सुंता करी अनं याकोबनी बारा पोऱ्यासनी बी सुंता कर, त्या आपला कुलपती व्हयनात”
9 “याकोबाना पोऱ्या त्यासना भाऊ योसेफ याना हेवा करेत त्यामुये त्यासनी त्याले मिसर देशमा ईकी दिधं; पण देव त्यानासंगे व्हता.
10 त्यानी त्याले सर्व संकटसमाईन सोडावं अनी मिसर देशना राजा फारो याना नजरमा कृपापात्र अनं ज्ञानी अस करं, म्हणीसन फारोनी मिसर देशवर अनं आपला सर्व घरवर त्याले आधिकारी बनाडं.
11 मंग सर्व मिसर देश अनं कनान देशमा दुष्काळ पडिसन मोठं संकट वन अनी आपला पुर्वजसले अन्न भेटी नही राहींत.
12 तवय मिसर देशमा धान्य शे हाई ऐकीसन याकोबनी तुमना आमना पुर्वजसंले पहिलींदाव धाडं.
13 मंग दुसरींदाव योसेफनी स्वतः व्हईन आपला भाऊससंगे वळख करी लिधी अनी योसेफना परिवारबद्दल फारो राजाले कळनं.
14 तवय योसेफनी आपला बाप याकोब अनं आपला सर्व नातलग ज्या पंचाहत्तर जन व्हतात त्यासले निरोप दिसन आपलाजोडे मिसर देशमा बलावं.
15 तवय याकोब मिसर देशमा खाल गया अनी तठेच तो अनं त्याना पोऱ्या मरणात.
16 तठेन त्यासले शखेम प्रांतमा लई जाईसन त्या कबरमा ठेवं जी कबर अब्राहामनी हमोरना पोऱ्याकडतीन शखेम प्रांतमा रोख पैसा दिसन ईकत लेयल व्हती.”
17 “मंग देवनी अब्राहामले जे वचन देयल व्हतं त्यानी येळ जशी जशी जोडे वनी तशी तशी मिसरमा त्या लोकसनी संख्या भलतीच वाढत गई.
18 मंग मिसरमा एक दुसरा राजा व्हयना ज्याले योसेफबद्दल काहीच माहीत नव्हतं.
19 तो राजा तुमना आमना लोकससंगे कपटतीन वागना अनी असा त्यानी आपला पुर्वजसंना छळ करा, त्यासना लेकरे वाचाले नको म्हणीसन त्यासले घरबाहेर टाकी देवाले भाग पाडं.
20 त्याच दिनसमा मोशेना जन्म व्हयना, तो देवना नजरमा भलताच सुंदर व्हता; त्यानं पालन पोषण तीन महिनापावत त्याना बापना घर व्हयनं,
21 मंग त्याले बाहेर टाकामा वनं तवय फारोनी पोरनी त्याले लिधं अनी आपला पोऱ्या म्हणीन पाळं.
22 मोशेले मिसरी लोकसना सर्व विद्यासनं शिक्षण भेटनं अनी तो बोलामा अनं कामसमा पराक्रमी व्हता.”
23 “मंग तो चाळीस वरीसना व्हयना तवय त्याना मनमा वनं की, आपला भाऊसले म्हणजे इस्त्राएल लोकसले भेटावं.
24 त्यामातील एक जणवर अन्याय व्हई राहीना अस मोशेनी दखं तवय त्यानी त्याले वाचाडं अनी मिसरी माणुसले मारी टाकीन ज्यानावर अन्याय व्हई राहींता त्याना बदला लिधा.
25 तवय आपला हातघाई देव कशी आपला लोकसनी सुटका करी राहीना हाई त्यासले समजी अस त्याले वाटनं व्हतं, पण त्यासले समजनं नही.
26 मंग दुसरा दिन दोन इस्त्राएल लोके भांडी राहींतात, तो त्यासनाकडे ईसन त्यासनं भांडण मिटाडु लागना अनी तो बोलना, माणसवन, ‘अरे तुम्हीन भाऊबंद शेतस; असा एकमेकससंगे अन्याय का बरं करी राहीनात?’
27 तवय जो आपला शेजारीले मारी राहींता तो मोशेले ढकलीसन बोलना, ‘तुले आमनावर अधिकारी अनं न्यायाधीश कोणी करं?
28 कालदिन तु मिसरी माणुसले मारी टाकं तसं माले बी माराले दखस का?’
29 ह्या शब्द ऐकताच मोशे तठेन पळी गया अनी मिद्यानी देशमा परदेशी बनीसन राहीना; तठे त्याले दोन पोऱ्या व्हयनात.
30 “मंग चाळीस वरीस नंतर सिनाय डोंगरना ओसाड प्रदेशमा, एक झुडूप जळी राहींत त्यामा त्याले एक देवदूत दखायना.
31 ते दखीसन मोशेले आश्चर्य वाटनं, अनी काय शे ते निट दखाकरता तो झुडुपना जोडे गया; तवय प्रभुनी वाणी अशी व्हयनी की;
32 ‘मी तुना पुर्वजसंना देव, म्हणजे अब्राहामना, इसहाकना अनं याकोबना देव शे’ तवय मोशे थरथर कापु लागना अनी परत तिकडे दखानी हिम्मत त्यानी व्हयनी नही.
33 नंतर देवनी त्याले सांगं, तु तुना पायमधला जोडा काढ; कारण जी जागावर तु उभा शे ती पवित्र भुमी शे.
34 मी खरच मिसर देशमधला मना लोकसना हाल दखेल शेतस, त्यासनं कण्हनं मी ऐकेल शे, अनी त्यासले सोडाकरता मी उतरेल शे; तर आते ये; मी तुले मिसर देशमा धाडस.
35 “तुले अधिकारी अनं न्यायाधीश कोणी करं? अस ज्या मोशेले अडाईसन बोलना व्हतात, त्याले झुडूपमा दर्शन व्हयेल देवदूतना हस्ते, देवनी अधिकारी अनं मुक्तिदाता अस करीसन धाडं.
36 त्यानी मिसर देशमा, तांबडा समुद्रमा अनं ओसाड प्रदेशमा चाळीस वरीस चमत्कार अनी आश्चर्यकर्म करीसन त्या लोकसले काढीन पुढे लई गया.
37 तोच मोशे इस्त्राएल लोकसले बोलना, देव तुमना भाऊसमातीन मनामायक एक संदेष्टा तुमनाकरता उत्पन्न करी.
38 हाऊ तोच शे जो ओसाड प्रदेशमधली मंडळीमा, सिनाय डोंगरवर त्यानासंगे बोलणारा देवदूतसंगे अनी आपला पुर्वजसंसंगे व्हता; त्यालेच तुमले आमले देवाकरता देवना जिवत वचनं भेटनात.”
39 त्यानं ऐकाले त्या तयार नव्हतात; तर त्यासनी त्याले धिक्कारं अनं आपलं मन मिसर देशकडे फिरावं,
40 अनी अहरोनले बोलनात, आमनापुढे चालतीन असा देव आमले बनाडी दे; कारण ज्यानी आमले मिसर देशमातीन आनं त्या मोशेनं काय व्हयनं हाई आमले माहीत नही.
41 मंग त्या दिनसमा त्यासनी बैलनी मुर्ति बनाडीसन तिले यज्ञ करीसन आपला हातघाई करेल कार्यबद्दल त्यासनी जेवण करीसन आनंद करा.
42 पण देवनी त्यासनापाईन तोंड फिराई लिधं अनी त्यासले आकाशमातील तारासनी पुजा कराले सोडी दिधं, जसं की संदेष्टासनी आपला पुस्तकसमा लिखेल शे;
हे इस्त्राएल लोकसवन!
तुम्हीन चाळीस वरीस ओसाड प्रदेशमा बलिदान
अनं यज्ञ माले करात का?
43 तुम्हीन मोलखना तंबु, अनी रेफान दैवतना तारासले बी,
आपलासंगे लेयल व्हतात; म्हणजे त्या मुर्तिसले,
ज्यासले तुम्हीन पुजाकरता बनाडेल व्हतं;
शेवट मी बी तुमले बाबेलना पलिकडे ली जाईन ठेवसु.
44 तु जो नमुना दखा तसाच आज्ञासना पाट्यासकरता निवासमंडप बनाड, अस ज्या देवनी मोशेले सांगं, देवनी नेमेलप्रमाणे तो मंडप ओसाड प्रदेशमा आपला पुर्वजसंना व्हता.
45 त्या मंडपले वारस हक्कमा मिळाडीसन आमना पुर्वज यहोशवा संगे त्या येळले आठे लई वनात तवय ज्या लोकसले देवनी त्यासनंसमोरतीन हाकली दिधं, त्यासना देशसवर आपला पुर्वजसंनी कबजा करी लिधा, अनी असच दावीद व्हता तोपावत व्हता.
46 दावीदवर देवनी कृपादृष्टी व्हयनी अनी त्यानी याकोबना देवकरता निवासस्थान बांधानी ईनंती करी.
47 पण ते घर शलमोननी त्यानाकरता बांधी लिधं.
48 पण जो परमप्रधान तो हाततीन बनाडेल घरमा राहस नही; संदेष्टासनी सांगेल शे,
49 प्रभु म्हणस, स्वर्ग मनं राजासन शे,
पृथ्वी मनं पादासन शे;
तुम्हीन मनाकरता कोणता प्रकारनं घर बांधश्यात?
मना आरामकरता कोणतं स्थान राहु शकस?
50 मी मना हातघाई हाई सर्व बनाडेल नही शे का?
51 मंग स्तेफन त्यासले बोलना, “अहो ताठ मानना, मनतीन अनं कानतीन बेसुंती लोकसवन! तुम्हीन पवित्र आत्माले कायम आडावतस; जसं तुमना पुर्वज तसा तुम्हीन बी करतस!
52 तुमना पुर्वजसंनी, संदेष्टासपैकी असा कोण शे की त्याले तरास दिधा नही? ज्यासनी त्या नितीमान माणुसना आगमनबद्दल पहिलेच सांगेल व्हतं, त्यासनी त्याले बी मारी टाकं; अनी त्याले धरी देणारा अनं मारी टाकणारा असा आते तुम्हीन व्हयेल शेतस.
53 अनी तुमलेच देवदूतसकडतीन ठरायेल नियमशास्त्र भेटनं, पण तुम्हीन त्यानं पालन करं नही!”
स्तेफनवर दगडफेक
54 स्तेफननं हाई भाषण त्यासना मनले ईतलं लागनं की, त्या त्यानावर दातओठ खाऊ लागनात.
55 पण पवित्र आत्मातीन परीपुर्ण व्हईसन स्तेफननी स्वर्गकडे दखं तवय देवनं तेज अनी देवना उजवीकडे येशुले उभं राहेल त्यानी दखं.
56 अनी सांगं की, “दखा! स्वर्ग उघडेल शे अनी मनुष्यना पोऱ्या हाऊ देवना उजवीकडे उभा शे अस मी दखी राहीनु!”
57 तवय त्या सर्वाजन जोरमा वरडीन अनं कान बंद करीसन संगेच त्यानावर तुटी पडनात.
58 मंग त्या त्याले ढकलत शहरना बाहेर लई जाईसन दगडमार करू लागनात अनी साक्षीदारसनी आपला कपडा शौल नावना एक तरूण पोऱ्याकडे ठेवात.
59 तवय त्यानावर त्या दगडमार करी राहींतात तवय स्तेफन प्रभुना धावा करीसन बोलना, “हे प्रभु येशु, मना आत्माना स्विकार कर!”
60 मंग गुडघा टेकीन तो जोरमा वरडना, “हे प्रभु! हाई पाप ह्यासनाकडे मोजु नको!” अस बोलीन त्यानी जीव सोडा.