8
1 अस स्तेफनले मारामा शौलनी बी सहमती व्हती,
ख्रिस्ती मंडळीना छळ
त्या दिनपाईन यरूशलेमा जी मंडळी व्हती त्यासनावर अत्याचारनी सुरवात व्हयनी; तवय प्रेषित तठेच राहिनात पण बाकीना सर्व ईश्वासु लोके यहूदीया अनं शोमरोन या प्रांतसमा पांगी गयात.
2 स्तेफनले काही धार्मीक लोकसनी ली जाईसन पुरी दिधं अनी त्यानाकरता मोठा शोक करा.
3 इकडे शौल मंडळीना नाश करी राहींता, तो घरेघर जाईन माणससले अनी बायासले धरीन कैदखानामा टाके.
शोमरोनमा फिलीप्पना शुभवर्तमानना प्रचार
4 तवय ज्या ईश्वासी लोके पांगी जायेल व्हतात त्या फिरता फिरता सर्वीकडे वचननी सुवार्ता सांगत फिरनात,
5 अनी फिलीप्पनी शोमरोन शहरमा खाल जाईसन ख्रिस्तबद्दल प्रचार करा.
6 जवय लोकसनी फिलीप्पनी सांगेल गोष्टी ऐक्यात अनी त्या चिन्हसले दखं ज्या तो दखाडी राहींता तवय त्यासनी एकचित्त व्हईसन त्यानी सांगेल गोष्टीसवर ध्यान दिधं.
7 ज्यासले दुष्ट आत्मा लागेल व्हता त्यामातील बराच जणसमातीन दुष्ट आत्मा जोरमा वरडत निंघी गयात; बराच लखवा व्हयेल अनी पांगया माणसे बरा व्हयनात.
8 अनी त्या शहरमा भलताच आनंद व्हयना.
9 त्याच शहरमा जादूगिरी करीसन शोमरोनी लोकसले थक्क करनारा असा शिमोन नावना कोणी एक माणुस व्हता, अनी मी कोणी तरी मोठा शे अस तो सांगे.
10 सर्व लहानथोर त्यानं लक्षपुर्वक ऐकीन बोलेत की, “हाऊ माणुस परमेश्वरनी ती शक्ती शे जीले महाशक्ती म्हणतस.”
11 त्यानी त्यासले बराच काळपाईन आपली जादूगिरी करीसन थक्क करेल व्हतं; म्हणीसन त्यासनं लक्ष त्यानाकडे व्हतं.
12 तरी बी फिलीप्प देवनं राज्य अनं येशु ख्रिस्तना नावनी सुवार्ताना संदेश सांगी राहींता तवय लोकसनी ईश्वास ठेवा अनी बाया अनं माणसंसना बाप्तिस्मा व्हयना.
13 शिमोननी बी स्वतः ईश्वास ठेवा; अनं बाप्तिस्मा लिसन तो फिलीप्पना सहवासमा राहीना अनी ज्या मोठा आश्चर्यकर्म अनं चमत्कार घडनात त्या दखीसन तो थक्क व्हयना.
14 नंतर शोमरोन शहरना लोकसनी देवनं वचनना स्विकार करा अस जवय यरूशलेम मातील प्रेषितसनी ऐकं तवय त्यासनी त्यासनाकडे पेत्र अनी योहान ह्यासले धाडं.
15 त्या तठे येवावर त्यासनी त्या ईश्वासी लोकसले पवित्र आत्मा भेटाले पाहिजे म्हणीसन त्यासनाकरता प्रार्थना करी.
16 कारण त्यासनापैकी कोणवरच तो येल नव्हता; फक्त प्रभु येशुना नावतीन त्यासना बाप्तिस्मा व्हयेल व्हता.
17 तवय पेत्र अनी योहाननी त्यासनावर आपला हात ठेवात तवय त्यासले पवित्र आत्मा भेटना.
18 प्रेषितसनी हात ठेवा म्हणजे पवित्र आत्मा भेटस हाई दखीन शिमोन त्यासनाकडे पैसा ली गया,
19 अनी बोलना, “ज्या कोणवर मी हात ठेवसु त्याले पवित्र आत्मा भेटी असा अधिकार माले बी द्या.”
20 तवय पेत्र त्याले बोलना, “तुना पैसाना तुनासंगेच नाश व्हवो, कारण देवनं दान तु पैसासघाई मिळाडाना प्रयत्न करा.
21 या गोष्टीसमा तुले भाग अनं वाटा नही कारण तुनं मन देवना नजरमा नीट नही शे.
22 तु तुना या दुष्ट ईचारबद्दल पश्चाताप करीसन प्रभुकडे प्रार्थना कर म्हणजे तुना या मनमातील ईचारबद्दल तुले क्षमा व्हई.
23 कारण तु भलताच कडुपणमा अनी अधर्मना बंधनमा शे अस माले दखाई राहीनं.”
24 तवय पेत्र अनी योहानले शिमोन बोलना, “तुम्हीन सांगेल गोष्टीपैकी काहीच मनावर येवाले नको म्हणीसन तुम्हीन मनाकरता प्रभुकडे प्रार्थना करा.”
25 नंतर त्यासनी साक्ष दिसन अनी प्रभुनं वचनना प्रचार करीसन पेत्र अनी योहान यरूशलेममा परत वनात; तवय त्यासनी शोमरोनी लोकसना बराचसा गावसमा सुवार्ता सांगी.
फिलीप्प अनी कुश देशना अधिकारी
26 नंतर प्रभुना दूतनी फिलीप्पले सांगं, “ऊठ, अनी दक्षिण दिशाले ती वाटकडे जाय, जी यरूशलेमपाईन गाजाकडे जास.” ती वाटना वापर सहसा कोणी करेत नही.
27 मंग तो ऊठीसन निंघना; अनी एक कूश देशना षंढ व्हता जो त्या देशनी राणी कांदके हिना मोठा अधिकारी व्हता अनी खजिनदार व्हता; तो यरूशलेममा भजनकरता जायेल येल व्हता.
28 तो घर परत जातांना आपला रथमा बठीन यशया संदेष्टाना ग्रंथ वाची राहींता.
29 तवय फिलीप्पले पवित्र आत्मानी सांगं, “तु जाईसन त्याना रथ गाठ, अनी त्यानासंगे ऱ्हाय.”
30 फिलीप्प पयतच गया तवय त्यानी त्याले यशया संदेष्टाना ग्रंथ वाचतांना ऐक; तो त्याले बोलना, “तुम्हीन जे वाची राहीनात ते तुमले समजी राहीनं का?”
31 तो अधिकारी बोलना, “जोपावत कोणी माले समजाडस नही तोपावत माले कसं समजी?” मंग त्यानी फिलीप्पले वर चढीन आपलाजोडे बसाकरता वर बलावं.
32 तो जो शास्त्रलेख वाची राहींता तो हाऊ व्हता;
“त्याले मेंढरूनामायक वध कराकरता लई गयात,
अनी जसं मेंढरू आपला लोकर कापणाराना पुढे गप्प ऱ्हास,
तसं तो आपलं तोंड उघडस नही.
33 त्यानी ती लीन अवस्थामा त्याले न्याय मिळना नही;
त्यानी पिढीना लोकसनं कोण वर्णन करी,
कारण त्याना जीव पृथ्वीवरतीन लेवाई गया.”
34 तवय षंढनी फिलीप्पले सांगं, “संदेष्टा कोणबद्दल बोली राहीना, स्वतःबद्दल की दुसराबद्दल, हाई माले सांगशात का?”
35 तवय फिलीप्प बोलाले लागना अनी या शास्त्रलेखपाईन सुरवात करीसन येशुबद्दलनी सुवार्ता सांगी.
36 मंग वाटतीन जाता जाता त्या एक जागावर पोहचनात जठे पाणी व्हतं, तवय षंढ बोलना, “दख, आठे थोडंफार पाणी शे; माले बाप्तिस्मा लेवाले काय अडचण?”
37 फिलीप्पनी सांगं, “जर तुम्हीन तुमना पुर्ण मनतीन ईश्वास धरतस तर ठिक शे.” तवय त्यानी फिलीप्पले उत्तर दिधं, “येशु ख्रिस्त देवना पोऱ्या शे असा मी ईश्वास धरस.”
38 तवय अधिकारीनी रथ उभा कराले सांगं, मंग फिलीप्प अनी षंढ असा त्या दोन्ही पाणीमा उतरनात अनी फिलीप्पनी षंढ बाप्तिस्मा दिधा.
39 मंग त्या पाणीमाईन वर वनात तवय प्रभुना आत्मा फिलीप्पले लई गया; म्हणीन तो परत षंढले दखायनाच नही; मंग तो आपली वाट धरीन आनंद करत गया.
40 इकडे फिलीप्प अजोत शहरमा दखायना; तो कैसरिया शहरमा पोहचस तोपावत वाटमा ज्या गावं लागनात तठे त्यानी सुवार्ता सांगी.