3
देवना सेवक
1 भाऊ बहिणीसवन, ज्यासले परमेश्वरना आत्मा शे त्या लोकससंगे बोलानं तसं तुमनासंगे मनाघाई बोलायनं नही, तर जसं जगीक लोकससंगे अनी त्यासनासंगे ज्या ख्रिस्तमा बालक शेतस.
2 मी तुमले दुध पाजं, जेवण दिधं नही; कारण त्या येळले तुमनामा शक्ती नव्हती, अनी अजुन बी नही;
3 कारण तुम्हीन अजुन जगीक लोकसमायक शेतस; तुमनामा हेवा अनं भांडणं शेतस, यावरतीन तुम्हीन जगीक लोकसमायक शेतस का नही? अनी तुम्हीन मनुष्यसना पध्दतघाई चालतस की नही?
4 कारण एक सांगस मी पौलना शे; अनी दुसरा सांगस, मी अपुल्लोसना शे; मंग तुम्हीन अस करीसन जगीक लोकसमायक जगी नही राहिनात का?
5 अपुल्लोस कोण शे? अनी पौल कोण शे? ज्यासनाद्वारे तुम्हीन ईश्वास ठेवा. असा सेवक शेतस; जसं प्रत्येकले प्रभुनी कराले काम देयल शे तस प्रत्येकनी काम कराले पाहिजे;
6 मी लायं, अपुल्लोसनी पाणी टाकं, पण देवनी वाढायं.
7 यामुये लावणारा काही नही अनी पाणी टाकणारा पण काही नही; पण वाढवणारा देवच सर्वकाही शे.
8 लावणारा अनी पाणी टाकणारा एकच शे, तरी प्रत्येकले देव आपआपला कष्टप्रमाणे मजुरी दि.
9 कारण आम्हीन देवना सोबती शेतस. तुम्हीन देवनं वावर, देवनी इमारत शेतस.
10 मनावर व्हयेल देवनं अनुग्रहना मानतीन मी चतुर कारागीरनामायक पाया घाला अनी दुसरा त्यानावर बांधस; तर प्रत्येकनी आपण त्यानावर कसं बांधी राहीनुत यानाबद्दल जपानं.
11 बांधेल पाया येशु ख्रिस्त शे तठे कोणी दुसरा पाया नही घालु शकस.
12 काहीजण हाऊ पाया सोनं, चांदि, महागडा दगड, लाकुड, गवत, पेंढा यासनी बांधतस.
13 तर बांधणारा प्रत्येकनं काम न्यायना दिनले उघड व्हई; तो आगसंगे प्रकट व्हई अनी प्रत्येकनं काम कसं शे यानी परिक्षा आगच करी.
14 ज्यानं कोणं त्यानावर बांधेल काम टिकी त्याले मजुरी मिळी.
15 ज्यानं कोणं काम जळी जाई त्याना तोटा व्हई, पण तो वाची जाई जसं काय आगमातीन बाहेर पडेल मायक.
16 तुम्हीन देवनं मंदिर शेतस, अनी तुमनामा देवना आत्मा ऱ्हास हाई तुमले माहीत नही का?
17 जर कोणी देवना मंदिरना नाश करी तर देव त्याना नाश करी. कारण देवनं मंदिर पवित्र ऱ्हास तसा तुम्हीन पवित्र शेतस.
18 कोणी स्वतःले फसाडाले नको, जर तुमना मातीन कोणी ह्या युगमा स्वतःले हुशार समजस तर त्यानी हुशार बनाकरता मुर्ख बनाणं.
19 कारण या जगनं ज्ञान देवसमोर मुर्खपण शे; “देव ज्ञानीसले त्यासनाच धुर्तपणमा धरस” असा शास्त्रलेख शे;
20 अनी “प्रभु ज्ञानीसना ईचारसले असा वळखस की, त्या व्यर्थ शेतस,” आखो शास्त्रलेखमा अस बी म्हणस.
21 यामुये मनुष्यसवर कोणी गर्व कराले नको, सर्वकाही तुमनं शे;
22 पौल, अपुल्लोस, केफा, जग, जिवन, मरण, वर्तमान, भविष्य, हाई सर्व तुमनं शे.
23 तुम्हीन ख्रिस्तना; अनी ख्रिस्त देवना.