4
ख्रिस्तना प्रेषित
आम्हीन ख्रिस्तना सेवक अनी देवना रहस्यना कारभारी शेतस अस तुम्हीन आमले मानानं. आखो एक गोष्टनी गरज शे ती म्हणजे कारभारी म्हणं तर तो ईश्वासु राहवाले पाहिजे. तर तुमना कडतीन किंवा मानवी न्यायालयकडतीन मना न्यायनिवाडा व्हस, तरी यानं बी माले काही वाटस नही, मी स्वतःना बी न्यायनिवाडा करस नही. कारण मनं मन जरी मना विरोधमा साक्ष देस नही, पण त्यावरतीन मी निर्दोष ठरस अस नही; मना न्यायनिवाडा करनारा प्रभु शे. याकरता त्या येळना पहिले म्हणजे प्रभुना येवाना पहिले तुम्हीन न्यायनवाडा करूच नका; तो अंधारमाधल्या गुप्त गोष्टी प्रकाशमा लई, अनी अंतःकरणमाधला ईचार बी उघड करी; तवय प्रत्येक माणुसनी वाहवाह प्रभुकडतीन व्हई.
भाऊसवन, मीनी या गोष्टीसनं वर्णन तुमनाकरता दृष्टांतना रूपमा माले अनी अपुल्लोसले लाई लेयल शेतस; यानाकरता की शास्त्रलेखपलीकडे कोणी जावाले नको हाऊ नियम आमनावरतीन तुम्हीन शिकाले पाहिजे; म्हणजे तुमनापैकी कोणीच एकमेकवर फुगावु नही. तुले कोण दुसरासपेक्षा श्रेष्ठ समजस? अनी जे तुले देयल नही अस तुनाजोडे काय शे? तुले देयल शे तरी देयल नही अस गर्व करीसन का बरं सांगत फिरस. इतलामा तुम्हीन तृप्त व्हई जायेल शेतस, इतलामा तुम्हीन धनवान व्हई जायेल शेतस, आमले सोडीन तुम्हीन तर राजा बनी जायेल शेतस; तुम्हीन राजा बनी जातात तर बरं व्हतं कारण आमले बी तुमनासंगे राजपद भेटी जातं. कारण माले वाटस, देवनी आम्हीन प्रेषितसले शेवटली जागाना अनी मरणकरता नेमेल अस पुढे करी ठेयल शे, कारण आम्हीन जगले म्हणजे देवदूतसले अनी मनुष्यसले खेळ असा व्हयेल शेतस. 10 आम्हीन ख्रिस्तमुये मुर्ख, तुम्हीन ख्रिस्तमा हुशार; आम्हीन अशक्त शेतस अनी तुम्हीन ताकदवान; तुम्हीन प्रतिष्ठीत शेतस, अनी आमले मानपान भेटत नही. 11 ह्या येळपावत आम्हीन अशक्त, भूका तिशा अनं उघडा शेतस; आम्हीन मार खातस अनी आमले घरदार नही; 12 आम्हीन आमना हातघाई कष्ट करतस, जवय आमनी निंदा व्हस तवय आम्हीन आशिर्वाद देतस, जवय आमले त्रास देतस तवय आम्हीन सहन करतस. 13 जवय आमनी बदनामी व्हस तवय आम्हीन समजाडाना प्रयत्न करतस. आम्हीन जगना गाळ, सर्व प्रकारना कचरा बनेल शेतस.
14 तुमले लाज वाटाले पाहिजे म्हणीन मी हाई नही लिखी राहीनु तर मना प्रिय पोऱ्यासप्रमाणे तुमले सुचना देवाकरता लिखी राहीनु. 15 तरी तुमले ख्रिस्तमा दहा हजार गुरू राहीनात पण जास्त बाप नही; 16 यामुये मी तुमले ईनंती करस की, मनं अनुकरण करनारा बना. 17 या कारणमुये प्रभुमा मना प्रिय अनं ईश्वासु पोऱ्या तीमथ्य याले मी तुमनाकडे धाडेल शे; तो तुमले मना शिक्षणपध्दतीनी आठवण करी दि, जसं मी सर्व ठिकाणवर, प्रत्येक मंडळीमा शिकाडस.
18 मी तुमनाकडे येस नही म्हणीन बराच जण फुगेल शेतस. 19 तरी प्रभुनी ईच्छा व्हई तर मी तुमनाकडे लवकरच येसु; तवय फुगेल काय बोलतस त्यानाकडे नही तर त्यासना सामर्थ्यकडे दखसु. 20 कारण देवनं राज्य बोलामा नही, तर सामर्थ्यमा शे. 21 तुम्हले काय पाहिजे? मी तुमनाकडे काठी लिसन येऊ का प्रेमतीन अनं नम्रताना आत्मातीन येऊ?
4:12 प्रेषित १८:३ 4:16 १ करिंथ ११:१; फिलप्पै ३:१७