5
मंडळीमा अनैतीकता
अस ऐकामा येल शे की, प्रत्येक्ष तुमनामा व्यभिचार चालु शे अनी असा व्यभिचार जो गैरयहूदी लोकसमा बी नही ऱ्हास म्हणजे तुमनापैकी एक माणुसनी आपला बापनी बायकोले ठेयल शे. तरी तुम्हीन फुगीसन बठेल शेतस; त्यानापेक्षा हाई कर्म करनारा माणुस आपलामातीन कायमना निंघी गया अस म्हणीसन शोक करत बठाले पाहिजे. मी शरीरतिन नही पण आत्मातीन तुमनामा उपस्थित शे. अनी अस समजा मी उपस्थित राहीन अस घाण काम करनारा व्यक्ती विरूध्द निर्णय दि टाकेल शे. जवय तुम्हीन आपला प्रभु येशुना नावतीन एकत्र व्हशात अनी आत्मामा बी मी तुमनासंगे राहसु, तर आपला प्रभु येशुना सामर्थ्यतीन असा मनुष्यले शरिरना नाशकरता सैतानले सोपी देवाले पाहिजे, याकरता की, त्याना आत्मा प्रभु येशुना दिनसमा उध्दार पावाले पाहिजे.
हाई तुमनं बढाई करनं शोभस नही, थोडसं खमीर पुरा गोळाले फुगाडस, हाई तुमले माहीत नही का? म्हणीसन जुनं खमीर काढी टाका, यानाकरता की तुम्हीन जसं बेखमीर लोके शेतस तसं तुम्हीन नवा गोळा व्हई जावानं, कारण आपला वल्हांडणना यज्ञपशु जो ख्रिस्त त्यानं अर्पण व्हई जायेल शे. यामुये जुना खमीरपाईन तसच वाईटपणा अनं दुष्तपणा यासना खमीरतीन नही तर सात्विकपणा अनं खरंपण हया भाकरीसघाई आपण सण साजरा कराले पाहिजे.
तुम्हीन व्यभिचारीसनी संगत धरू नका अस मी तुमले आपला पत्रमा लिखेल व्हतं. 10 या जगना व्यभिचारी, लोभी, लुटारू अनं मुर्तिपुजक यासनी संगत धरू नका अस मी नही सांगस; कारण ती संगत धरी नही तर तुमले जगमातीन जानं पडी. 11 तर तुमले जे लिखेल व्हतं त्याना अर्थ असा की, भाऊ मानेल असा कोणी व्यभिचारी, लोभी, मुर्तिपुजक, गाळ्या देणारा, दारूड्या, किंवा लुटारू व्हई तर असासनी संगत धरानी; त्यासना पंगतमा बसानं नही.
12 कारण बाहेरनासना न्याय कराशी मना संबंध? काय तुमले त्यासना न्याय नही कराना का ज्या मझार शेतस. 13 बाहेरसना न्याय तर परमेश्वर करस, पण तुम्हीन असा दुष्टसले आपलामातीन बाहेर काढा.
5:6 गलती ५:९