पौलाने लिहलेले करिंथकरास दुसरे पत्र
पौलनी लिखेल करिंथकरसले दुसरं पत्र
वळख
करिंथकरसले हाई दुसरं पत्र प्रेषित पौल यानी येशु ख्रिस्तना ५५-५६ वरीस नंतर लिखं१:१आठे करिंथकरासले ज्या दोन पत्र पौलनी लिखात त्यानामाधलं हाई दुसरं पत्र शे. बराच विद्वान अस समजतस की, या पत्रसना पहिले करिंथकरसले एक मोठं कडक पत्र लिखेल व्हतं. यानाबद्दल तो२:३-४ या वचनसमा उल्लेख करस, पण या पत्रसन्या प्रती आपलाकडे नही शेतस. हाई पत्र पौलनी मासेदोनियामातीन लिखेल व्हई अशी संभावना शे. २:१३
दुसरं करिंथ हाई एक अस पत्र शे की, ज्यामा वैयक्तिक अनी भावनात्मक गोष्टीसनी चर्चा शे. या पत्रमा पौलनी चांगलाच अहवाल करिंथकरसबद्दल तिता कडतीन मिळाडा अनी त्यानाबद्दल तो आनंद व्यक्त करस. या पत्रमा दान देवाबद्दलनं नविन करारना दृष्टीकोणतीन हाई शिक्षण देयल शे, अस दखास. हाई शिक्षण त्या भागमा दखास ज्या भागमा पौल दानना उल्लेख करस की, जो यरूशलेमना ईश्वास ठेवणारासले मदत करता गोया करेल व्हती. ८–९
मंडळीमा काही लोके पौलना विरोधमा व्हतात अनी काही बाहेरतीन येल लबाड प्रेषित हाई विरोधना फायदा लिसन पौलले दाबीन स्वतःनी उन्नती करी राहींतात. त्यासनी पौलना अधिकारवर प्रश्न उपस्थित करात. यामुये येशु ख्रिस्तना प्रेषित या नातातीन जो अधिकार त्याले भेटेल शे, त्या अधिकारले शेवटला भागमा तो दखाडस.
रूपरेषा
१. पौलना करिंथ मंडळीले नमस्कार. १:१-७
२. पौल आपला प्रवास योजनामा बदल करस, करिंथना लोकसना अहवाल अनी त्यावर प्रतिक्रीया. १:८–७:१६
३. यरूशलेममा राहणारा ईश्वास ठेवणारासकरता वर्गणी गोळा कराबद्दल पौलनी सुचना. ८:१–९:१५
४. शेवट पौल आपला प्रेषितपणना बचाव करस अनी आपली येणारी भेटबद्दल इशारा करस. १०:१–१३:१०
1
करिंथ आठली देवनी मंडळीले अनी तिनासंगे अखया प्रदेशमातील सर्व पवित्र लोकसले देवनी ईच्छातीन प्रभु येशुना शिष्य बनेल पौल अनी आपला बंधु तिमथ्य यासनाकडतीन;
देव आपला पिता अनं प्रभु येशु ख्रिस्त यासनाकडतीन तुमले कृपा अनी शांती असो.
पौल देवना उपकार मानस
आपला परमेश्वर अनी प्रभु येशु ख्रिस्तना बाप जो देव, दया करनारा देवबाप अनी सर्वासले सांत्वना देणारा देव, तो धन्यवादित असो.
तो आमनावरला सर्व संकटमा आमले दिलासा देस, त्या मदतमुयेच आमले स्वतः देवकडतीन दिलासा मिळस, त्या मदतमुये ज्या कोणी, कोणता बी संकटमा शेतस त्यासले मदत कराले आम्हीन समर्थ व्हवाले पाहिजे, कारण ख्रिस्तनं दुःख जसं आमनाकरता भरपुर व्हस तसं ख्रिस्तनी मदत बी आमले भरपुर व्हस, आमनावर संकट येस, ते तुमले मदत अनी तुमना उध्दार व्हवाले पाहिजे म्हणीन येस; आमले दिलासा मिळस ती यानाकरता की तुमले मदत मिळाले पाहिजे अनी ज्या दुःख आम्हीन सोसतस ती तुम्हीन धीरतीन सहन करानी. तुमनाबद्दल आमनी आशा भक्कम अशी शे, कारण आमले माहीत शे की जशा तुम्हीन आमना दुःखमा भागीदार शेतस, तसच तुम्हीन मदतना बी भागीदार शेतस.
भाऊसवन, आशिया प्रांतमा आमनावर येल संकटबद्दल तुम्हीन अजाण ऱ्हावाले पाहिजे अशी आमनी ईच्छा नही; ते अस की, आम्हीन आमना सहनशक्ती पेक्षा जास्ती गोष्टीसमा दडपाई गवुत; ईतलं की, आम्हीन जगसुत किंवा जगावुत नही अस आमले व्हई गयतं. आम्हीन मरणारच शेतस अस आमनं मन आमले सांगी राहींत; पण आम्हीन स्वतःवर नही तर जो मरेलसले ऊठाडणारा देव शे फक्त त्यानावरच आशा ठेवाले पाहिजे, यानाकरता हाई व्हयनं, 10 त्यानी आमले ईतला मोठा प्राणसंकट माईन वाचाडं, अनी तो आते वाचाडी राहीना, तो आमले यानापुढे बी वाचाडी, अशी त्यानावर आमनी आशा शे. 11 तुम्हीन बी आमनाकरता प्रार्थना करीसन आमले मदत करा; म्हणजे आमले देवकडतीन आशिर्वाद भेटी अनं त्यानाबद्दल बराच लोके देवना उपकार मानतीन.
पौलनी योजनामा बदल
12 आमले अभिमान वाटानं कारण म्हणजे आमना मननी साक्ष हाई शे की, मानवी ज्ञानतीन नही, तर देवनी कृपा, देवनी देयल पवित्रतातीन अनी सात्विकपणतीन आम्हीन जगमा अनी विशेष करीसन तुमनासंगे वागनुत. 13-14 आम्हीन तेच लिखतस जे तुम्हीन वाचतस अनी समजतस, तरी बी तुम्हीन आमले थोडं समजतस, मी आशा करस की शेवटी तुम्हीन आमले पुरं समजी लेशात, यामुये जवय येशु ख्रिस्त परत ई जसं आते तुम्हीन आमनावर गर्व करतस तसं आम्हीन तुमनावर गर्व करसुत.
15 असा ईश्वास करीसन तुमले दुप्पट आशिर्वाद मिळाले पहिजे म्हणीसन, मी पहिले तुमनाकडे येवाले पाहिजे, 16 तुमना कडतीन मासेदोनिया जावं अनी नंतर मासेदोनियातीन परत तुमनाकडे यावं, अनी तुम्हीन माले यहूदीयाकडे धाडी देवानं. 17 तर असा मना बेत व्हता, तवय मी चंचलपणा करा का? किंवा माले, “हा, हा” म्हणता यावं अनी “नही, नही” बी म्हणता यावं म्हणीसन जे मी ठरावस ते स्वार्थीपणतीन ठरावस का? 18 देव ईश्वासु शे, आमनं तुमनासंगे बोलनं, हा, नही, अस नही शे. 19 कारण देवना पोऱ्या येशु ख्रिस्त ह्याना घोषणा आमनाकडतीन, म्हणजे मी, सिल्वान अनी तिमथ्य यासनाकडतीन तुमनामा व्हयनी ती “हा” अनं “नही” अशी व्हयनी नही, तर त्यामा देवनं “हा” हाईच व्हयनं. 20 देवना वचनं कितला बी राहोत, त्यानामा “हा” हाईच शे; यामुये देवनं गौरव व्हवाले पाहिजे म्हणीसन त्यानाकडतीन “आमेन” हाई बी शे. 21 जो आमना अभिषेक करीसन तुमले ख्रिस्तमा पक्क करस; तो देव शे. 22 आम्ही त्याना शेतस अनी आमनावर त्याना शिक्का शे, त्यानी त्याना पवित्र आत्मा आमले देयल शे.
23 देवले साक्षी ठिसन मी मना जिवनी शप्पथ लेस की! मी करिंथ आठे येवानं राहू दिधं कारण माले तुमनावर संताप कराना नव्हता. 24 आम्हीन तुमना ईश्वासवर सत्ता करतस अस नही, तर आम्हीन तुमना आनंदना सोबती शेतस, तुमनी परिस्थिती शे, ती तुमना ईश्वासतीन शे.
1:1 प्रेषित १८:१ 1:8 १ करिंथ १५:३२ 1:16 प्रेषित १९:२१ 1:19 प्रेषित १८:५