2
मी स्वतः हाऊ निश्चय करेल व्हता की, तुमले दुःख देवाले परत फिरीन येवानं नही. कारण की जर मी तुमले दुःख देस, तर ज्याले मनापाईन दुःख व्हस, तर त्यानाशिवाय माले आनंद देणारा कोण शे? मी हाईच तुमले लिखेल व्हतं, हाई यानाकरता की मी येवावर, ज्यासनाकडतीन माले आनंद व्हणार शे त्यासकडतीन माले दुःख व्हवाले नको, माले तुमना सर्वासबद्दल असा भरवसा शे की, मना आनंद तो तुमना सर्वासना आनंद शे. मी भलताच संकटमा अनी मनस्तापमा व्हतु तवय अश्रु ढाळीसन तुमले लिखेल व्हत; तुम्हीन दुःखी व्हवाले पाहिजे म्हणीसन नही, तर तुमनावर जे मनं विशेष प्रेम शे, ते तुम्हीन वळखाले पाहिजे म्हणीसन मी लिखं.
चुका करनारासले क्षमा
कोणी दुःख देयल व्हई तर त्यानी ते मालेच नही, तर थोडफार तुमले सर्वासले बी देयल शे. मी हाई बोलानं कारण माले त्यानाबद्दल कडक व्हवानी ईच्छा नही शे. असा माणुसले बहुमततीन जी शिक्षा दिधी तीच त्याले पुरी शे. त्या माणुसनी आपला दुःखमा बुडीन ऱ्हावाले नको म्हणीसन, उलट तुम्हीन त्याले माफ करीसन त्याले दिलासा देवाना, हाई चांगलं शे. यामुये मी तुमले ईनंती करस की, तुम्हीन त्यानावर प्रिती करतस हाई त्याले दखाडा. हाई मी यानाकरता लिखेल व्हतं की, तुम्हीन सर्व प्रकारतीन आज्ञा पाळणारा शेतस का नही यानं माले प्रमाण पटाले पाहिजे. 10 तुम्हीन एखादाले कसाबद्दल तरी माफ करतस त्यानाबद्दल त्याले मी बी माफ करस. कारण मी कसाबद्दल तरी माफ करेल व्हई तर ज्या कसाबद्दल माफ करं ते तुमनाकरता ख्रिस्तनासमोर करेल शे, 11 यानाकरता की सैताननं आपलावर डावपेच चालाले नको; त्याना ईचार आपले समजस नही अस नही.
त्रोवासामा पौलले तरास
12 जवय मी ख्रिस्तनी सुवार्ता सांगाकरता त्रोवासा शहरले वनु, तवय तठे माले काम कराकरता देवना ठायी दार उघडनं. 13 पण तीत नावना मना भाऊ माले भेटना नही, म्हणीसन मना जिवले चैन पडनं नही, मंग तठला लोकसना निरोप लिसन मी मासेदोनिया प्रांतमा निंघी गऊ.
ख्रिस्त कडतीन जयोत्सव
14 जो देव आमले कायम ख्रिस्तमा जयोत्सवतीन लई जास, अनी सर्व ठिकाणे आमनाकडतीन ख्रिस्तबद्दलना ज्ञानना सुंगध प्रकट करस. त्यानी स्तुती असो. 15 तारण भेटी राहीनात असा अनी नाश व्हई राहीनात असा लोकसकरता आम्हीन देवले ख्रिस्तना सुंगध असा शेतस. 16 ज्या हारी जायेल शेतस त्यासले मृत्युना वास अनी ज्यासनं तारण व्हई राहीनं जिवनदाई गंध शे. हाई काम कराले कोण लायक शे. 17 बराच लोके आपला फायदाकरता देवना वचनमा भेसळ करीसन ते बिघाडी टाकतस तसा आम्हीन नही, तर जसं आमले देवनी धाडं. आम्हीन शुध्द मनतीन ख्रिस्तना सेवक या नातातीन बोलणारा शेतस.
2:12 प्रेषित २०:१