4
मातीना भांडामा धन
1 देवनी दयामुये, हाई सेवा आमले देवामा येल शे, म्हणीसन आम्हीन हिम्मत सोडतस नही;
2 आम्हीन लाज वाटी असा गुप्त गोष्टी सोडी देयल शेतस, आम्हीन कपटतीन चालतस नही, अनी देवना वचनबद्दल कपट करतस नही, तर सत्य प्रकट करीसन देवसमक्ष आम्हीन स्वतःले प्रत्येक मनुष्यना मनमा चांगला ठरावतस,
3 जर आम्हीन जी सुवार्ता सांगतस ती झाकेल शे तर हाई झाकेल त्यासनाकरता शे ज्यासना नाश व्हई राहीना.
4 त्यासनाबद्दल या युगना राजा सैतान हाऊ ईश्वास नही ठेवनारा लोकसनं मनसले आंधय करेल शे, यानाकरता की देवनी प्रतिमा जो ख्रिस्त त्याना तेजोमय सुवार्ताना प्रकाश त्यासले दिसाले नको.
5 आम्हीन आमनं नही, तर ख्रिस्त येशु हाऊ देव अशी त्यानी घोषणा करतस, अनी येशुमुये आम्हीन तुमना दास अशी स्वतः घोषणा करतस.
6 अंधारमाईन उजेड चमकी, अस जो देव बोलना ते, येशु ख्रिस्तना तोंडवरलं देवनं जे तेज शे त्यानं ज्ञान दखावाले पाहिजे म्हणीसन त्यानी आमनं अंतःकरण प्रकाशीत करेल शे.
7 हाई आत्मिक संपत्ती आमनामा शे ज्या आम्हीन मातीना भांडानामायक शेतस, हाई यानाकरता शे की महान सामर्थ्य देवकडतीन व्हस, आमनाकडतीन व्हस नही हाई समजाले पाहिजे.
8 आमनावर चारीमेरतीन संकट वनात, तरी आम्हीन संपनुत नही; घोटाळामा पडनुत तरी निराश व्हयनुत नही;
9 आमना पाठलाग व्हयना तरी बी त्यासनी आमना स्विकार करा; आम्हीन खाल पडनु तरी आमना नाश व्हयना नही.
10 आम्हीन येशुनं मरण कायम आमना शरिरमा लिसन फिरतस कारण येशुनं जिवन आमना शरिरमा प्रकट व्हवाले पाहिजे.
11 कारण आम्हीन जिवन जगी राहिनुत, ते येशुमुये मरणकरता कायमना सोपाई जाई राहीनुत, यानाकरता की येशुनं जिवन बी आमना मरेल शरिरमा प्रकट व्हवाले पाहिजे.
12 आमनामा तर मरणनं कार्य पण तुमनामा तर जिवन आपलं कार्य चालाडस.
13 “मी ईश्वास धरा म्हणीसन बोलनु;” जश शास्त्रलेख म्हणस जो ईश्वासना आत्मा तोच आत्मा आमनामा शे, म्हणीसन आम्हीन ईश्वास धरतस अनी बोलतस बी.
14 हाई आमले माहित शे की ज्यानी प्रभु येशुले ऊठाडं तो येशुसंगे आमले बी ऊठाडी, अनी तुमनासंगे उभं करी.
15 सर्वकाही तुमनाकरता शे, यानाकरता की जी कृपा बराच जणसवर व्हईसन विपुल व्हयनी. ती देवना गौरवकरता धन्यवादमा वाढानं कारण बनाले पाहिजे.
ईश्वासतीन जगनं
16 यामुये आम्हीन हिम्मत सोडतस नही; आमनं बाहेरनं शरीर मरी जाई राहीनं, तरी अंतर आत्मा दिनदिनमा नवा व्हई राहीना.
17 कारण आमनावर थोडा येळकरता येनारं अनी धाकलं संकट हाई आमनाकरता मोठा प्रमाणमा सार्वकालिक गौरव लई येस;
18 आम्हीन दखावणारी वस्तुकडे नही, तर नही दखावणारी वस्तुकडे ध्यान देतस; कारण दखावणारी वस्तु थोडा येळकरता शे, पण नही दखावणारी वस्तु सार्वकालिक शे.