5
आमना स्वर्गीय शरीर
1 कारण आमले माहीत शे की, आमनं पृथ्वीवरलं मंडपनासारखं घर मोडं तरी, स्वर्गमा देवकडतीन भेटेल एक घर शे; ते हाततीन नही बांधेल, सार्वकालिक अस शे.
2 ह्या घरमा असतांना आम्हीन स्वर्गरूपी कपडा घालानी ईच्छातीन कन्ही राहीनुत.
3 अनी आम्हीन ह्या कपडा घालसुत तवय उघडा सापडावुत नही,
4 जोपावत आम्हीन ह्या संसारना मंडपमा शेतस, तोपावत आम्हीन वझाखाल दाबाईसन कन्ही राहीनुत, कारण आमले जगीक शरीर नही तर स्वर्गीय शरीर पाहिजे याकरता की जे काही मरणनं शे ते जिवनना द्वारा गिळाई जाई,
5 ज्यानी आमले यानाकरता तयार करं तो देव शे, त्यानी आमले बदलामा पवित्र आत्मा देयल शे.
6 यामुये आम्हीन कायम हिम्मत ठेवतस, अनी हाई बी ध्यानमा ठेवतस की जोपावत आम्हीन शरिरमा राहतस जे आमनं जगीक घर शे, तोपावत प्रभुनापाईन दुर शेतस.
7 आम्हीन ईश्वासतीन चालतस जे आम्हीन दखतस त्यानामायक चालतस नही.
8 आम्हीन धैर्य धरतस, अनी शरिरना बाहेरना प्रवासी राहिसन बी प्रभुनासंगे स्वर्गीय घरमा ऱ्हावाले आमले अधिक चांगलं वाटस.
9 यामुये आम्हीन पृथ्वीवर राहीनुत किंवा त्यानासंगे राहिनुत तरी त्याले खूश करानी आमनी हौस शे.
10 कारण आपले सर्वासले ख्रिस्तना न्यायासनना पुढे खरा अर्थतीन प्रकट व्हवाले पाहिजे, यानाकरता की त्यानी प्रत्येकले, त्यानी शरीरतिन करेल गोष्टीसनं फळ मिळाले पाहिजे; मंग त्या चांगल्या राहोत नही तर वाईट राहोत.
ख्रिस्तद्वारा देवसंगे मैत्री
11 आम्हीन प्रभुनं मानीसन लोकसले समजुत घालतस; देवले तर आम्हीन प्रकट शेतस; अनी तुमना मनमा बी प्रकट शेतस, अशी आशा आम्हीन धरतस.
12 आम्हीन तुमना जोडे परत आमनी वाहवाह करतस नही, तर तुमले आमनाबद्दल अभिमान करानी येळ येवाले पाहिजेल म्हणीसन अस बोलतस; यानाकरता की जो मनमा नही तर तोंडवर अभिमान बाळगस त्याले तुमले उत्तर देता येवाले पाहिजे.
13 आम्हीन येडा व्हयनुत तर ते देवनाकरता, अनी आम्हीन शुध्दीवर राहीनुत तर ते तुमनाकरता शेतस.
14 ख्रिस्तनं प्रेम आमले आवरी धरस, आम्हीन अस समजतस की एक सर्वाकरता मरना, तर सर्व मरनात.
15 अनी तो सर्वाकरता याकरता मरणा की ज्या जगतस त्यासनी यानापुढे स्वतःकरता नहीतर त्यानाकरता जो मरना अनी परत ऊठना त्यानाकरता जगानं.
16 आत्तेपाईन आम्हीन कोणले मनुष्यना समजनुसार वळखतस नही; अनी जरी आम्हीन ख्रिस्तले मनुष्यना समजनुसार वळखेल व्हतं तरी आते त्याले यानापुढे तसं वळखतस नही.
17 जर कोणी ख्रिस्तमा शे तर तो नवी उत्पत्ति शे; जुनं ते व्हई गयं; दखा, ते नवं व्हयेल शे.
18 हाई सर्व देवपाईन शे; त्यानी तुमले आमले जोडानं काम ख्रिस्तनाद्वारा करं, अनी एकमेकसले जोडानी सेवा आमले दिधी.
19 म्हणजे जगमातील लोकसना पापे त्यासनाकडे नही मोजता, देव ख्रिस्तमा आपलासंगे जगले जोडी राहिंता; अनी त्यानी आमनाकडे लोकसले जोडानं वचन सोपी दिधं.
20 यामुये देव आमना कडतीन बोध करी लेवानामायक आम्हीन ख्रिस्तना बाजुतीन वकिली करतस; देवनासंगे जोडेल तुम्हीन व्हवाले पाहिजे, अशी मनी ख्रिस्तना कडतीन ईनंती करस.
21 ज्याले पाप माहित नव्हतं, त्याले त्यानी तुमना आमनाकरता पाप अस कर; यानाकरता की आपण देवना नितीमान व्हवाले पाहिजेल.