32
मिसर राजानी तुलना मगरनीसंगे
1 बारावा वरीसले, बारावा महीनाना पहिला दिन परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं की
2 मानवपुत्रा, मिसर देशना राजा फारो यानाबारामां विलाप कर; त्याले सांग, राष्ट्रासमां तुले सिंहनी ऊपमा देयेल व्हती, तरी तु महानंदमासला मगरनामायक शे; तु तुन्या नदीसमां उसळया मार्यात; तुना पायघाई पानी गढूळ करं; अनी त्यासन्या बठया नदया घाण कर्यात.
3 प्रभु परमेश्वर सांगस, मी बराच राष्ट्रासकडतीन तुनावर मना जायी टाकसू; त्या तुले मना जायासघाई बाहेर वढी काढतीन.
4 मी तुले जमीनवर सोडी दिसू; उघडा मैदानमां तुले फेकी दिसू, आकाशमासला बठा चिडा तुनावर बसतीन आशे मी करसू, सर्वा पृथ्वीवरना वनपशूसना तुना मांसघाई तृप्त करसू.
5 मी पर्वतवर तुना मांस ठेवसू; तुना धिप्पाड शरीरघाई खोरा भरसू,
6 तुना रक्तप्रवाहघाई देश बुडाई टाकसू; तो पर्वतले जायी लागी, बठा नदीनाला तुना रंगतघाई भरतीन.
7 मी तुले नष्ट करसू तवय मी आकास झाकसू अनी तठेना बठा निस्तेज करसू; मी सुर्य ढगसघाई झाकी टाकसू, चंद्र प्रकास देवावू नही.
8 मी आकासमासला बठा तारा तुनावर निस्तेज करसू; मी तुना देशवर अंधारी आणसू, आशे प्रभु परमेश्वर सांगस.
9 ज्या राष्ट्र, ज्या देश तुना वयखना नहीत, तठे मी तुना नि:पात करानी बातमी प्रसिध्द करसू, तवय मी बराच राष्ट्रसन मन भ्याई जातीन.
10 बराच राष्ट्रे तुले दखीसनं भयचकीत व्हतीन आशे मी करसू; मी मनी तलवार त्यासना राजासनीसमोर परजसू, तवय त्या थरथर कापतीन; तुना पतनना दिनले आपला जिव भ्यायीसनं त्याच येयले थरकाप व्हयी.
11 कारन प्रभु परमेश्वर सांगस, बाबेलना राजानी तलवार तुनावर यि.
12 वीरसनी तलवारघाई मी तुना लोकसमुदाय पाडसू; त्या सर्वा राष्ट्रसमासला माणसे भयंकर शेतस; त्या मिसरना गर्व हरन करतीन, त्यासना सर्वा लोकसमुहना विध्वंस व्हयी.
13 महाजलनाजोडे त्यासना सर्वा गुरढोरसना नाश करसू; यानामोरे कोनताच माणुसना पायघाई अनी जनावरसना खुरसघाई ती गढूय व्हवावू नही.
14 तवय मी त्यासना जलाशय स्वच्छ करसू, त्यासन्या नदया तेलपरमानं वाहत्या करसू; आशे प्रभु परमेश्वर सांगस.
15 मी मिसर देशमासला बठा रहीवाशीसले मारीसनं त्या देशना जंगल करसू अनी देशमासला सर्वकाही नाहीसं करीसनं तो उजाड करसू, तवय त्यासले समजी की मी परमेश्वर शे.
16 हाई विलापगीत लोके शोकपुर्वक म्हनतीन; राष्ट्रसन्या पोरी शोकपुर्वक म्हनतीन; मिसर देश अनी त्यामासला सर्वा लोकसमुह याकरता ते शोकपुर्वक म्हनतीन. आशे प्रभु परमेश्वर सांगस.
मरेलसना संसार
17 बारावा वरीसले, महीनानी पोर्णिमेले परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं की;
18 मानवपुत्रा, मिसरी लोकसमुहकरता विलाप कर; त्यासले, मिसरन्या पोरीसले अनी गाजेल राष्ट्रसन्या पोरीसले खडामां उतरनारसनीसंगे अधोलोकमां ढकली देय.
19 तु सुंदरतातीन कोनीपेक्षा वरचढ शे?
चाल, खाल उतर,
अनी बेसुंत्यासनीसंगे जायीसनं पड.
20 तलवारघाई वध करेलसनीसंगे त्या जायी पडतीन, तिले तलवारनी हवाली करेल शे; तिले अनी तिना बठा समुहले वढी लयी जावा.
21 वीरसमां ज्या प्रमुख शेतस त्या त्यासनासंगे अनी त्यासना सहाय्यकर्तासनीसंगे अधोलोकमाईन बोलतीन; त्या खाल उतरेल शेतस; हया बेसुंती तलवारघाई वध करीसनं तठे पडेल शेतस.
22 "अश्शुर अनी त्याना बठा समुदाय तठे शे; त्यासन्या कबरा त्यासन्या कबरासनी आजुबाजूले शेतस; त्या बठा तलवारघाई वध करीसनं तठे पडेल शेतस.
23 त्यासन्या कबरा खडामां तयले शेतस; त्यासन्या कबरासनी आजुबाजूले त्यासना समुदाय शे; जीवतसनी भुमीले ज्यासनी दहशत घाली त्या बठा वध व्हयेल शेतस, तलवारघाई पडेल शेतस.
24 "तठे एलाम शे अनी त्यानी कबरनी आजुबाजूले त्याना बठा समुदाय शे; त्या जीवतसनी भुमीले दहशत घालेत त्या बठा वध व्हयेल शेतस, त्या बेसुंती अधोलोकी जायेल शेतस; खडामां उतरनारासनीसंगे त्या अप्रतिष्ठा व्हयेल शेतस.
25 त्यासनी त्यानाकरता अनी त्यान्या सर्वा लोकसमुदायकरता वध करेलसमां शय्या तयार करले शे; त्यासन्या आजुबाजूले त्यासन्या कबरा शेतस; त्या बठा बेसुंती लोके तलवारघाई ठार व्हयेल शेतस, त्यासनी जीवतसनी भूमी दहशतघाई भरी म्हनीसनं खडामां उतरनारासनीसंगे त्या अप्रतिष्ठा पावेल शेतस. वध करेलसमां त्यासले ठेयेल शे.
26 "तठे मेशेख, तुबाल अनी त्याना बठा समुह शेतस; त्यासन्या आजुबाजूले त्यासन्या कबरा शेतस; त्यासनी जीवतसनी भूमी दहशतघाई भरी म्हनीसनं त्या बठा बेसुंती लोके तलवारघाई ठार व्हयेल शेतस,
27 बेसुंती लोकेसमाईन ज्या वीर समरांगणमां पडीसनं शस्रासह अधोलोकी गयात अनी ज्यासन्या तलवारी त्यासना उसाखाल ठेवामां उन्यात आशेसनासंगे पडी नही राहीनात का? कारन जीवतसनी भुमीमां त्या वीरसले दहशत घालेत, म्हनीसनं त्यासना पाप त्यासना हाडमां शेतस.
28 तु बेसुंती लोकेसमां भंग व्हशी अनी तलवारघाई वध करावर तुबी पडी राहाशी.
29 तठे अदोम, त्याना राजे अनी त्याना सरदार हयाबी शेतस; त्या शुर राहीसनं त्यासले तलवारघाई ठार करताचबरोबर ठेयेल शे; त्यासले बेसुंती लोकेसनीसंगे अनी खडामां उतरनार्यासनीसंगे ठेयेल शे.
30 उत्तरकडला सरदार अनी वध करेलसनीसंगे उतरीसनं जायेल सीदोनी हया सर्वा तठे शेतस, त्यासना शौर्यमुये त्यासना वचक बसेल व्हतं तरी त्यासनी अप्रतिष्ठा व्हयनी; त्य बेसुंती माणसे तलवारघाई वध करताचबरोबर पडेल शेतस अनी खडामां उतरनारासनीसंगे लजित व्हयेल शेतस.
31 फारो त्यासले दखी तवय तो आपला सर्वा लोकसमुदायनीबारामां समाधान व्हयी; फारो अनी त्याना सैनिक यासले तलवारघाई वध करी टाक, आशे प्रभु परमेश्वर सांगस.
32 मी फारोले जीवतसनी भुमीवर दहशत घाली तरी तो अनी त्याना सर्वा लोकसमुह यासले बेसुंती लोकेसमां तलवारघाई वधेलसनीसंगे ठेयेल शे, आशे प्रभु परमेश्वर सांगस.