31
मिसरनी तुलना देवदारनी झाडनीसंगे व्हसं
अकरावा वरीसले, तिसरा महीना सुरुवातले परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं की "मानवपुत्रा," मिसर देशना राजा अनी
त्याना लोकसमुह यासले ईचार की
तु मोठापनतीन कोनामायक शे?
दख, अश्शुर हाऊ लबानोना एक गंधसरु राहीसनं
त्याले सुंदर फांदया फुटन्यात,
त्यानी सावली दाट व्हयनी, तो उचा वाढीसनं त्याना शेंडा मेघमंडळले जायीसनं भिडनं.
पानीनी त्याले पोसं, जलाशयनी त्याले वाढावं,
तठेन निघनारा प्रवाह लागवड करेल
सर्वा मळासमां खेळत राहे;
अनी त्याना पाट जंगलमा सर्वा झाडसले जायी पोहचेत.
जंगलमासला दुसरा झाडसपेक्षा त्यानी उची मोठी व्हयनी,
पानी बराच राहावामुये
त्याले फाटा बराच फुटनात अनी त्यान्या फांदया लांब पसरन्यात.
आकासमासला बठा चिडा त्यासना फाटाफाटासमां खोपा करेत;
त्यासना खांदाना आधारतीन सर्वा पोर्‍या व्हतात,
त्यासनी सावलीमां मोठमोठला राष्ट्र वस्ती करी राहेत.
असं तो मोठा व्हयीसनं त्याले लांब लांब फाट फुटनात
म्हनीसनं तो भलता सुंदर दखाये,
कारन त्याना* मुय मोठा तलावनाजोडे व्हतात.
देवना बागमासला देवदारुनीघाई त्याले झाकता जमे नही;
सुरुन्या फांदया त्यान्या तोडना नही व्हतात.
अर्मोनवृक्ष त्याना शाखाना तोडनं नही व्हतं;
देवना बागमासला कोणतच झाड त्यानी बराबरी करनारा नही व्‍हतात.
मी त्याले असंख्य फाटया ते एवढ सुंदर व्हयनं की
देवना एदेन बागमासला सर्वा झाडे त्याना हेवा करेत.
10 त्यामुये प्रभु परमेश्वर सांगस, त्यानी सोतालेच उच करेल शे, आपला शेंडाघाई त्यानी मेघमंडयीले भेदेल शे; तो उचा व्हवामुये त्यानं मन उन्मत व्हयेल शे. 11 म्हनीसनं मी त्याले एक ताकदवान राष्ट्रनी हातमां दिसू.तो खात्रीतीन त्याना समाचार लि; त्याना दुष्टतामुये मी त्याना त्याग करेल शे. 12 दुसरा राष्ट्रसमासला परका लोकेसनी त्याले भयंकर छेदी टाकेल शे; अनी त्याले फेकी दिद्; त्यान्या फाटया पर्वतवर अनी बठा खोरामां पडेल शेतस; देशना बठा नालानालासमां त्यान्या फाटया मुडीसनं पडेल शेतस; पृथ्वीवरना बठा राष्ट्र त्यानी सावलीमाईन जायेल शेतस. 13 त्या पडेल झाडसपान आकासमासला चिडा जायीसनं बसतसं; बठा वनपशु त्यान्या फाटयासमां येतस. 14 पानीनाजोडे लायेल कोनतबी झाडनी आपली उचीमुये गर्व कराले नको; आपला शेंडाघाई मेघमंडयले भेदाले नको, पानीनी पोसेल झाडनी आपली उचीमुये सोतावर ईस्वास ठेवानं नही; म्हनीसनं हाई घडेल शे, कारन त्या बठासले मृत्युना, अधोलोकना स्वाधीन करामा येयल शे; ज्या खडामां मानवपुत्र जातसं तठे त्यासलेबी जावाले लायेल शे.
15 प्रभु परमेश्वर सांगस, ज्या दिन तो अधोलोकी गया त्या दिन मी विलाप कराडं; त्यानाकरता मी जलनिधी झाक, त्यानं प्रवाह बंद करं, महापुर रोखात, त्यासनाकरता मी लबानोनले काय ठिक्कर करी टाक; त्यानाकरता जंगलमासला सर्वा झाडं म्लानवदन व्हयनं. 16 खडामां जानारासनीसंगे मी त्याले अधोलोकी ढकली दिद् तवय त्याना पडानं आवाजघाई मी राष्ट्रसले थरथर कापाडं; तवय पृथ्वीना मजारनी भागमासला एदेनना बठा झाडे, पानीमां पोसेल अनी अति सुंदर आशे लबानोन झाड समाधान पावनात. 17 राष्ट्रसमाईन त्यानी सावलीमां बसनारा त्याना सहाय्यक त्याबी त्यासनासंगे तलवारघाई ठार करेलसमां अधोलोकी गयात.
18 तु वैभवतीन अनी मोठापनतीन ऐदेनमासला झाडसमाईन कोणा तोडीना शे? तुले तर एदेनमासला झाडेसनीसंगे अधोलोकमां ढकलतीन अनी तलवारघाई ठार व्हयेलसनीसंगे बेसुंतीसमां त्या पडी राहातीन. फारो अनी त्याना लोकसमुदाय यासनी आशी गत व्हयी, आशे प्रभु परमेश्वर सांगस.
* 31:7