30
मिसर देशले परमेश्वरना दंड
1 परत परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं की,
2 "मानवपुत्रा," संदेश दिसनं सांग, प्रभु परमेश्वर सांगस
तो दिन, आशे हाहाकार करा.
3 कारन दिन जोडे यि लागेल शे, परमेश्वरना दिन यि लागेल शे;
तो ढगना दिन राही; तो अधर्मीसना शासन दिन राही;
4 तवय मिसर देशवर तलवार यि,
लोकेसना वध व्हयीसनं मिसरमां पडतीन,
तवय कूशमासला लोकेसले वेदना व्हतीन;
मिसर समुदाय हिसकावामां यि;
त्याना पाय मोडी टाकतीन.
5 कुशी, पुटी, लुदी, सर्व मिश्र जाती अनी कुबी, अनी त्यासनासंगेना करारमदार करेल देशना लोके त्यासनासंगेच तलवारघाई पडतीन.
6 प्रभु परमेश्वर सांगस, मिसर देशले आधार देनारा लोके पडतीन, आशे प्रभु परमेश्वर सांगस,
7 त्या विरान देशमां उद्ध्वस्त व्हयीसनं पडतीन, उजाड नगरमां त्यासना नगरे उद्ध्वस्त व्हयीसनं पडतीन.
8 मी मिसरले आग लावसू अनी त्याना बठा मदतनीस नष्ट व्हतीन; तवय त्यासले समजी की मी परमेश्वर शे.
9 "त्या दिन त्या नक्कीच कूशी लोकेसले घाबरावाकरता मनाकडना जासुद जहाजमां बशीसनं जातीन; मिसरवर प्रसंग वना त्यापरमानं त्यासले वेदना व्हतीन, कारन दख, ती येय यि राहीनी शे.
10 प्रभु परमेश्वर सांगस, बाबेलना राजा नबुखद्नेस्सर याना हातघाई मी मिसरना लोकसमुदाय नाहीसा करसू.
11 तो अनी बठा लोकेसमां भयंकर आशे त्याना लोके हयान देशना नाश कराले आणसू; त्या मिसरवर आपल्या तलवारी उपसीसनं वध करेल माणसासना सर्वा देश भरी टाकतीन.
12 मी नद्या कोयडया करसू, हाई भुमी ईकीसनं दुष्टसनी हातमां दिसू, अनी परकासनी हातघाई हाऊ देश अनी तठे सर्व काही नासधुस करसू; मी परमेश्वर हाई बोलेल शे.
13 प्रभु परमेश्वर सांगस, मी नोफ शहरना दैवतसना नाश करसू; मुर्त्या नष्ट करसू; अनी मिसर देशमासला कोनीच अधिपती राहावावू नही आशे करसू; मिसर देश दहशतघाई भरी टाकसू.
14 मी पथ्रोस शहर उजाड करसू, सोआनसले आग लावसू, नो नगरले न्यायदंड दिसू.
15 मिसरना दुर्ग जो सीन शहर त्यावर मी आपला क्रोधाग्नीना वर्षाव करसू अनी नो आठेना लोके समुदायना नाश करसू.
16 मी मिसरले आग लावसू; सीन वेणा दी; नो छिन्नभिन्न व्हयी; नोफ शहरवर भरदिनमां वैरी उठतीन.
17 आवेन अनी पि-बेसेथ आठेना तरुण माणसे तलवारघाई पडतीन; हया नगर जिकामां येतीन.
18 मिसरीसनी घालेल जोखड मी मोडी टाकसू अनी त्यासना पराक्रमनं गर्व जिरी तवय तहपन्हेस आठे दिनमांच आंधार व्हयी, त्या ढगघाई जाकाई जातीन, त्यान्या पोरी बंदीवान व्हयी जातीन.
19 या परकारं मिसरमां न्यायदंड करसू; तवय त्यासले समजी की मी परमेश्वर शे."
मिसर देशनी तुटेल शक्ती
20 तवय अकरावा वरीसले पहिला महीनाना सातवा दिनले परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं की,
21 मानवपुत्रा, मिसरी राजा फारो याना भुज मी मोडेल शे; दख, त्यासले परत तलवार धरानी शक्ती येवाले पाहिजे म्हनीसनं त्यासले औषध उपचार करीसनं पट्टी बांधानी ती कोनीच बांधी नही,
22 यामुये प्रभु परमेश्वर सांगस, दखा, मी मिसरी राजा फारो याणा ईरोधमां शे; त्याना शाबूत अनी मोडका आशे दोनी हात तोडी टाकसू; त्यानी हातमासली तलवार गयी जाई आशे मी करसू.
23 मी मिसर्यासले राष्ट्रासमां पांगाडसू, त्यासले दशोधडीले लावसू,
24 मी बाबेलना राजानं भुज बळकट करसू, मी मनी तलवार त्याना हातमां दिसू; पन मी फारोनं भुज आशे मोडसू की एखादा भयंकर घायाळ व्हयेल माणुसपरमानं तो त्यानामोरे आक्रोश करी.
25 मी बाबेलना राजानं भुज बळकट करसू, अनी फारोनम भुज गळतीन; मी मिसर देशवर उगाराकरता बाबेलना राजानी हातमां तलवार दिसू तवय त्यासले समजी की मी परमेश्वर शे.
26 मी मिसर्यासले राष्ट्रसमां पसारसू, त्यासले देशोधडीले लावसू; तवय त्यासले समजी की मी परमेश्वर शे.