34
इस्राएलना मेंढपाय
1 परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं की,
2 "मानवपुत्रा," "इस्राएलना मेंढपायसना ईरोधमां संदेश दिसनं सांग, प्रभु परमेश्वर आशे सांगस, ज्या इस्राएलना मेंढपाय आपलामांच चरतसं त्यासले धिक्कार असो! मेंढपायसनी मेंढरासले चारानं की नही?
3 तुमी मेंढरासनी चरबी खातस, त्यासना लोकरना कपडा वापरतस; त्यामासला धष्टपुष्ट दखीसनं कापतसं, पन कळप चारतसं नही.
4 तुमी निर्बलसले बलवान करतसं नही, रोग्यासले चांगल करतसं नही, जखमी व्हयेलसनी जखम बांधतसं नही, हाकली देयल परत आणतसं नही, धवडी जायेलसले शोधतसं नही; तर तुमी बळजबरीतीन अनी कडकपनमां सत्ता चालाडतसं.
5 त्यासले कोनी मेंढपाय नही राहावामुये त्यासनी दाणादाण व्हयनी; त्या सर्वा वनपशुसना भक्ष्य व्हयीसनं त्यासनी दाणादाण व्हयनी.
6 मना मेंढरा बठा डोंगरवर, सर्वा उचा टेकडासवर फिरी राहीना शेतस; देशभर मना मेंढरा उधळेल शेतस; त्यासनी कोनलेच शुध्दी नही, कोनीच त्यासनी शोध करतसं नही.
7 म्हनीसनं मेंढपायसवन, तुमी परमेश्वरनं वचन आयका;
8 प्रभु परमेश्वर सांगस, मनी जीवनी शपथ; कोनीच मेंढपाय नही राहावामुये मना मेंढरं लुटाई जायेल शेतस; मना मेढरं वनपशुसना भक्ष्य व्हयी जायेल शेतस; मना मेंढपायसले मना मेंढरासनी शुध्दी नही; मेंढपाय सोताच चरतसं, पन मेंढरासले चारतसं नही.
9 म्हनीसनं मेंढपायसवन, परमेश्वरनं वचन आयका,
10 प्रभु परमेश्वर सांगस, दखा, मी मेंढपायसनी ईरोधमां शे, त्यासनाकडतीन मी मना मेढरासना हिशोब लिसू; मन कयप चारानी त्यासले बंदी घालसू; त्याले सोताले चाराले भेटावू नही; मी मना मेंढर त्यासना तोंडमाईन सोडावसू मनजे यानामोरे त्या त्यासना भक्ष व्हवावुत नही.
चांगला मेंढपाय
11 कारन प्रभु परमेश्वर सांगस, दखा, मी सोता मना कयपना शोध करसू, त्यासले मी शोधसू.
12 जो मेंढपाय आपला दाणादाण व्हयेल मेंढरासमां राहीसनं त्यासले सोडावसं, त्यापरमानं मी आपला मेंढरासले सोडावसू; अनी ढगघाई जाकेल अनी आंधारना दिनमां त्यासनी दाणादाण व्हयनी त्या बठा ठिकानमाईन त्यासले वाचाडी लयी यिसू.
13 मी त्यासले राष्ट्रसमाईन लयी यिसु, येगयेगळा देशमाईन त्यासले एकजागे करसू, मी त्यासले स्वदेशी परत आणसू, मी इस्त्राएलना पर्वतवर, नालासनाजोडे अनी देशमासला बठा वस्तीस्थानमां त्यासले चारसू.
14 मी त्यासले चांगल्या चरणमां चारसू, त्यासना चरण इस्त्राएलना उचा पहाड व्हयी, त्या तठे चांगला चरणमां बसतीन, इस्राएलना पर्वतवर त्यासले उत्तम चारा भेटी.
15 मी सोता मना कयप चारसू अनी त्यासनी झोपा उठानी सोय करसू आशे प्रभु परमेश्वर सांगस.
16 मी दवडायी जायेलसले शोधसू, हाकली देयेलसले परत आणसु, जखमी व्हयेलसले पट्टी बांधसू, रोगीसले ताकद दिसु, पन लठ्ठ अनी ताकदवानसना नाश करसू, त्यासले मी यथान्याय चारसू.
17 प्रभु परमेश्वर सांगस, मना कयप, तुमनं आशे व्हयी, मी मेंढरामेंढरासमा, एडकाबोकडयासमां निवाडा करसू.
18 तुमी चांगला चारा खायीसनं उरेल चाराले पायघाई चेंगरतसं, तुमी स्वच्छ पानी पिसनं उरेल पानी गढूय करतसं, हाई काहीच नही आशे तुमले वाटसं का?
19 मना मेंढरं तुमना पायघाई चेंगरेल चारा खातसं अनी तुमना पायघाई गढूय व्हयेल पानी पितसं.
20 "हयामुये, प्रभु परमेश्वर त्यासले सांगस, दखा, मी, मीच पुष्ट पशु अनी रोड पशू यासनामां निवाडा करसू.
21 निर्बलसले तुमी आपला आंगघाई अनी खांदासघाई धक्का देतस अनी आपला शिंगसघाई ठोकर दिसनं हाकली देतसं.
22 म्हनीसनं मी आपला कयपना बचाव करसू, मनजे त्या आठेपावोत दुसरासना भक्ष्य व्हवावूत नही; मी मेंढरामेंढरासमां निवाडा करसूं.
23 त्यासनावर मी एक मेंढपाय नेमीसनं त्यासले चारसू; तो कोण राही तर मना सेवक दावीद हाऊ राही; तो त्यासले चारी, तो त्यासना मेंढपाय व्हयी.
24 मी परमेश्वर त्यासना देव व्हसू, त्यासनामां मना सेवक दावीद हाऊ अधिपती व्हयी; मी परमेश्वर हाई बोलेल शे.
25 मी क्षेमवचन दिसनं त्यासनासंगे करार करसू, देशमाईन दुष्ट पशु नष्ट करसू अनी मनजे त्या जंगलमां निर्भय आशे राहातीन अनी जंगलमां झोप लेतीन.
26 "मी त्यासले अनी मना डोंगरना आजुबाजूना ठिकानले मंगलमय करसू; पाऊस योग्य ऋतुमां पडी आशे मी करसू; मंगलदायी वृष्टी व्हयी.
27 मयामासला झाडे फलद्रुप व्हतीन, मी त्यासनारना जोखडना बंधन तोडीसनं ज्यासनी त्यासले दास म्हनीसनं वागाडं त्यासना हातमाईन त्यासले सोडावसू तवय त्यासले समजी की मी परमेश्वर शे.
28 त्या यानामोरे विधर्मी राष्ट्रसले भक्ष व्हवावुत नही; वनपशु त्यासले फाडीसनं खावावूत नही; तर त्या निर्भयतीन राहातीन, कोनीच त्यासले धाक देवावू नही.
29 मी त्यासनाकरता चांगलं पिकपानीनी लागवड करसू, मनजे परत फिरीसनं त्यासना देशवर दुष्काळ पडीसनं त्यासना र्हास व्हवावू नही; त्यासले परत विधर्मी लोकेसनी अप्रतिष्ठा सोसानी गरज पडावू नही.
30 तवय मी परमेश्वर त्यासना देव त्यासनासंगे शे अनी इस्राएल घराणं मनी प्रजा शे हाई त्यासले समजी, आशे प्रभु परमेश्वर सांगस.
31 तुमी मना मेढरं, मना चरणमासला कयप शेतस, तुमी मानव अनी मी तुमना देव शे, आशे प्रभु परमेश्वर सांगस.