35
अदोमले परमेश्वरना दंड
परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं की, "मानवपुत्रा," "सेईर डोंगरकडे आपलं तोंड कर अनी त्याना ईरोधमां संदेश देय. त्यासले सांग, प्रभु परमेश्वर सांगस,
हे सेईर डोंगरा, दख, मी तुना ईरोधमां शे,
मी मना हात तुनावर चालाडसू
अनी तुले उजाड अनी उद्ध्वस्त करसू.
मी तुना नगर ओस करसू
अनी तु उजाड व्हशी;
तवय तुले समजी की मी परमेश्वर शे.
तु कायमनं वैर धरं अनी इस्त्राएल लोकेसवर संकट ऊनात तवय त्यासना पापमुलक अंतसमय वना तवय त्यासले तलवारनी धारनी हवाली करी टाकं. म्हनीसनं प्रभु परमेश्वर सांगस, मनी जीवनी शपथ, मी तुनी रक्तपातनी तयारी करसू, अनी रक्तपात तुना पिच्छा करी; तु रक्तपातनीबारामां नापसंती दखाडी नही म्हनीसनं रक्तपात तुनामांगे लागी. मी सेईर डोंगर उद्ध्वस्त अनी विरान करसू; तठे येनारा जानारासना नाश करसू. त्याना वध करेल लोकेसनी मी त्याना डोंगर व्यापी टाकसू; तुन्या टेकडयासवर, तुना खोरामां अनी तुना नालामां तलवारघाई वध करेल पडतीन. मी तुमनं कायमनं उद्ध्वस्त करसू, तुमना नगर परत बसावुत नही; तवय तुमले समजी की मी परमेश्वर शे.
10 "हया दोन राष्ट्रे, हया दोन देश मना शेतस; आपन त्यासना ताबा लि टाकूत, आशे तठे परमेश्वर व्हता तवय तुनी बोलं व्हतं. 11 म्हनीसनं प्रभु परमेश्वर सांगस, मनी जीवनी शपथ, तु जो व्देष दखाडं, तु त्यासना व्देष करीसनं जो हेवा प्रकट करं; त्यापरमानं मी तुनासंगे वागसू; मी न्याय करीसनं तुले शिक्षा करसू तवय मी त्यासले प्रकट व्हसू. 12 तु इस्राएलना पर्वतनाईरोधमां बोलं व्हत की त्या उद्ध्वस्त व्हयेल शेतस, त्या आमले भक्ष कराकरता देयेल शेतस; हाई तुनं बठ दुर्भाषण मी परमेश्वरनी आयकेल शे हाई तुले कळी. 13 हाई परकारं तुमी आपला तोंडघाई मनाईरोधमां मनी थोरवी गाजाडी; मनाईरोधमां पाहिजे तेवढा बोलनात; ते मी आयकेल शे.
14 "म्हनीसनं प्रभु परमेश्वर सांगस, बठी पृथ्वी आनंद करी तवय मी तुले उजाड करसू. 15 इस्राएलना घराणानं वतन उद्ध्वस्त व्हयनं तवय तुमले आनंद वाटनं; म्हनीसनं मी तुनबी तशेच करसू; हे सेईर डोंगरा, तु विरान व्हशी, जवयपास बठा अदोम ओसाप व्हयी, तवय त्यासले समजी की मी परमेश्वर शे."