36
इस्राएलले परमेश्वरना आशिर्वाद
1 "हे मानवपुत्रा, इस्राएलना पर्वतमां संदेश दिसनं सांग, इस्राएलना पर्वतसवन, परमेश्वरनं वचन आयका.
2 प्रभु परमेश्वर सांगस, तुमनीबारामां शत्रु सांगतसं, अहा! हया प्राचीन उचा स्थळ आपला ताबामां येयल शेतस;
3 "म्हनीसनं संदेश दिसनं सांग की प्रभु परमेश्वर सांगस, त्यासनी तुमले उद्ध्वस्त करेल शे, राष्ट्रसमाईन उरेल लोकेसना तुमनावर ताबा बसाले पाहिजे म्हनीसनं त्यासनी तुमले चारीमेरतीन त्रास देयेल शे, अनी तुमनं नाव लोकेसना तोंडमा राही जायेल शे अनी त्यासले तुमी निंदानं ईषयी बनी जायेल शेतस.
4 म्हनीसनं इस्राएलना पर्वतसवन, प्रभु परमेश्वरनं वचन आयका, आसपासना राष्ट्रसमाईन उरेल लोकेसले लुट अनी निंदाना ईषय व्हयेल अनी टेकडया, नाला अनी खोरा, उजाड अनी ओसाड नगरे यासले प्रभु परमेश्वर आशे सांगस की,
5 "राष्ट्रसमाईन बाकीना उरेल अनी सर्वा अदोम यासनी उल्लासयुक्त मनतीन अनी व्देषबुध्दीतीन मना देश लुटीसनं फस्त कराना हेतूतीन तो आपला सत्तामां लिद; म्हनीसनं त्यासनाईरोधमां ईर्ष्यायुक्त व्हयीसनं नक्की बोलेल शे;
6 "इस्राएल देशनाईषय संदेश दिसनं पर्वत अनी टेकडया, नाले अनी खोरा यासले सांग की प्रभु परमेश्वर सांगस, विधर्मी राष्ट्रसनी करेल अप्रतिष्ठा तुमी सहन करेल शे म्हनीसनं, दख, मी आपली ईर्ष्यातीन अनी संतापतीन बोलेल शे.
7 म्हनीसनं प्रभु परमेश्वर सांगस, मी आपला हात उचलेल शे; तुना आजुबाजून विधर्मी राष्ट्र खचित अप्रतिष्ठा पावतीन.
8 पन इस्त्राएलना पर्वतसवन, तुमनावरना झाडसले फाटा फुटीसनं तुमी मना इस्राएल लोकेसले फळ दिशात आशे लवकर घडी.
9 कारण दख, मी तुमले अनुकूल शे, मी तुमनाकडे वयसू अनी तुमनावर नांगरनी पेरणी व्हयी;
10 मी तुम्हनावर माणसेसनी, इस्त्राएलनी जवयपास बठा घराणानी संख्या वाढावसू, नगरे बसतीन, पडीत ठिकान बांधी काढतीन.
11 माणुस अनी पशू यासनी संख्या मी तुमनावर वाढावसू, त्यासनी वृध्दी व्हयीसनं फलद्रूप व्हतीन; पहिलापरमानं तुमनावर वस्ती बशी, अनी तुमना जुना दिनमां करं त्यानापेक्षा जास्त तुमनं कल्यान करसू; तवय तुमले समजी की मी परमेश्वर शे.
12 माणसे, मनजे मना इस्त्राएल लोके, तुमनावर परत ये जा करतीन आशे मी करसू; त्या तुमना ताबा लेतीन, तुमी त्यासना वतन वशात, तुमी आठेपावोत त्यासले अपत्यहीन करावुत नही.
13 "प्रभु परमेश्वर सांगस, त्या तुमले सांगेत की तु मनुष्यभक्षक देश शे; तु आपला राष्ट्रसले अपत्यहीन करेल शे;
14 तर तु यानामोरे मनुष्य भक्ष करावू नही, आपला राष्ट्रसनामोरे आडफाटा ठेवावू नही; आशे प्रभु परमेश्वर सांगस,
15 परत फिरीसनं मी तुले राष्ट्रसनी निंदा आयकाडावू नही, राष्ट्रसनी करेल अप्रतिष्ठा तुले सोसानी गरज पडावू नही तु आपला राष्ट्रनीमोरे आडफाटा ठेवावू नही आशे प्रभु परमेश्वर सांगस.
इस्राएलना नवीन जीवन
16 परमेश्वरनं वचन माले परत प्राप्त व्हयनं की,
17 "मानवपुत्रा," "इस्त्राएल घराणं देशमां वस्ती करीसनं राहीनात तवय त्यासनी आपला आचरनतीन अनी कृतीतीन तो देश भ्रष्ट करी टाकं; त्यासनं आचरन मनासमोर पाळी येयल बाईना परमानं व्हतं.
18 त्यासनी देशमां रक्तपात करं अनी आपल्या मुर्तीसघाई तो भ्रष्ट करी टाकं; म्हनीसनं मी देशवर आपला संतापना वर्षाव करं.
19 मी त्यासनी राष्ट्रसमां पांगापांग करी, देश देशमां त्यासनी दाणादाण व्हयनी; त्यासना आचरनपरमानं अनी कृतीपरमानं मी त्यासना न्याय करं.
20 ज्या ज्या देशमां त्या गयात तठे त्यासनी मना पवित्र नावले बट्टा लावं; लोके त्यासना ईषयी सांगेत की हया परमेश्वरना लोके शेतस, हया त्याना देशमाईन बाहेर निघेल शेतस;
21 पन इस्त्राएल घराणं ज्या ज्या राष्ट्रसमां गयात तठे त्यासनी मना पवित्र नावले बट्टा लावं, तवय मी मना नावले जपनू.
22 "यामुये इस्राएल घराणाले सांग की प्रभु परमेश्वर सांगस, हे घराण्या, मी हाई तुमनाकरता करी नही राहीनू, तर तुमी राष्ट्र राष्ट्रसमां जायीसनं मना पवित्र नावले बट्टा लावं म्हनीसनं मना नावकरता मी हाई करी राहीनु शे.
23 तुमी मना थोर नावले राष्ट्रासनीसमोर बट्टा लावामुये त्या राष्ट्रसनी मना नाव अपवित्र मानी टाक; त्या ती पवित्र मानतीन आशे मी करसू; अनी त्या राष्ट्रासनीसमोर तुमनामां माले पवित्र मानतीन तवय राष्ट्रसले समजी की मी परमेश्वर शे, आशे प्रभु परमेश्वर सांगस.
24 कारन मी तुमले राष्ट्रसमाईन काढी आणेल शे, सर्वा देशमाईन तुमले एकजागे करीसनं तुमले देशमां आणेल शे.
25 मी तुमनावर शुध्द पानी शितडसू; मनजे तुमी शुध्द वशात; तुमना बठी मलिनता अनी तुमन्या बठया मुर्त्या यासपाईन मी तुमनी शुध्दी करसू.
26 मी तुमले नवीन ह्दय दिसू; तुमनामां नवा आत्मा घालसू; तुमना देहमाईन दगडना ह्दय काढीसनं अनी तुमले मांसमय ह्दय दिसू.
27 मी तुमनामां मना आत्मा घालसू अनी तुमी मना नियमतीन चालशात, मना निर्णय पायीसनं त्यापरमानं आचरन करशात आशे मी करसू,
28 मी तुमना पर्वजसले देयेल देशमां तुमी वस्ती करशात, अनी तुमी मनी प्रजा अनी मी तुमना देव व्हसू.
29 मी तुमना बठी मलिनतापाईन तुमले मुक्त करसू; मी धान्यवर हुकूम करीसनं त्यानी विपलुता वाढावसू, तुमनावर दुष्काळ आणावू नही.
30 झाडेसना फळे अनी वावरसना उपज यासनी मी वृध्दी करसू; मनजे राष्ट्रसमां तुमले यानामोरे दुष्कायमुये व्हनारी विटंबना भोगानी गरज पडावू नही.
31 तुमले तुमना दुष्कर्मनी अनी अनाचारनं स्मरण व्हयी; तुमना अधर्म अनी अमंगय कृत्य यामुये तुमलेच तुमना ईट यि.
32 प्रभु परमेश्वर सांगस, हाई मी तुमनाकरता करी नही राहीनू हाई तुमले माहीत राहु दया; हे इस्राएल घराण्या, तुमी आपला आचरनना ईषयी लज्जित अनी फजित व्हा.
33 प्रभु परमेश्वर सांगस, मी तुमना सर्वा अधर्म घालाडीसनं तुमले साफ करसू; तवय नगरे बसतीन अनी पडीत जागा बांधामां येतीन आशे मी करसू.
34 येता जाता विरान व्हयेल ठिकान नांगरामाम यि.
35 तवय लोके म्हनतीन, हाई जमीन विरान व्हयेल व्हती ती आते एदेन बागनीमायक व्हयेल शे; ओसाड, उजाड अनी उद्ध्वस्त व्हयेल नगरसनी तटबंदी व्हयीसनं तठे वस्ती व्हयेल शे.
36 ज्या राष्ट्रे तुमना आजुबाजूले टिकी राहातीन त्यासले समजी की मी परमेश्वर उद्ध्वस्त व्हयेल ठिकान बांधी काढसं; उजाड व्हयेल जमीननी लागवड करसं; मी परमेश्वर जे बोलेल शे ती मी करसुच.
37 प्रभु परमेश्वर सांगस, आजुन मी आशे कराले पाहिजे म्हनीसनं इस्राएल घराणाले मनी ईनंती कराले भाग पाडसू; कळपपरमानं मी तठे मनुष्यनी वृध्दी करसू.
38 पवित्र यज्ञपशुना कळप, यरुशेलमना सणना कळप यापरमानं ओसाड नगर मनुष्यना कळपघाई भरी जातीन; तवय त्यासले समजी की मी परमेश्वर शे.