46
योग्य येळले बली
प्रभु परमेश्वर आशे सांगस, मजारना आंगणना पुर्वकडला दार कामना सवू दिवसमां बंद राही, पन शाब्बाथ अनी चंद्रदर्शन हाई दिनमां ते उघडामां यि. अधिपतीन, त्या मंदीरना दारना मंडपना वाटघाई बाहेरतीन मजार यि अनी तो दारना खांबापान उभा राही तवय याजक त्याना होमार्पण अनी शांतीर्पण करी, मंग त्यानी दारना उंबरठावरतीन दंडवत घालीसनं बाहेर जावानं. पन दार संध्याकायपावोत बंद करता येवावू नही. देशमासला लोकेसनी शाब्बाथ अनी नवचंद्रदीन या दोन दीन दारपाईन परमेश्वरनी उपासना करानी. शाब्बाथना दीन अधिपतीनी परमेश्वरले जे अर्पन करानं शे त्या सवू निर्दोष कोकरा अनी निर्दोष मेंढा यासना होमार्पण आशे करानं, त्यानी मेंढासकरता एक एफा अन्नार्पण करानं अनी कोकरसकरता जशी त्यासनी देवानी इच्छा शे तशे त्यानी अन्नार्पण देवान; अनी परतेक एफानीसंगे एक हिनभर तेल अर्पण करानं. नवचंद्रना दिनले त्यानी एक निर्दोष वासरू, सवु निर्दोष कोकरा अनी एक निर्दोष मेंढा अर्पण करानं. त्यासनी वासरूकरता अनी मेंढासकरता परतेक एक एक एफा अन्नार्पण सिध्द करानं, एक कोकरुकरता त्यानी इच्छापरमानं त्यानी देवानं; अनी परतेक एफानीसंगे हिनभर तेल अर्पण करानं. जवय अधिपती दारना अनी देवडीनी वाटघाई मजार येतीन तवय त्यानी तिच वाटघाई परत जावानं.
पण देशमासला लोके नेमेल सणना दिनमां परमेश्वरनासमोर येतीन, त्या येयले उत्तरकडतीन दारमाईन ज्या मजार येयल दक्षिणना दारकडतीन बाहेर जावानं अनी दक्षिणकडतीन मजार जायेलसनी उत्तरकडना दारना बाहेरतीन जावानं, कोनीच येयल दारनी बाहेर जावानं नही, तर सरय मोरे निघी जावानं. 10 अनी जवय त्या परवेश करतीन तवय अधिपती त्यासनामां मजार जायी त्या बाहेर जातीन तवय त्यानी त्यासनासंगे बाहेर जावानं. 11 सण अनी उत्सवना दीन, एक वासरूनीमांगे एक एफा अन्नार्पण अनी एक एडकानीमांगे अन्नार्पण करानं, एक कोकरानीमांगे जे काही त्यानी देवानी इच्छा व्हयी तसे करानं; अनी एफाकरता एक हिनभर तले देवानं.
12 “जवय अधिपती परमेश्वरकरता स्वखुशीतीन अर्पण म्हनीसनं होमबली अनी शांत्यर्पण करी तवय पुर्वना दार त्यानाकरता उघडानं, मंग शाब्बाथना दिनपरमानं त्यानी होमार्पण अनी शांत्यर्पण करानी; मंग त्यानी बाहेर जावानं अनी तो बाहेर जावावर दार बंद करानं.”
परतेक दिननी भेट
13 परमेश्वरले रोज होमार्पण कराकरता तु एक वरीसना निर्दोष आशे कोकरु देवानं, तु रोज सकासले हाई करानं. 14 अनी रोज सकासले त्यानासंगे तुमी अन्नार्पण देवानं; गहुना पिठ एफाना सवुवा भाग अनी ते नरक कराकरता हिनना तिसरा भाग तेल आशे अन्नार्पण परमेश्वरले करानं; हाई कायमनं विधी चालाडाकरता शे. 15 यापरमानं त्या रोज सकासले निरंतर होमार्पणकराकरता कोकरु, अन्नार्पण अनी तेल रोज सकालसे सिध्द करतीन.
अधिपती अनी त्याना भाग
16 प्रभु परमेश्वर आशे सांगस, जर अधिपती आपला पोर्‍यासमाईन एकले एखादं बक्षिस देयेल व्हयी तर ते‍ त्यानं वतनमासलं राहावामुये त्याना पोर्‍याना व्हयी, ते त्यानं वतन शे. 17 पन त्यानी आपला वतनमासला काही भाग, आपल्या एखादा सेवकले दिद तर स्वतंत्रना वरीसपावोत तो त्या सेवकना व्हयी, मंग तो अधिपतीकडे परत जायी, त्याना वतन त्याना पोर्‍यासले मिळी. 18 अनी अधिपतीनी लोकेसना कोनतबी वतन लिसनं त्याले घालाडी देवानं नही, त्यानी आपली मालकीना जमीनना काही भाग आपला पोर्‍यासले देवानं; मनजे मना लोकेसमाईन परतेक माणूस आप आपला वतनमाईन येगळा व्हवावूत नही.
मंदीरना स्वंयपाक घर
19 मंग त्यानी माले दारना जोडेतीन त्याबाजूले लयी गया, उत्तरकडे तोंडले जे याजकनी खोल्यासकडे तो माले लयी गया, अनी दख, तठे पश्चिमले एक जागा दखायनी, 20 तो माले बोलना, “आठे याजक दोषार्पण अनी पापार्पण शिजाडतीन, ज्यामा त्या अन्नार्पण भुजतीन ते हाईच शे याकरता की लोकेसले पवित्र कराले त्यासनी ते अर्पण लिसनं बाहेर आंगणमां जावानं नही”
21 मंग तो माले बाहेरना आंगणमां लयी वना अनी त्यानी माले आंगणणा चारी कोपरासले लयी गया, अनी दख, आंगणन परतेक एक कोपराले एक आंगण व्हतं. 22 आंगणना चारी कोपरासमां चायीस हात लांब अनी तीस हात रुंदीना आवारे व्हतात, चारी कोपरा सारखाच मापना व्हतात. 23 त्यामां चारी आजुबाजूले दगडना भितडा व्हतात,‍ त्या भितडामां दगडासनी रांगनीखाल स्वयपाक कराकरता जागा करेल व्हती. 24 तो माले बोलना, “या पाकशाला शेतस, त्यासमां आठे मंदीरना सेवक लोकेसकडला यज्ञ शिजाडतसं.”
46:17 लेवीय 25:10