48
कूळनी वाटणी
1 हया वंशासना नावे शेतस; दानना वंश देशना एक भाग लेतीन, त्यानी सीमा उत्तर सीमापाईन ते हेथोलनाडतीन वाटनाजोडे, हामाथना प्रवेशपावोत दिमिष्कना सीमापावोत हसर-एनान, उत्तरकडनी हमाथनीजोडे दाननी सीमा त्याना पुर्वकडतीन सर्वा मार्गतीन महासमुद्रकडे जायी.
2 दाननी दक्षिण सीमापान पुर्व दिशापाईन ते पश्चिम दिशापावोत एक विभाग आशेरना.
3 आशेरनासंगे दक्षिण सीमाना एक भाग नफतालीना, त्यानी पुर्वपाईन ते पश्चिमपावोत पसरेल,
4 नफतालीनासंगे दक्षिण सीमाना एक भाग मनश्शेना, पुर्वपाईन ते पश्चिमपावोत पसरेल विस्तारीत जागा.
5 मनश्शेनासंगे त्यानी दक्षिण सीमाना एक भाग पुर्वपाईन ते पश्चिमपावोत तो एफ्राईमना,
6 एफ्राईमना दक्षिण सीमाना पुर्वपाईन ते पश्चिमपावोत एक भाग रऊबेनना,
7 रऊबेननासंगे बाजूनी सीमानी पुर्वपाईन ते पश्चिमपावोत एक भाग तो यहुदाना,
देशना मजारना ईशेष भाग
8 यहुदाना सीमाले लागीसनं जो पुर्व बाजूपाईन ते पश्चिम बाजूपावोत विस्तारेल प्रदेश पंचवीस हजार हात रुंद अनी दुसरा वंशले मिळेल भाग एवढा पुर्व बाजूपाईन ते पश्चिम बाजूपावोत लांबा तो समर्पित अंश म्हनीसनं अर्पण करशात अनी त्याना मजारना भागमां पवित्रस्थान व्हयी.
9 तुम्ही जो प्रदेश परमेश्वरले अर्पण करशात तो लांबीले पंचवीस हजार हात अनी रुंदीले ईस हजार हात राहावाले पाहीजे.
10 पवित्र प्रदेशना भाग हाई नेमी देयल व्हतं; हाई समर्पित प्रदेश याजकसना; हाई जमीन उत्तरले पंचवीस हजार हात लांबीनी, पुर्वेले अनी पश्चिमले दहा-दहा हजार हात रुंचीनी राही; तिना दक्षिणले लांबी पंचवीस हजार हात राहावाले पाहिजे, त्यानासंगे मजारनी भागमां परमेश्वरना मंदीर राहावाले पाहिजे.
11 सादोकना वंशमासला ज्या याजक पवित्र व्हयेल शेतस ज्यासनी कोणी सेवा निष्ठातीन करी, त्यासनाकरता तो व्हयी. जवय इस्त्राएल लोक बहकी गयात तवय जसे लेवी बहकनात तशा त्या बहकनात नही.
12 त्यासले देशामां अर्पण करेल प्रदेशमाईन हाऊ एक प्रदेश त्याना परमपवित्र व्हयी; तो लेवीसना सीमापान राही.
13 याजकना सीमापान लेवीसले पंचवीस हजार हात लांब अनी दहा हजार हात रुंद जमीन राहावाले पाहीजे.
14 त्यासनी हाई जमीन ईकानी नहिते अदलाबदली करानी नही; इस्राएल देशमासला कोणतबी प्रथम फय येगळा करीसन दुसरा प्रदेशमां जाऊ देवान नही; कारन तो भाग परमेश्वरना पवित्र शे.
15 उरेल जमीन पंचवीस हजार हात लांबीना प्रदेशमाईन जो पाच हजार हात रुंदीना भाग राही तो नगरनीकरता सार्वजनिक, कुरणकरता, घर बांधाकरता उपयोगमां यि, नगर हयाना मजारमां राहावाले पाहीजे.
16 नगरीना माप हयापरमानं राहातीन, उत्तर बाजू चार हजार पाचशे हात पुर्व अनी पश्चिम बाजुबी तेवढीच म्हणजे चार हजार पाचशे हात.
17 नगरकरता कुरण उत्तरले अडीचशे हात, दक्षिणले अडीचशे हात अनी पश्चिमले अडीचशे हात राहावाले पाहिजे.
18 अनी पवित्र अर्पेल प्रदेशनामोरे जो उरेल प्रदेश तो लांबीतीन पुर्वेले दहा हजार हात. अनी पश्चिमले दहा हजार हात व्हयी; अनी तो पवित्र अर्पण करेल प्रदेशनासमोर व्हयी; त्यानी कमाई नगरमासला कामगारसकरता अन्नकरता व्हयी.
19 बठा इस्त्राएल वंशमाईन ज्या कोनी नगरमां काम करतीन त्या लोकेसनी ती जमीननी मशागत करानी.
20 बठा अर्पण करेल प्रदेश पंचवीस हजार हात लांब अनी पंचवीस हजार रुंद व्हयी; हाई परकारतीन तुमी प्रदेशना पवित्र अर्पण एकजागे नगरना भागनीकरता देवानं;
21 तो अर्पण करेल भाग अनी नगरना विभाग यासन्या एक बाजुले अनी दुसरी बाजुले जो उरेल भाग शे तो अधिपतीना राहावाले पाहिजे. अर्पेल प्रदेशमां पंचवीस हजार हातनामोरे पश्चिम सीमाकडे, वंशना विभागनीसमोर जो प्रदेश शे तो अधिपतीकरता राहावाले पाहिजे अनी पवित्र अर्पेल प्रदेश अनी मंदीरना पवित्रस्थान त्याना मजारमां राहावाले पाहिजे.
22 यामासला काही हिस्सा याजकना, काही लेवीना अनी काही मंदीरनाकरता शे, मंदीर हाई भागना मजारमां शे, उरेल जमीन देशना राजानी मालकीनी शे; राजा बन्यामिननी जमीन अनी यहुदानी जमीन यासमासली जमीन भेटी.
दुसरा कुळना भाग
23 अनी बाकीना वंशसले, पुर्व बाजूपाईन पश्चिम बाजू पावोत, त्यामासला एक बन्यामिनना भाग.
24 बन्यामिननी सीमापान त्यानी पुर्वबाजूपाईन पश्चिमपावोत तो शिमोनना भाग,
25 शिमोनना सीमापान त्यानी पुर्वबाजूपाईन पश्चिमपावोत तो इस्साखारना भाग,
26 इस्साखारना सीमापान त्यानी पुर्वबाजूपाईन पश्चिमपावोत तो जबुलूनना भाग,
27 जबुलूनना सीमापान त्यानी पुर्वबाजूपाईन पश्चिमपावोत तो गादनी एक भाग,
28 गादनी सीमापान दक्षिण बाजुले, दक्षिणले, तामारपाईन मरीबोथ कादेशना पानीपावोत, नदीकडे मोठा समुद्रपावोत सीमा व्हयी.
29 ज्या देशनी वाटनी तुमी चिठया टाकीसन इस्राएलना वंशसले वतनकरा भाग करशात तो हाऊच शे, त्याना भाग हयाच शेतस. परमेश्वर, माझा प्रभु असे म्हणाला.
नगरन्या वेशी अनी त्यासना नाव
30 हया नगरना बाहेर निघाणा ठिकाण शेतस, उत्तर बाजूले मापतीन चार हजार पाचशे हात लांब राही.
31 नगरनी वेशी तिले तीन दार राहातीन, इस्त्राएल वंशना नावपरमानं त्यासना नाव हया शेतस, रऊबेनन दार, यहुदाना दार, लेवीना दार.
32 पुर्व बाजू चार हजार पाचशे हात लांबन राही, तिला तीन दार राहातीन, योसेफना दार, बन्यामिनना दार अनी दानना दार.
33 दक्षिण बाजुबी चार हजार पाचशे हात लांब राही. तिले शिमोनना दार, इस्साखारना दार अनी जबुलूनना दार आशे तीन दार राहातीन.
34 पश्चिम बाजूबी चार हजार पाचशे हात लांब राही. तिना तीन दारना नाव हया शेतस गादना दार, आशेरना दार अनी नफतालीना दार.
35 त्या चारीमेरना अंतर अठरा हजार हात राही, त्या दिनपाईन नगरनं नाव “परमेश्वर तठे शे” आशे पडनं.