दानीएल
दानीएलना पुस्तक
वळख
दानीएलनं पुस्तक बाबिलोनमा इस्त्राएल लोकसना बंदिवासना काळमा संदेष्टा दानीएलना जीवन अनी भविष्यसुचक दर्शनना संबधमा शे. हाई दानीएल अनी त्याना मित्रसना निष्ठाबद्दल तसंच राष्ट्र अनी जगनासंबधमा भविष्यवाणीबद्दल सांगस.पुस्तकमा ६०५ ते अंदाज ५३५ ई.सन पुर्व काळना समावेश शे, जठे दानीएल चार येगयेगळा बाबिलोन राजाना काळमा सेवा करेल व्हती. पारंपारिक मत असं शे की दानीएलनी या काळमा बाबिलोनमा पुस्तक लिखेल व्हतं, पण बराच विद्वानसना अस मत शे की ते इस्त्राएलमा २ शतकमा लिखामा वनंत. बाकीसना अस ईश्वास शे की पुस्तकना काही भाग येगयेगळा येळमा लिखाई जायेल शे.
दानीएलना पुस्तक बंदिवासमा राहनारा इस्त्राएली लोकसले तसच कठिण काळ येवावर भावी पिढीसले आशा देवाकरता लिखाई गयं. दानीएलना जीवनमाधलं घटनासद्वारा अनी भविष्यना संबंधमा भविष्यवाणीद्वारा, देव राजे अनी राष्ट्रसवर त्यानं सामर्थ्य दखाडस. बायबलना संबधमा संदर्भमा, हाई नवा करारमाधलं देवना राज्य समजी लेवाले मदत करस. ख्रिस्तबद्दल दानीएल ७:१३-१४ मा भविष्यवाणी करेल शे. शेवटना काळबद्दल दानीएलना दृष्टांत येशूनी नमुद करेल शे. मत्तय २४:१५; मार्क १३:१४ अनी योहानना प्रकटीकरणना संबंधित शेतस. दानीएल यिर्मयाना भविष्यवाणीसना सुध्दा ईचार करस. दानीएल ९:१-३
रूपरेषा
1. नबुखद्नेस्सरना काळमा बाबिलोनमा दानीएल अनी त्याना मित्रसबद्दक सांगेल शे १:४
2. राजा बेलशस्सरना दृष्टांतना अर्थ सांगेल शे ५
3. दारियासना काळमा सिंहना गुहामा दानीएलना बद्दल सांगस. ६
4. भविष्यमाधलं घटनासबद्दल देवकडतीन दानीएलले प्रकटीकरण शेतस 7:12
(अ) दानीएल भविष्यबद्दलना दोन दृष्टांतना अनी त्यासना अर्थना वर्नण करस.७:८
(ब) दानीएल त्याना लोककरता प्रार्थना करस अनी त्याले ग्राबीएल देवदूतनी उत्तर दिधं. ९
(क) ग्राबीएल भविष्यमाधलं घडामोडी, शेवटना काळबद्ल प्रकट करस १०:१२
1
दानीएलना शिक्षण अनं त्याना सोबती
(1:1-6)
1 यहूदाना राजा यहोयाकीम याना कारकीर्दीना तिसरा वरीसले बाबेलना राजा नबुखद्नेस्सर यानी यरुशेलमवर चढाई करीन त्याले वेढा दिधा.
2 देवनी यहूदाना राजा यहोयाकीम याले त्याना हातमा दिधं; त्याप्रमाणंच देवना मंदिरमाधलं काही भांडीबी त्याना हातमा दिधं; त्यानी ती शिनार देशले आपला दैवतसना घर आणात अनी आपला दैवतसना भांडारसमा ठेवात.
3 राजानी आपला खोजासना नायक अश्पनज याले आज्ञा करी की इस्त्राएल राजकुळसपाईन अनं सरदार घराणापाईन.
4 अव्यंग, सुरुप, सर्वा व्यवहारमा दक्ष, ज्ञानसपन्न, विद्यापारंगत अनी राजवाडामा वागामा योग्य अश जवान माणसे लि येवानं अनी त्यासले खास्द्यासनी विद्या अनं भाषा शिकाडानी.
5 राजा खाये त्या मिष्टअन्नमाईन अनी पिये त्या द्राक्षरसमाईन त्यासनं नित्य खावानं पेवानं चालीन तीन वरीसपावत त्यासनं संगोपन व्हवाले पाहिजे; हाई मुदत संपावर त्यासनी राजाना हुजूरमा येवानं, अशी राजानी आज्ञा करी.
6 ह्या जवान मंडळीसमा यहूदा वंशमाधला दानीएल, हनन्या, मीशाएल अनं अजऱ्या ह्या व्हतात.
7 खोजासना सरदारनी त्यासले यानाप्रमाणं नाव दिधं दानीएलले बेलटशस्सर, हनन्याले शद्रख, मीशाएलले मेशख अनं अजऱ्याले अबेदनगो.
8 राजा खाये ते मिष्टअन्न अनं पिये तो द्राक्षरस यासना आपलाले विटाळ व्हऊ देवानं नही अश दानीएलनी मनना निश्चय करा; म्हणीन त्यानी खोजासना सरदारले ईनंती करी की माले यासना विटाळ व्हवाले नको.
9 खोजासना सरदारनी दानीएलवर कृपा अनं दया व्हवाले पाहिजे अश देवनी करं.
10 खोजासना सरदार दानीएलले बोलना, मना धनी राजा यानी तुमनं खाणपिण नेमी ठेयेल शे; त्याना माले धाक शे तुमना वयना बाकीना जवानसपेक्षा तुमनं तोंड उतरेल त्याले कशाले दखावाले पाहिजे? राजानापुढे मन डोकं उडाई जावाना येळ तुम्हीन काबंर आणानं?
11 तवय मुख्य खोजासना सरदार अश्पनज, जो दानीएल, हनन्या, मीशाएल, अनं अजऱ्या यासनावर जो कारभारी नेमेल व्हता त्याले दानीएलनी सांगं,
12 मी इनंती करस की, दहा दिन आपला ह्या दाससवर एवढा प्रयोग करीन दखं, आमले खावाले शाकान्न अनं पेवाले नुसतं पाणी दे फक्त.
13 मंग आमनं तोंड दख; अनी राजघरना अन्न खानारा जवानसनाबी तोंड दख; मंग तुना नजरमा ई तसं तुना ह्या दाससना कर.
14 त्यानी त्यासनी हाई ईनंती ऐकीन दहा दिन त्यासनावर हाऊ प्रयोग करा.
15 दहा दिननंतर राजघरना अन्न खानारा सर्वा जवानसपेक्षा त्यासनं चेहरा अधिक चांगला दिसना त्या आंगमाबी अधिक जाडजुड व्हयनात.
16 तवय तो कारभारी त्यासले नेमेल अन्न अनं द्राक्षरस देवानं बंद करीन त्यासले शाकान्न देवाले लागना.
17 या चारी जवानसले देवनी सर्व विद्या अनं ज्ञान यामा योग्य अनं चतुर करा; दानीएल हाऊ सर्वा दृष्टांत अनं स्वप्नं यासना उलगडा करामा ज्ञानी व्हयना.
18 नबुखद्नेस्सर राजानी त्यासले आपलासमोर हजर करानी मुदत ठरायेल व्हती ती संपावर खोजासना सरदारनी त्यानासमोर त्यासले हजर करं.
19 तवय राजानी त्यासनासंगे भाषण करा; त्या सर्वासमा दानीएल, हनन्या, मीशाएल अनं अजऱ्या यासना तोडीना कोणी दुसरा दखावामा वना नही; म्हणीन त्या राजाना सेवामा रावाले लागनात.
20 ज्ञानना अनं बुध्दीना बाबतमा राजा त्यासले जे काही ईचारे त्यामा त्या त्याना सर्वा राज्यमा असेल सर्वा ज्योतिषीसपेक्षा अनं मांत्रिकसपेक्षा दसपट हुशार शेतस अश त्याले दखाई जाये.
21 दानीएल हाऊ बाबेल राजदरबारमा कोरेश राजाना काळना पहिला वरीसपावत तठे राहिना.