2
दानीएल नबुखदनेस्सरनना स्वप्नना अर्थ सांगस
1 नबुखद्नेस्सर राजाले त्याना काळना दुसरा वरीसले स्वप्न पडनं, त्यानामुये त्याना मनले तळमळ लागनी अनी त्यानी झोप उडनी.
2 तवय राजानी हुकूम करा की मन स्वप्न काय शेतस ते सांगाले ज्योतिषी, मांत्रिक, जादूगार अनं खास्दी यासले बलाईन आणा; मंग त्या सर्वा राजानासमोर हजर व्हयनात.
3 राजा त्यासले बोलना, "माले पडेल स्वप्न समजाकरता मना मनले तळमळ लागनी शे.
4 त्या खास्दी, अरामी भाषामा राजाले बोलनात, महाराज, सर्वकाळ जिवत राव्हा; आपले स्वप्न आपला ह्या दाससले सांगा, म्हणजे आम्हीन त्याना अर्थ सांगसूत.
5 राजानी खास्दीसले बोलना, मना ठराव व्हई जायेल शे की मना स्वप्न अनं त्याना अर्थ हाई माले तुम्हीन सांगात नही तर तुमना तुकडातुकडा करीन तुमना घरं उकिरडं करानं;
6 पण तुम्हीन स्वप्न अनं त्याना अर्थ माले सांगशात तर तुमले मनाकडतीन देणग्या, इनाम अनं मोठा मान भेटी; पण स्वप्न अनं त्याना अर्थ माले सांगा.
7 त्या परत त्याले बोलनात, महाराजनी आपलं स्वप्न आपला दाससले सांगानं म्हणजे आम्हीन त्याना अर्थ सांगसूत.
8 तवय राजा बोलना, माले खात्रीतीन वाटी ऱ्हायनं की तुम्हीन येळ काढी राहिनात शेतस, कारण तुमले ठाऊक शे की, मना ठराव व्हई जायेल शे.
9 तुम्हीन माले स्वप्न सांगावूत नही तर तुमना संबधमा एकच हुकूम व्हई; हाऊ प्रसंग टळी जावाले पाहिजे म्हणीन तुम्हीन खोटानाटा गोष्ट सांगानं बेत करेल शे. मना स्वप्न माले सांगा म्हणजे त्याना अर्थ तुमले सांगता ई किंवा नही हाई माले समजी.
10 खास्दीसनी राजाले उत्तर दिधं, महाराजनी हाई गोष्ट सांगी असा कोणी माणुस सर्वा दुनियामा नही; अशी गोष्ट ज्योतिष्यसले, मांत्रिकसले किंवा खास्दीसले कोणीबी थोर अनं पराक्रमी राजानी आजपावत ईचारी नही.
11 महाराज जी गोष्ट ईचारतस ती कठीण शे; मानवमा वास न करनारा देवनाशिवाय कोणाचघाई ती महाराजसना हुजूरसले सांगता येवाव नही.
12 हाई ऐकीन राजा क्रोधतीन संतापना अनी बाबेलना सर्वा ज्ञानीसना वध कराना अशी त्यानी आज्ञा करी.
13 ज्ञानीसना वध कराना हाऊ हुकूम सुटना, तवय दानीएलना अनं त्याना सोबतीसना वध कराना म्हणीन लोक त्यासले शोधाले लागनात.
परमेश्वरानाद्वारा दानीएलले अर्थ प्रकट करणं
14 राजाना गारद्यासना नायक अर्योक हाऊ बाबेलसना ज्ञानीसना वध कराले निंघेल व्हता, त्यानासंगे दानीएलनी चातुर्यतीन अनं सुज्ञतीन भाषण करं.
15 त्यानी राजाना सरदार अर्योक याले सांगं, अशी कडक राजाज्ञा काबंर शे? तवय अर्योकनी दानीएलले ती बातमी सांगी.
16 मंग दानीएलनी राजाकडे जाईन ईनंती करी की, माले येळ द्या म्हणजे मी हुजूरले स्वप्नना अर्थ सांगसु.
17 यावर दानीएलनी आपला घर जाईन आपला सोबतीसले हनन्या, मीशाएल अनं अजऱ्या यासले हाई बातमी सांगी.
18 अनी बाबेलना इतर ज्ञानीसबरोबर आपला अनं आपला सोबतीसना घात व्हवाले नको म्हणीन दानीएलनी त्यासले ईनंती करी की, हाई रहस्यासंबंधतीन स्वर्गना देवनी आपलावर दया कराले पाहिजे अश त्यानाजोडे मांगानं.
19 तवय ते कोड दानिएलले रातना येळले दर्शनना द्वारा प्रगट व्हयना; त्यानावरीन दानीएलनी स्वर्गना देवना धन्यवाद करा.
20 दानीएल बोलना, देवना नाव युगानुयुग धन्यवादित राहो; कारण ज्ञान अनं बल हाई त्यानाच शेतस;
21 तोच प्रसंग अनं समय बदलस; तो राजासले स्थानापन्न किंवा स्थान भ्रष्ट करस; तो ज्ञानीसले ज्ञान देस अनं बुध्दिमानसले बुध्दि देस.
22 तो गहन अनं गूढ गोष्टी प्रगट करस; अंधारमा काय शे हाई त्याले ठाऊक ऱ्हास; त्यानाजोडे प्रकाश वसस.
23 हे मना पुर्वजसना देवा, मी तुना उपकार मानस अनं तुना स्तवन करस की तू माले ज्ञान अनं बल हाई देल शेतस अनी ज्यानाकरता आम्हीन तुले ईचारं ते तू माले आते समजाडेल शे; तू आमले राजानी गोष्ट सांगेल शे.
राजाले स्वप्नना अर्थ सांगनं
24 यानावर दानीएल, ज्या अर्योकले राजानी बाबेलना ज्ञानी पुरूषसना वध कराले नेमेल व्हतं त्यानाकडे जाईन बोलना, बाबेलना ज्ञानीसना वध करू नका; माले महाराजनापुढे न्या म्हणजे मी त्यासले स्वप्नना अर्थ सांगस.
25 तवय अर्योकनी दानीएलले लगेच राजाकडे लई जाईसन सांगं, राजानं स्वप्नना अर्थ सांगनारा असा एक पुरूष कैद करीन आणेल यहूदीसमा माले आढळेल शे.
26 बेलटशस्सर हाई नाव मिळेल दानीएलले राजानी सांगं, मी जे स्वप्न दखं ते अनं त्याना अर्थ माले सांगाले तू समर्थ शे का?
27 दानीएलनी राजाले उत्तर दिधं की, सरकारनी जे कोड ईचारेल शे ते ज्ञानी, मांत्रिक, ज्योतिषी अनं दैवज्ञ यासले राजाले सांगता येवावू नही.
28 तरी कोड प्रगट करनारा देव स्वर्गमा शे अनी त्यानी पुढला काळमा काय व्हवाव शे हाई नबुखदनेस्सर महाराजले सांगेल शे. आपलं स्वप्न, आपण बिछानामा पडेल व्हतात तवय आपलाले व्हयेल दृष्टांत असा शे.
29 महाराज आपली गोष्ट अशी शे की, यानापुढे काय घडणार शे हाई ईचार आपण बिछानामा पडेल व्हतात आपला मनमा वनं की यानापुढे काय व्हई, हाई कोड प्रगट करनारा देवनी आपलाले सांगेल शे.
30 आते मनी गोष्ट अशी शे की, हाई कोड माले प्रगट व्हयेल शे ते मी काही बाकीना माणसंपेक्षा अधिक बुध्दिमान शे म्हणीन नही, तर महाराजले स्वप्नना अर्थ प्रगट व्हवाले पाहिजे अनं आपलाले आपला मनमाधलं ईचार समजावं म्हणीन व्हयेल शे.
31 महाराज, आपण दृष्टांत दखा त्यामा एक मोठा पुतळा आपला नजरमा पडना. हाऊ पुतळा भव्य अनं चमकदार असा आपलापुढे उभा व्हता; त्यानं रूप विक्राळ व्हतं.
32 त्या पुतळानं शीर उत्तम सोनानं, त्यानी छाती अनं हात रूपानं, त्यानं पोट अनं मांडया पितळन्या,
33 त्यानं पाय लोखंडना अनं त्याना पावलसना काही भाग लोखंडना अनं काही भाग मातीना व्हता.
34 आपन स्वप्न दखी राहिंतात तवय कोनाच हात न लागता, एक पाषाण आपोआप सुटना अनं त्या पुतळाना लोखंडी अनं मातीना पावलसवर आदळीन त्यासनं फुटीन तुकडातुकडा व्हयनात.
35 तवय लोखंड, माती, पितळ, रूपं अनं सोनं यासनं चुरा व्हईन उन्हाळ खळामाधलं भुसानामायक ती व्हयनी. वारानी ती उधळीन लिधं; त्यासना मागबी राहिना नही; त्या पुतळावर आदळेल पाषाणना एक मोठा पर्वत व्हईन त्यानी सर्व पृथ्वी व्यापी टाकी.
36 हाईच आपलं स्वप्न, आते याना अर्थ राजाना हुजूरले आम्हीन सांगस.
37 महाराज, आपण राजाधिराज राहिसन आपलाले स्वर्गना देवनी राज्य, पराक्रम, बल, अनं वैभव हाई देल शेतस;
38 अनी जठेजठे मनुष्यजातीना निवास शे, तठला वनपशु अनं आकाशमाधला पक्षी त्यानी आपला अधीन करेल शेतस, त्या सर्वासवर आपण सत्ता ठेयेल शे, सुवर्णना शीर आपणच शेतस.
39 आपलानंतर आपलापेक्षा कनिष्ट अस राज्य उत्पन्न व्हई; अनी पितळनं अस तिसरं राज्य व्हई; ते सर्वा पृथ्वीवर सत्ता चालाडी.
40 चौथा राज्य लोखंडसारखं मजबूत व्हई; लोखंड सर्वासना भुगाभुगा करस तसं ते राज्य चुर्ण करनारा लोखंडनासारखं सर्वासना चुर्ण करी.
41 आपण त्या पुतळानं पावलं अनं पावलसना बोटे दखात; त्यासना काही भाग कुंभारना मातीना अनं काही भाग लोखंडना व्हता; तसं हाई राज्य व्दिविध व्हई; तरी मातीमा लोखंड मिसाळेल आपण दखात तश त्या राज्यमा लोखंडनी मजबुती राही.
42 त्या पुतळानं पावलंसना बोटे काही भाग लोखंडना अनं काही भाग मातीना व्हतं; तसं ते राज्य अंशत: बळकट अनं अंशत: दुर्बळ असं व्हई.
43 लोखंड मातीनासोबत मिसळेल आपण दखात, तसं त्या राज्यमाधलं लोके इतर लोकसनाबरोबर संबंध जोडतीन, पण जसं लोखंड मातीनाबरोबर एकत्र व्हस नही, तसं त्याबी त्यासनाबरोबर एकत्र व्हवावूत नहीत.
44 त्या राजासना काळमा स्वर्गना देव एक राज्यनी स्थापना करी, त्याना कधी भंग व्हवाव नही; त्यानं प्रभुत्व दुसराना हातमा कधीच जावाव नही; तर ते या सर्वा राज्यसना चुर्ण करीन त्यासले नष्ट करी अनं ते सर्वकाळ टिकी.
45 आपण स्वप्नमा अश दखं की कोणाच हात न लागता त्या पर्वतपाईन एक पाषाण आपोआप सुटना अनी त्यानी लोखंड, पितळ, माती, रूपं अनं सोनं यासनं चुर्ण करात त्यानावरीन पुढं काय व्हवाव शे हाई त्या थोर देवनी महाराजसना हुजूरले समजाडेल शे; हाईच आपलं स्वप्न, अनं त्याना अर्थबी नि:संशय हाऊच शे.
राजानाद्वारा दानीएलना सन्मान
46 तवय नबुखदनेस्सर राजानी पालथं पडीसन दानीएलले साष्टांग नमस्कार घालात अनी त्यानापुढे नैवेद्य ठेईन त्याले धूप दाखाडा अशी आज्ञा करी.
47 राजानी दानीएलले सांगं, तुमना देव खरोखरच देवाधिदेव अनं राजराजेश्वर शे अनी तुले हाई कोड प्रगट करता वन म्हणीन तो कोड प्रगट करनारा देव शे.
48 मंग राजानी दानीएलले मोठा पदवर चढायं, त्याले मोठमोठी इनाम दिधी, त्याले सर्वा बाबेल परगण्यानी सत्ता दिधी अनी त्याले बाबेलना सर्वा ज्ञानीसना प्रमुखसना अध्यक्ष करात.
49 राजानी दानीएलना ईनंतीवरीन शद्रख, मेशख अनं अबेदनगो यासले बाबेल परगण्यासना कारभार सांगात; पण दानीएल राजदरबारमा राहे.