3
तप्त भट्टीमाईन सुटका
नबुखदनेस्सर राजानी सुवर्णानी एक मूर्ति बनाडी, तिनी उंची साठ हात अनं रूंदी सहा हात व्हती; तिनी स्थापना त्यानी बाबेल परगणामाधलं दूरा नावना मैदानमा करी. हाई जी मूर्ती नबुखदनेस्सर राजानी स्थापेल व्हती तिनी प्रतिष्ठा कराकरता त्यानी राजप्रतिनिधी, नायब अधिपति, सरदार, मंत्री, भांडारी, न्यायपंडित, न्यायाधीश अनं प्रांतसना सर्वा अधिकारी यासनी एकत्र जमानं म्हणीसन त्यासले बोलावनं करात. तवय राजप्रतिनिधी, नायब अधिपति, सरदार, मंत्री, भांडारी, न्‍यायपंडित, न्यायाधीश अनं प्रांतसना सर्वा अधिकारी ह्या नबुखदनेस्सर राजानी स्थापन करेल मूर्तीनी प्रतिष्ठा कराकरता एकत्र जमनात अनी तिनासमोर उभा राहिनात. मंग एक घोषणा करनारानी मोठा आवाजतीन भाषण करा की, अहो लोकसवनं, येगयेगळा राष्ट्रमाधला येगयेगळा भाषा बोलनारा लोकसवनं, तुमले आज्ञा व्हई राहिनी शे की, शिंग, बासरी, सतारी, सारंगी, वीणा पुंगी वगैरे वाद्यसना आवाज तुमना कानमा पडताच नबुखदनेस्सर राजानी जी सुवर्णमूर्ती स्थापेल शे तिनापुढे तुम्हीन साष्टांग दंडवत घालानं; जो कोणी तिले साष्टांग दंडवत घालावु नही त्याले तवळच धगधगीत आग्नीना भट्टीमा टाकतीन, यानाकरता शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा वगैरे वाद्यसना आवाज कानमा पडताच येगयेगळा राष्ट्रमाधला येगयेगळा भाषा बोलनारा सर्वा लोकसनी नबुखदनेस्सर राजानी स्थापेल करेल त्या सुवर्णमूर्तीपुढे साष्टांग दंडवत घालात.
दानीएलना तीन सोबतीसवर आज्ञा मोडानं आरोप
यावर बराच खास्दीसनी राजाकडे जाईन यहूदीसवर आरोप करात. त्या नबुखदनेस्सर राजाले बोलनात, महाराज, सर्वकाळ जिवत राव्हा. 10 महाराज, आपण हुकूम करा की, शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यसना आवाज ज्या ज्या मनुष्यना कानमा पडी त्यानी सुवर्णमूर्तीपुढे साष्टांग दंडवत घालानं; 11 अनी जो कोणी साष्टांग दंडवत घालावु नही त्याले धगधगीत आग्नीना भट्टीमा टाकानं; 12 पण आपण बाबेल परगणावर नेमेल शद्रख, मेशख, अबेदनगो या नावना कोणी यहूदी शेतस त्यासनी, महाराज, आपली पर्वा करी नही; त्या आपला देवसना उपासना करतस नही अनी आपण स्थापेल करेल सुवर्ण मूर्तीनी पूजा करतस नही.
13 हाई ऐकीन नबुखदनेस्सर क्रोधतीन संतापना अनी शद्रख, मेशख, अबेदनगो यासले लई येवानी आज्ञा करी. तवय लोकसनी त्यासले राजानापुढे आण. 14 नबुखदनेस्सर त्यासले बोलना, अरे शद्रख, मेशखा, अबेदनगो, तुम्हीन मना देवसनी उपासना करतस नही अनं मी स्थापन करेल सुवर्णमूर्तीनी पूजा करतस नही, अस तुम्हीन मुद्दाम करतस का? 15 आते शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यासना आवाज ऐकताच मी करेल मूर्तीपुढे तुम्हीन साष्टांग दंडवत घालनात तर बरं; नही घालनात तर तुमले धगधगीत आग्नीना भट्टीमा लगेच टाकामा ई; मना हाततीन तुमले सोडाई अस कोणता देव शे? 16 शद्रख, मेशख अनं अबेदनगो यासनी राजाले उत्तर दिधं की, महाराज, या बाबतमा आपलाले उत्तर देवानं आमले आवश्यकता दखास नही. 17 ज्या देवनी आम्हीन उपासना करतस तो आमले धगधगीत आग्नीना भट्टीमाईन सोडावाले समर्थ शे; महाराज, तो आमले आपला हातमाईन सोडाई. 18 ते कसबी राहो, पण महाराज, हाई पक्क समजानं की, आम्हीन आपला दैवतसना उपासना करावुत नही अनी आपण स्थापन करेल सुवर्णमूर्तीले दंडवत घालावुत नही.
दानीएलना तीन सोबतीसले भट्टीमा टाकनं
19 हाई ऐकीसन नबुखदनेस्सर राजा संतापना; शद्रख, मेशख अनं अबेदनगो यासनासंबंधतीन त्यानी मुद्रा पालटनी अनी त्यानी आज्ञा करी की, भट्टी पहिलापेक्षा सातपट तप्त करा. 20 मंग त्यानी आपला सैन्यमातीन काही बलवान पुरूषसले आज्ञा करी की, शद्रख, मेशख अनं अबेदनगो यासन्या मुसक्या बांधीन त्यासले त्या तप्त आग्नीना भट्टीमा टाका. 21 तवय त्या पुरूषसले त्यासनं पायमोजे, झगे वगैरे कपडासहित बांधीन धगधगीत आग्नीना भट्टीमा टाकात. 22 राजानं हुकूम पक्का कडक रावामुये ती भट्टी भलती तप्त करेल व्हती; म्हणीन ज्या पुरूषसनी शद्रख, मेशख अनं अबेदनगो यासले तिनावर आणात त्या जाळतीन भाजीसन मरनात. 23 शद्रख, मेशख अनं अबेदनगो ह्या तिन्ही पुरूष मुसक्या बांधेल असं त्या धगधगीत आग्नीना भट्टीमा पडनात.
24 नंतर नबुखदनेस्सर राजा चकित व्हईन पटकन उठना; तो आपला मंत्रीले बोलना, आपण आग्नीमा तिन जणसले बांधीन टाकात ना? त्यासनी राजाले उत्तर दिधं, हा सरकार, खरे शे. 25 तो बोलना, दखा! चार पुरूष आग्नीमा मोकया फिरी राहिना शेतस असं माले दखास; त्यासले काहीएक इजा पोहचेल नही; चौथानं स्वरूप तर एखादं देवपुत्रनासारखं शे.
दानीएलना तीन सोबतीसना सन्मान
26 मंग नबुखदनेस्सर त्या धगधगीत आग्नीना भट्टीना दारनाजोडे ईसन बोलना, अहो शद्रख, मेशख अनं अबेदनगो, परात्पर देवना सेवकहो, आग्नीमाईन बाहेर या. तवय शद्रख, मेशख अनं अबेदनगो आग्नीमाईन बाहेर वनात; 27 अनी राजप्रतिनिधी, नायब अधीपति, सरदार अनं राजमंत्री ज्या तठे जमेल व्हतात त्यासनी या पुरूषासले दखा तवय त्यासना शरीरवर आग्नीना परिणाम व्हयेल नव्हता, त्यासना डोकाना एक केसबी बळेल नव्हता, त्यासना पायमोजाले काही व्हयेल नव्हतं अनी आग्नीना गंधबी त्यासले लागेल नव्हता. 28 तवय नबुखदनेस्सर बोलना, शद्रख, मेशख अनं अबेदनगो यासनी आपला देववर भाव ठेवा, राजानं शब्द मोडात, आपला देवाशिवाय अन्य देवनी सेवा अनं उपासना करानी नही म्हणीन त्यासनी आपलं देह अर्पण करा, त्यासले त्यासना देवनी आपला देवदूत धाडीसन सोडायेल शे; त्याना धन्यवाद असो. 29 यानाकरता मी फर्मावस की, सर्वा लोके, प्रत्येक राष्ट्रना अनं प्रत्येक भाषा बोलनारा लोके, यासनापाईन जे कोणी शद्रख, मेशख अनं अबेदनगो यासना देवनाविरूध्दमा काही बोलतीन त्यासनं तुकडा तुकडा करामा येतीन; त्यासना घरना उकिरडा करामा येतीन; कारण अश प्रकारंमा सोडावाले समर्थ दुसरा कोणी देव नही. 30 नंतर राजानी शद्रख, मेशख अनं अबेदनगो यासले बाबेल परगणमा मोठी जागमा नेमा.