4
नबुखदनेस्सरनं दुसरं स्वप्न
नबुखदनेस्सर राजा याजकडतीन सर्वा पृथ्वीवर राहनारा सर्वा लोकसले. सर्वा राष्ट्रसना अनं सर्वा भाषा बोलनारा लोकसले: तुमले शांती भेटो! परात्पर देवनी जी चिन्ह अनं जे अद्भुत चमत्कार मनासंबधमा दखाडेल शे ती प्रगट करानं हाई माले बरं वाटेल शे. त्यानं चिन्ह कितलं मोठं शेतस! त्याना अद्भुत चमत्कारना प्रभाव केवढा! त्यानं राज्य सर्वकाळनं शे अनं त्यानं प्रभुत्व पिढ्यापिढ्या राहनारं शे.
मी नबुखदनेस्सर आपला घरमा आनंदमा व्हतु, आपला मंदिरमा समृध्द व्हतु. मी स्वप्न दखा त्यानाघाई मी भयभीत व्हयनु; मी पलंगवर पडेल व्हतु तवय मना ईचार अनं मना मनमा घोळत राहनारा कल्पना यासनाघाई मी चिताक्रांत व्हयनु. तवय मी आज्ञा करी की, माले स्वप्नना अर्थ सांगाकरता बाबेलमाधलं सर्वा ज्ञानी पुरूषसले मनाजोडे आणानं. तवय ज्योतिषि, मांत्रिक, खास्दी अनं दैवज्ञ ह्या वाडामा येवावर मी आपलं स्वप्न त्यासनापुढे मांडात; पण त्यासनी त्याना अर्थ माले सांगं नही. सरतेशेवटी दानीएल मनापुढे वना; त्यानं मना देवना नाववरीन बेलटशस्सर हाई नाव ठेयेल शे अनं त्याना ठायी पवित्र देवना आत्मा वसी राहिना शे; त्याले मी आपलं स्वप्न सांगं. मी बोलनु, हे बेलटशस्सर, ज्योतिषसना अध्यक्षा, पवित्र देवना आत्मा तुना ठायी शे अनं कोणतबी कोड तुले समजाले अवगड नही हाई माले ठाऊक शे, तर मी दखेल स्वप्नामाधलं दृष्टांत अनं त्याना अर्थ माले सांग.
10 मी आपला पलंगवर पडेल व्हतु तवय मना मनमा जे दृष्टांत घोळी रांहितं ते हाई: मी दखं, तो पृथ्वीना मध्यभागमा एक झाड व्हता, त्यानी उंची भलती मोठी व्हती. 11 तो झाड वाढीन मजबूत व्हयना, त्यानी उंची आकाशमा पोहचनी अनं तो सर्वा पृथ्वीना दिगंतापावत दखावाले लागना. 12 त्याले सुंदर पाने व्हती, त्यानावर फळं भरपुर राहिसन सर्वासले खावाले पुष्कळ व्हती. वनपशु त्याना आश्रयतीन राहेत, आकाशमाधला पक्षी त्याना फांद्यासमा वस्ती करेत, अनं त्या झाडवर सर्वा प्राणीसना पोषण व्हत राहे. 13 मी पलंगवर पडनु व्हतु तवय मना मनमा दृष्टांत घोळी राहिंतात, त्यामा मी दखं की, एक जागल्या, पवित्र देवदूत, आकाशमाईन उतरना. 14 तो मोठा आवाजतीन बोलना, हाऊ झाड तोडी टाका, ह्याना फांद्या ढाळी टाका, ह्याना पाने झाडी टाका अनं ह्याना फळं विखरी टाका; ह्याना खाल राहनारा पशु निंघी जावोत अनं पक्षी ह्याना फाद्यांसमाईन उडी जावोत. 15 तरी पण ह्यानं बुंध जमीनमा राहू द्या; याले लोखंड अनं पितळ याना पट्टाघाई बांधीन रानमाधलं कोवळा गवतमा राहू द्या; याले आकाशमाधलं दवतीन भिजू द्या; भूमीवरना गवतना वाटा याले वनपशुबरोबर भेटो; 16 यानं मानवहृदय जाईसन याले पशुहृदय प्राप्त होवो अनं सात काळ त्यानावरीन जावोत. 17 हाई शासन त्या जागल्याना ठरावाप्रमाणं अनं पवित्र जणसना वचननुसार व्हयनं; ते अशाकरता की, मानवी राज्यसवर देवनी सत्ता शे, अनं तो ती पाहिजे त्यासले देस अनी त्यानावर अगदी हलका प्रतिना मनुष्यपाईन पाहिजे त्याले नेमस, हाई सर्वा जीवधारीसले समजावं. 18 हाई स्वप्न मी नबुखद्नेस्सर राजानी दखेल शे; तर आते हे बेलटशस्सरा, याना अर्थना उलगडा कर, कारण मना राज्यमाधलं सर्वा ज्ञानी पुरूषसले याना अर्थ माले सांगता वन नही; पण तुले सांगता ई, कारण पवित्र देवना आत्मा तुना ठायी शे.
दानीएल स्वप्नना अर्थ सांगस
19 मंग बेलटशस्सर हाई नाव दियेल दानीएल काही येळ ईचारमा पडना अनं ईचारसघाई त्यानं मन व्याकूळ व्हयनं. तवय राजा त्याले बोलना, बेलटशस्सरा, हाऊ स्वप्नसंबंधमा अनं त्याना अर्थसंबंधमा तू घाबरू नको, तवय बेलटशस्सरनी सांगं, मना स्वामी, हाई स्वप्न तुना द्वेषासले अनं त्याना अर्थ तुना वैरीसले लागू व्हवाले पाहिजे. 20 तू झाड दखा, तो वाढीन मजबूत व्हयना, त्यानी उंची आकाशमा पोहचनी, तो सर्वा पृथ्वीले दखावाले लागना; 21 त्याना पाने सुंदर व्हती, त्यानावर फळं भरपुर राहीन सर्वासले खावाले पुष्कळ व्हती, त्याना खाल वनपशु राही राहिंतात अनं त्याना फांद्यासमा आकाशमाधला पक्षी वस्ती करी रांहितात.
22 हे राजा, तो झाड तूच शे; तू वाढीन बलवान व्हयेल शे; तुनी थोरवी वाढीन आकाशपावत पोहचेल शे. 23 एक जागल्या, पवित्र देवदूत, आकाशमाईन उतरीन बोलना, हाऊ झाड तोडीन याना नाश करा; पण ह्याना बुंध जमीनमा राहू द्या; ह्याले लोखंड अनं पितळ यासना पट्टाघाई बांधीन रानमाधला कोवळा गवतमा राहू द्या; ह्याले आकाशमाधला दवतीन भिजू द्या; ह्याले वनपशुबरोबर वाटा भेटो, यानावरीन सात काळ जावोत तोपावत अस होवो, अश राजानी दखेल शे. 24 हे राजा, याना अर्थ असा शे अनी मना स्वामी राजा, यानाविषयी परात्पर देवना हाऊ ठराव शे. 25 तुले मनुष्यमातीन घाली देतीन; तुनी वस्ती वनपशुमा व्हई; तुले बैलनामायक गवत खाण पडी; तू आकाशमाधला दवतीन भिजशी; मानवी राज्यावर परात्पर देवनी सत्ता शे अनं तो ती पाहिजे त्यासले देस हाई ज्ञान तुले व्हवापावत तुनावरतीन सात वर्ष जातीन. 26 त्यासनी त्या झाडनं बुंध राखी ठेवाले सांगं, याना अर्थ हाऊ शे की, सत्ता हाई स्वर्गना देवनी शे हाई ज्ञान तुले व्हयनं म्हणजे तुनं राज्य निश्चितमा तुले भेटी. 27 म्हणीन हे राजा, मनी ईनंती तू मान्य करानी; तू पाप सोडीन धर्माचरण करानं; अधर्म सोडीन गरीबसवर दया करानी; अशामा कदाचित तुनं स्वास्थ्य अधिक वर्ष राही.
28 हाई सगळं नबुखद्नेस्सर राजा यानावर गुजरनात. 29 बारा महिना लोटावर तो एकदाव बाबेलना राजवाडाना गच्चीवर फिरी राहिंता. 30 त्या येळले राजा बोलना, हाई मोठं बाबेल नगर राजनिवासकरता मनाच पराक्रमतीन अनं मनाच प्रतापना वैभवकरता मी बांधेल शे ना! 31 हाई शब्द राजाना मुखमाईन निंघस नही निंघस तवळच आकाशवाणी व्हयनी की, हे नबुखद्नेस्सरा, हाई तुले विदित होवो की तुनी हातनी राजसत्ता जायेल शे. 32 तुले मनुष्यमाईन घाली देतीन; तुनी वस्ती वनपशुसमा व्हई; तुले बैलनामायक गवत खाणं पडी; अनी मानवी राज्यावर परात्पर देवनी सत्ता शे अनं तो ती पाहिजे त्याले देस हाई ज्ञान तुले व्हस तोपावत तुनावरीन सात वर्ष जातीन. 33 त्याच येळमा हाई नबुखदनेस्सरना प्रत्ययमा वनं; त्याले मनुष्यमातीन घाली दिधं अनं तो बैलनागत गवत खावाले लागना; त्यानं शरीर आकाशमाधला दवतीन भिजाले लागना; आठपावत की त्याना केस गरूडना पिसंप्रमाणं वाढाले लागनं अनी त्याना नखे पक्षीसना नखेसनासारखं व्हयनात.
नबुखद्नेस्सरनाद्वारा परमेश्वरनी स्तुती
34 ह्या सात वरीस संपनात तवय मी राजा नबुखद्नेस्सरनी आपला डोया आकाशकडे लावात; मनी बुध्दि माले परत वनी; मी परात्पर देवना धन्यवाद करा, त्या सर्वकाळ जिवत राहनारा देवना स्तवन करा अनं त्यानी महिमा करी; कारण त्यानं प्रभुत्व सर्वकाळनं शे, अनी त्यानं राज्य पिढ्यानपिढ्या राहनारा शे. 35 पृथ्वीवरना सर्वा रहिवासी फक्त पदार्थ शेतस; तो आकाशमाधला सैन्यासना अनं पृथ्वीवरला रहिवासीसना त्याना इच्छामा ई तसं करस; तू असं काबंर करस, असं त्याना हात धरीन कोणाघाईच त्याले सांगावस नही. 36 त्याच येळले मनी बुध्दि माले परत वनी; मना राज्यना वैभवना मना प्रताप अनं तेज हाई माले परत प्राप्त व्हयनं; मना मंत्री अनं सरदार मना भेटले वनात; मी आपला राज्यमा स्थापित व्हयनु; अनं माले अत्यंत मोठी थोरवी प्राप्त व्हयनी. 37 आते मी नबुखद्नेस्सर स्वर्गना राजानं स्तवन करस, त्याना जयजयकार करस अनं त्याना महिमा वर्णस; कारण त्याना सर्वा कृत्यं सत्य शेतस; त्याना सर्वा मार्ग न्याय्य शेतस; जो मानुस घमंडतीन चालस, त्याले तो नम्र करी टाकस.