5
भिंतवरला लिखाण
बेलशस्सर राजानी आपला एक हजार सरदारसले मोठी मेजवाणी करी; त्या हजारसना समक्ष तो द्राक्षरस पिणा. द्राक्षरसना सेवन करी राहिंता तवय नबुखदनेस्सरनी हुकूम करा की, मना बाप नबुखद्नेस्सर यानी यरूशलेमाधलं मंदिरमाईन जी सोनारूपानं पात्रं आणेल शेतस ती लई या, म्हणजे मी, मना सरदार, मन्या बायका अनं उपबायका यासले त्यामाईन द्राक्षरस पिता ई. तवय यरूशलेममाधलं देवना मंदिरना पवित्रस्थानमाईन आणेल सोनानं पात्रं त्या लिसन वनात; राजा, त्याना सरदार, त्याना बायका अनं उपबायका ह्या त्यानातीन द्राक्षरस पिनात. त्यासनी द्राक्षरस पिसन सोनं, रूपं, पितळ, लोखंड, काष्ठ अनं पाषाण यासपाईन घडेल दैवतसना स्तवन करात.
त्याच येळले मानवी हातना बोटे प्रगट व्हयनात अनं त्यासनी दिवटनासमोर राजवाडाना भितना गिलावावर काहीतरी लिखं अनी हातना बोटे लिखी राहिंतात ती राजाना नजरमा पडना. तवय राजाना तोंड पालटना अनं तो चिताक्रांत व्हयना; त्याना कंबरना सांधा ढिला पडनात, अनी त्याना गुडघा लटपटू लागनात. राजानी मोठा आवाजमा वरडीन सांगं, की, मांत्रिक, खास्दी अनं दैवज्ञ यासले लिसन या. राजा त्या बाबेलना ज्ञानीसले बोलना, जो कोणी हाऊ लेख वाची अनं त्याना अर्थ माले सांगी त्याले जांभळा रंगना कपडा भेटी, त्याना गळामा सोनानं गोफ घालामा ई अनं तो राज्यमाधला तिन अधिपतीमाधला एक व्हई. मंग राजानं सर्वा ज्ञानी पुरूष वाडामा वनात; पण त्यासले तो लेख वाचता वना नही अनी त्याना अर्थ राजाले सांगता वना नही. तवय बेलशस्सर राजा भलता चिताक्रांत व्हयना, त्यानी मुद्रा पालटनी अनी त्याना सरदार घाबरनात.
10 राजा अनं त्याना सरदार यासना शब्द ऐकीन राणी भोजनगृहमा वनी. ती बोलनी, महाराज, सर्वकाळ जिवत राव्हा, आपली मननी तळमळ व्हवू देऊ नका; आपण आपलं तोंड उतरू देऊ नका. 11 पवित्र देवना आत्मा ज्यामा शे अस एक पुरूष आपला राज्यमा शे; आपला बापना कारकीर्दीमा प्रकाश, विवेक, अनं देवना ज्ञानसारखं ज्ञान हाई त्यानाठायी दखाई वनं; महाराज, आपला बाप नबुखद्नेस्सर राजा यानी त्याले ज्योतिषी, मांत्रिक, खास्दी अनं दैवज्ञ यासना अध्यक्ष नेमेल व्हतं; 12 कारण उत्तम आत्मा ज्ञान, विवेक, स्वप्नना अर्थ सांगनं, कूट प्रश्न उलगडणं, कोडी उकलणं, यानासंबंधतीन ज्याले राजानी बेलटशस्सर अश नाव देल व्हतं तो दानीएल प्रवीण व्हता अस दखाई वनं; तर आते दानीएलले बलाईसन आणा म्हणजे तो अर्थ सांगी.
दानीएल लेखना अर्थ सांगस
13 तवय दानीएलले राजानापुढे आणात. राजा त्याले बोलना, मना बाप जो राजा‍ त्यानी यहूदातीन पकडीन आणेल लोकसपाईन दानीएल तो तूच शे का? 14 मी तुनाबद्दल ऐकेल शे की देवना आत्मा तुना ठायी शे अनी बुध्दी, विवेक अनं उत्तम ज्ञान हाई तुना ठायी दखाई वनी शे. 15 आते हाऊ लेख वाचीन त्याना अर्थ करीसन माले सांगानं म्हणीन ह्या ज्ञानी अनं मांत्रिक लोक मनापुढे आणात, पण त्याना अर्थ त्यासले सांगता वना नही. 16 मी तुनाबद्दल ऐकेल शे की, तुले स्वप्नना अर्थ सांगता येस अनं कोडी उकलता येतस; आते तुले हाऊ लेख वाचता ईसन त्याना अर्थ माले सांगता वना तर तुले जांभया रंगना कपडा भेटी, तुना गळामा सोनाना गोफ घालामा ई अनी तू राज्यमातीन तीन्ही अधिपतीमाधला एक व्हशी.
17 तवय दानीएलनी राजाले उत्तर दिधं की, तुना देणग्या तुनाजोडेच राहु दे, तुना बक्षीस दुसरा कोणले तरी दि टाक, पण मी हाई लेख राजाले वाचाडीन दखाडस अनं त्याना अर्थ करीसन त्याले सांगस. 18 हे राजा, परात्पर देवनी तुना बाप नबुखद्नेस्सर याले राज्य, महत्व, वैभव अनं महिमा हाई दिधी; 19 त्यानी त्याले मोठपण दिधा म्हणीन सर्वा लोके, सर्वा राष्ट्रसना अनं सर्वा भाषा बोलनारा लोके त्यानापुढे थरथर कापत अनं त्याले घाबरेत; वाटी त्याले तो ठार मारे अनं वाटी त्याले जिवत ठेये; वाटी त्याले तो थोर करे अनं वाटी त्याले तो नीच करे. 20 पुढे त्याना हृदय घमंडी व्हयना, अनं त्याना आत्मा कठोर व्हईन तो मुद्दामपणतीन वागना तवय त्याले त्याना राज्यपदवरतीन काढामा वना अनं त्याना वैभव हिराई लेवामा वना; 21 त्याले मनुष्यमाईन काढी टाकामा वना अनं त्याना हृदय पशूनासारखं व्हयना; तो रानगाढवसमा वस्ती कराले लागना; तो बैलनामायक गवत खाये अनं त्यानं शरीर आकाशमाधलं दहिवरतीन भिजत राहे. मानवी राज्यवर परात्पर देवनी सत्ता शे अनं तो त्यावर पाहिजे त्याले स्थापस, अस ज्ञान त्याले व्हसतोपावत तो अश राहिना. 22 हे बेलशस्सरा, तू त्याना पोऱ्या शे. हाई सर्वा तुले ठाऊक राहिसन तू आपला मन नम्र करात नही; 23 तर स्वर्गना प्रभुबरोबर तू उद्दामपणा करा; त्याना मंदिरमाधलं पात्र तुनापुढे आणेल शेतस; तू, तुना सरदार, तुनी बायको अनं उपबायको ह्या त्यामाईन द्राक्षरस पियेल शेतस अनी रूपे, सोनं, पितळ, लोखंड, काष्ठ अनं पाषण यासना घडेल दैवत, ज्यासले दखास नही, ऐकता येस नही अनं समजस नही, त्यासना तू स्तवन करात; पण ज्याना हातमा तुना प्राण शे अनं ज्याना स्वाधीन तुना सर्वा व्यवहार शेतस त्या देवले मान दिधा नही; 24 म्हणीन त्यानी ती हातनी बोटे धाडं अनं हाऊ लेख लिखा. 25 हाऊ लिखेल लेख असा शे: मने, मने, तकेल, ऊफारसीन. 26 याना अर्थ असा: मने म्हणजे देवनी तुना राज्यना काळ मोजीन त्याना अंत करेल शे. 27 तकेल म्हणजे तुले तागडीमा तोलात पण तू कमी भरनास. 28 परेस म्हणजे तुनं राज्य विभागीसन मेदी अनं पारसी यासले देल शे.
29 तवय बेलशस्सरनी आज्ञा करावर त्यासनी दानीएलले जांभया रंगना कपडा घालात. त्याना गळामा सोनानं गोफ घालात अनं त्याना संबंधतीन बठीकडे व्दाही फिराई की हाऊ राज्यमातीन तीन्ही अधिपतीमाधला एक शे. 30 त्यास रातले खास्दीसना राजा बेलशस्सर याना वध व्हयना. 31 अनी दारयावेश मेदी हाऊ जोडेजोडे बासष्ट वरीसना व्हता राजा व्हयना.