6
सिंहना गुहामा दानीएल
दारयावेश राजानी आपला मर्जीप्रमाण आपला सर्वा साम्राजमा एकशेवीस प्रांताधिकारी नेमात; त्यासनावर तीन अध्यक्ष नेमात, दानीएल त्यासनापाईन एक व्हता; राजानं काही नुकसान व्हवाले नको म्हणीन प्रांताधिकारसनी आपला हिशोब त्या तिन्हीसले देवानं अस ठरायं. दानीएल त्या अध्यक्षमा अनं प्रांताधिकारीसमा श्रेष्ठ ठरना. कारण त्याना ठायी उत्तम आत्मा वसी राहिंता; त्याले सर्वा राज्यावर नेमी देवानं अस राजाना ईचार व्हता.
अस व्हतं तवय राज्यकारबारसंबंधतीन दानीएलविरूध्द काही निमित्त शोधाना प्रयत्न त्या अध्यक्षसनी अनं प्रांताधिकारीसनी चालाडं; पण त्यासले काही निमित्त किंवा दोष सापडना नही; कारण तो ईश्वासु राहीन त्याना ठायी काही चूक किंवा अपराध सापडना नही. तवय त्या माणसे बोलनात, हाऊ दानीएलविरूध्द काही निमित्त काढता येवाव नही पण त्याना देवना नियमसंबंधतीन त्यानाविरूध्द काही निमित्त काढता वनं तर ते व्हई.
मंग ह्या अध्यक्ष अनं प्रांताधिकारी राजाकडे गोया व्हईसन वनात अनं त्याले बोलनात, दारयावेश महाराज, सर्वकाळ जिवत राव्हा. राज्यमाधला सर्वा देशाध्यक्ष, नायब अधिपती, प्रांताधिकारी, मंत्री अनं सरदार यासनी असा ईचार करेल शे की अस एक राजाज्ञा व्हवाले पाहिजे, अनं अशी कडक आज्ञा फिराई जावाले पाहिजे की, हे राजा तीस दिनपावत आपलाशिवाय कोणीबी देवना किंवा माणुसनी आराधना कोणी करी तर त्याले सिंहना गुहामा टाकानं. तर महाराज, हाई आज्ञा मंजूर करा, फर्मानवर सही करा म्हणजे मेदी अनं पारसी यासना कधी न पलटनारा कायदाना व्यवस्थाप्रमाणं हाऊ ठराव पलटावू नही. तवय दारयावेश राजानी फर्मानवर अनं आज्ञापत्रवर सही करी.
10 ह्या फर्मावर सही व्हयेल शे असं दानीएलनी ऐकं तवय तो आपला घर गया; त्याना खोलीन्या खिडक्या यरूशलेमन्या दिशाकडे राहीन उघड्या व्हत्यात; त्यानी आपला रोजना प्रमाणं दिनमा तीनदावं गुडघा टेकीन प्रार्थना करी अनं आपला देवना धन्यवाद करा. 11 त्या येळले त्या माणसे गोया व्हईसन वनात तवय तो दानीएल आपला देवनी प्रार्थना अनं ईनंती करी राहिना शे असं त्यासले दिसनं. 12 तवय त्या राजा जोडे जाईन त्यानी फिरायेल आज्ञाविषय त्याले बोलनात, महाराज, तीस दिनपावत जो कोणी आपलाशिवाय कोणा देवनी किंवा माणुसनी आराधना करी त्याले सिंहना गुहामा टाकानं अशी आज्ञा आपण फिरायेल शे ना? राजानी उत्तर दिधं की, मेदी अनं पारसी यासना न बदलनारा कायद्याप्रमाणं हाई निश्चित ठरायेल शे. 13 तवय त्या राजाले बोलनात, महाराज, धरी आणेल यहूदीसपाईन तो दानीएल आपलाले अनं आपण सही करेल आज्ञाले मानस नही; तर तो नेहमी तीनदावं आपला देवनाजोडे प्रार्थना करस.
14 हाई शब्द ऐकीन राजा भलता खिन्न व्हयना, अनी दानीएलना बचाव कराना तो ईचार कराले लागना;‍ त्याना बचाव करानं म्हणीन त्यानी सुर्य मावळस तोपावत प्रयत्न करा. 15 मंग त्या माणसे राजाकडे जमाव करीसन वनात अनं त्याले बोलनात, हे राजा हाई ध्यानमा आण: मेदी अनं पारसी यासना अशा कायदा शे की, राजानी करेल आज्ञा किंवा नियम बदलता येवाव नही.
16 त्यानावर राजानी आज्ञावरीन दानीएलले आणीसन सिंहसना गुहामा टाकात. राजा दानीएलले बोलना, ज्या देवनी तू कायम उपासना करस तो तुले सोडाई. 17 त्यासनी एक दगड आणीसन गुहाना दारवर ठेई; अनी राजानी आपला मुद्रना अनं आपला सरदारसना मुद्रसना तिनावर शिक्का करात; तो अश करता की दानीएलना बाबत काहीएक फेरबदल व्हवाले नको.
18 नंतर राजा आपला महालमा गया, त्यानी ती रात उपशमाच काढी; त्यानासमोर वाद्य आणात नही; त्यानी झोप उडनी. 19 मंग राजा मोठा पहाटमाच उठीन लगेच सिंहना गुहानाजोडे गया. 20 तो गुहानाजोडे दानीएलकडे जाईन शोकना आवाजतीन ओरडीन बोलना, हे दानीएल, जिवत देवना सेवक, ज्या देवनी उपासना तू कायम करस त्याले सिंहपाईन तुले सोडवता वन शे का?
21 दानीएल राजाले बोलना, महाराज, सर्वकाळ जिवत राव्हा. 22 मना देवनी आपला देवदूत धाडीसन सिहंसना तोंडं बंद करेल शेतस, त्यासनी माले काहीच अपाय करात नही; कारण त्या देवनासमोर मी निरपराधी ठरनू; अनं महाराज आपलाबी मी काही अपराध करात नही. 23 तवय राजा भलता आनंदीत व्हईसन आज्ञा करी की, दानीएलले गुहानाबाहेर काढा. त्याले गुहाना बाहेर काढावर तो त्याले काही इजा व्हवानं काहीच दखायनं नही, कारण त्याना आपला देववर भरवसा व्हता.
24 तवय ज्या माणसंसनी दानीएलवर आरोप आणेल व्हता, त्यासले राजानी आज्ञावरीन धरी आणात अनी त्यासले अनं त्यासना बायका पोऱ्यासले सिंहना गुहामा टाकात; तवय त्या गुहाना तळनाजोडे पोहचतस तेना अगोदर सिहंसनी सर्वासना हाडसना चुराडा करात. 25 मंग पृथ्वीवरला सर्वा लोकसले, सर्वा राष्ट्रसले अनं सर्वा भाषा बोलनारा लोकसले, दारयावेश राजानी अश लिखीसन कळाव की, तुमले शांती भेटो. 26 मी फर्मावस की, मना साम्राजना सर्वा हद्दीमाधला लोकसनी दानीएलना देवनापुढे थरथर कापीसन त्यानं भय धरानं, कारण तो जिवत देव शे; तो सर्वकाळ जोडे शे; त्यानं राज्य अविनाशी अनं त्यानं प्रभुत्व अनंत शे; 27 ज्यानी दानीएलले सिंहना पंजासमाईन सोडाय तोच बचाव करनारा अनं मुक्तीदाता शे; तो स्वर्ग अनं पृथ्वीवर चिन्ह अनं चमत्कार घडवनारा शे. 28 हाऊ दानीएल दारयावेशना राज्यमा अनं कोरेश पारसी याना काळमा समृध्द व्हयना.