15
मोशेनं गीत
तवय मोशे अनी इस्त्राएल लोकसनी परमेश्वरकरता हाई गीत म्हणं:
“मी परमेश्वर करता गीत म्हणसु, कारण तो महाप्रतापी ठरेल शे; घोडासले सवारीसंगे त्यानी समुद्रमा उलथाई देयल शे. परमेश्वर मनं बल अनी मनं गीत शे; मना देव हावुच, त्यानी मी स्तुती करसु, हावुच मना बापना देव शे, मी यानीच महिमा गासु. परमेश्वर शुरवीर शे; त्यानं नाव यहोवा शे. फारोना रथ अनी त्यानी सैनाले समुद्रमा फेकी दिधं; त्‍याना महारथ अनं सरदार लाल समुद्रमा बुडी गयात. खोल पाणीनी त्यासले झाकी लेयल शे; त्या दगडनामायक खोल तळले जायेल शेतस. हे परमेश्वर तुना उजवा हात सामर्थ्यतीन पराक्रमी व्हयेल शे. हे परमेश्वर तुना उजवा हात शत्रुसना भुसा करस. तुनासंगे लढाई करणारासले तु आपला महा प्रतापतीन उलथाई टाकस; तुना संताप व्हयना तर तु त्यासना भुसानामायक भस्म करी टाकस. तुना नाकपुडसना फुंकीमुये जलना राशी बननात जलप्रवाह राशीनामायक उभा राहिनात, खोल पानी समुद्रना तळले जमी गया. शत्रु बोलना, ‘मी पाठलाग करसु, मी त्यासले गाठी लिसु, मी लुटेल वाटी लिसु; त्याघाई मना जीव तृप्त व्हई, मी तलवार उपशीसन आपला हातघाई त्यासना नाश करसु.’ 10 तु फुंकिसन आपला वारा सोडा तवय समुद्रमा त्या गडप व्हयनात; त्या दडगनामायक पाणीमा बुडी गयात. 11 हे परमेश्वर देवसमा तुनामायक दुसरा देव कोण शे? पवित्र्यमुये वैभवी स्तवनीय कृत्यसनी भयानक, अद्भुत चमत्कार करणारा असा जो तु त्या तुनामायक कोण शे? 12 तु आपला उजवा हात उगारा, अनी पृथ्वीनी त्यासले गिळी टाकं. 13 तु उध्दार करेल आपला लोकसले तु आपली सामर्थ्यातीन नेयल शे; आपला बलघाई तु त्यासले आपला पवित्र निवासकडे लई जाई राहिना शे. 14 हाई ऐकीसन राष्ट्र घाबरी जायेल शेतस; पलेशेथ निवासी घाबरी जायेल शेतस. 15 तवय अदोमना अधिपती हैराण व्हयनात; मवाबना शुरवीर थराथर कापी राहिनात, सर्व कनान निवासीसनी मनस्थिती खराब व्हयेल शे. 16 भिती अनं दहशत त्यासले घेरेल शे. तुना पराक्रमी हातमुये त्या दगडनामायक गप्पच व्हतीन, हे परमेश्वर, तुना लोक पार निंघी गयात तोंवर, तु खरेदी करेल तुनी प्रजा पार निंघी गई तोपावत अस व्हई. 17 तु त्यासले लई जासी, अनी तु निवाडेल देशमा आणीन ठेवशी; हे यहोवा तु आपलाकरता निवाडेल निवास्थान हाईच शे, हे प्रभु, तुना हातघाई बनाडेल तुनं पवित्र स्थान हाईच शे. 18 परमेश्वर युगानयुग राज्य करी.”
मिर्यामनं गीत
19 फारोना घोडा, रथ अनं स्वार समुद्रना तळमा जाईन पडनात अनी परमेश्वरनी सुमद्रनं पाणी त्यासनावर टाकं, पण इस्त्राएल लोकं समुद्रमातीन कोरडी जमिनवर चालीसन गयात, म्हणीसन त्यासनी हाई गीत म्हणेल शे.
20 मंग अहरोननी बहिण मिर्याम संदेष्टी हिनी हातमा डफ लिधा अनी सर्व बाया तिना मांगे डफ लिसन नाचत चालु लागन्यात. 21 अनी मिर्यामनी त्यासना गाणानं धृपद लिधं: “परमेश्वर करता गीत म्हणा, कारण तो महाप्रतापी ठरेल शे; घोडासले सवारीसंगे त्यानी समुद्रमा उलथाई देयल शे.”
मारा आठला कडू पाणी
22 मंग मोशे इस्त्राएल लोकसले लाल समुद्रपाईन पुढे लई गया अनी त्या शूर नावना वैराण प्रदेशमा जाईन पोहचनात, त्यामातीन तिन दिन प्रवास करतांना त्यासले कुठेच पाणी भेटी नही राहिंतं. 23 मंग त्या मारा नावनी एक जागावर वनात, तठलं पाणी भलतच कडू व्हतं म्हणीसन त्यासले पिता ई नही राहिंतं, म्हणीसन त्या स्थळनं नाव मारा अस पडनं. 24 तवय आम्हीन काय पेवानं? अस म्हणीसन त्यासनी मोशेकडे कुरकूर करी 25 मोशेनी परमेश्वरना धावा करा तवय त्यानी त्याले एक वनस्पती दखाडी, ती त्यानी पाणीमा टाकी तवय ते पाणी गोड व्हयनं; तठे त्यासनी त्यासना करता विधी अनं नियम लाई दिधात अनी त्यासनी परीक्षा बी लिधी. 26 अनी सांगं, “तु आपला देव यहोवा यानं वचन मनपुर्वक ऐकशी अनी त्यानी नजरमा जे चांगलं ते करशी, त्यानी आज्ञासकडे कान देशी अनी त्याना सर्व विधी पाळशी तर मिसरी लोकसवर ज्या संकट मी धाडात त्यासमातीन एक बी तुनावर धाडावं नही, कारण मी तुले संकटमुक्त करनारा देव शे.”
27 मंग त्या एलीम आठे वनात; तठे पाणीना बारा झरा अनी सत्तर खजूरना झाडं व्हतात; तठे पाणीजोडे त्यासनी तळ ठोका.
15:1 प्रकटीकरण 15:3 15:2 यशया 12:2; स्तोत्रसंहिता 118:14 15:20 १ शमुवेल 18:6