2
मोशेना जन्म
लेवी घरानामातील एक माणुसनी लेवी वंशनी पोरसंगे लगीन करं. *ती बाई गर्भवती व्हईसन तिले पोऱ्या व्हयना, ते बाळ देखणा शे हाई दखीसन तिनी त्याले तीन महीना दपाडीन ठेवं. पुढे त्याले दपाडीन ठेवता ई नही राहिंतं म्हणीसन लव्हाळंनं एक टोपली बनाडीन त्याले डांबर चोपडं अनं ती टोपलीमा त्या पोऱ्याले ठिसन नदीना किणारले जे उच्च गवत ऱ्हास तठे ठेवं. अनी त्यानं काय व्हई हाई दखाकरता त्यानी बहीण थोडी दूर उभी राहिनी.
मंग फारोनी पोर तठे आंग धोवाले वनी, ती तीना‍ दासीससंगे नदी काठतीन जाई राहींती तवय गवतमा ती टोपली तिले दखायनी, तीनी दासीसले ती टोपली आणाले सांगं. जवय ती टोपली उघाडी तवय तिले ते बाळ दखायनं, ते रडी राहिंतं, तिले त्यानी किव वनी ती बोलनी, “हाई कोणीतरी इब्रीनं बाळ शे.”
तवय त्या बाळनी बहिण फारोना पोरले बोलनी, “तुमनाकरता ह्या बाळले दुध पाजाकरता इब्री बायासमातीन एखादी बाईले बलावू का?”
फारोनी पोर तिले बोलनी, “जाय” बलावं तवय ती पोर जाईसन त्या बाळना मायले लई वनी. फारोनी पोर तिले बोलनी, “ह्या पोऱ्याले लई जा अनी मनाकरता ह्याले दुध पाज, मी तुले पगार दिसू.” मंग ती बाई त्याले लई जाईसन दुध पाजू लागनी. 10 ते बाळ वाढीसन मोठं व्हयनं तवय ती त्याले लिसन फारोना पोरकडे गई, अनी तो तिना पोऱ्या व्हयना, तिनी त्यानं नाव मोशे ठेवं, "कारण मी त्याले पाणीमातीन काढेल शे" अस ती बोलणी.
मोशेनं मिद्‍यानं देशमा पलायन
11 जवय मोशे मोठा व्हयना तवय त्या दिनसमा तो बाहेर आपला भाऊबंधकसकडे गया अनी त्यासनं काबाडकष्ट त्यानी दखं, तवय आपला भाऊबंधसपैकी एकले मिसरी माणुस मारी राहिना अस त्यानी दखं. 12 तवय त्यानी आरंतारं दखं अनी कोणीच नही हाई दखीसन त्यानी त्या मिसरी माणुसले मारी टाकं अनी वाळूमा बुंजी दिधं. 13 तो परत दुसरा दिन बाहेर गया तवय दोन इब्री माणसे एकमेकससंगे मारामारी करतांना त्यानी दखं, तवय त्यानी जो चुकीना व्हता त्याले बोलना, “तु आपलाच इब्री भाऊले का बरं मारी राहिना?”
14 तो त्याले बोलना, “तुले आमनावर अधिकारी अनी न्यायाधीश कोणी नेमेल शे? तु त्या मिसरीले मारी टाकं, तस माले बी माराले दखी राहिना का?” तवय मोशे भ्यायना, तो स्वतःलेच बोलना, “जे मी करं ते लोकसले माहित पडनं वाटतं.” 15 फारोना कानवर हाई गोष्ट गई तवय त्यानी मोशेले मारी टाकानं ठरायं, पण मोशे फारोपाईन पळी गया अनी मिद्द्यान देशमा जाईन राहु लागना अनी तठे एक विहीरजोडे बठना. 16 तठे एक मिद्द्यानी माणुसले सात पोरी व्हत्यात त्या आपला बापन्या शेळ्यामेंढ्यासले पाणी पाजाकरता भांडा भरी राहिंतात. 17 इतलामा काही धनगरसनी ईसन त्यासले हाकलु लागनात, तवय मोशेनी उठीसन त्या पोरीसले मदत करी अनी त्यासना कळपसले पाणी पाजं. 18 त्या आपला बापकडे वनात, तवय तो बोलना, “आज तुम्हीन लवकर कश्या वन्यात.”
19 तवय त्या बोलन्यात, धनगरसपाईन एका मिसरी माणुसनी आमले सोडावं अनी आमनाकरता पाणी काढीसन कळपले पाजं.
20 तो त्यासले बोलना, “तो कोठे शे?” “त्याले तुम्हीन तठेच का बरं सोडी वनात? त्याले जेवाकरता बलाई आना.”
21 मोशे त्या माणुसकडे ऱ्हावाले तयार व्हयना, त्यानी आपली पोरं सिप्पोरा संगे मोशेनं लगीन करी दिधं. 22 तिले पोऱ्या व्हयना, त्यानी त्यानं नाव गेर्षोंम ठेवं, “कारण मी परदेशमा वस्ती करीसन राही राहिनु, अस तो बोलना.”
23 बराच वरीसनंतर मिसरना राजा मरी गया, अनी इकडे इस्त्राएल लोके गुलामगिरी मुये आक्रोश करी राहिंता अनी ती गुलामगिरीमुये त्यासनी करेल आक्रोश देवपावत जाईसन पोहचना. 24 §देवनी त्यासना आक्रोश ऐका तवय अब्राहाम, इसहाक अनं याकोब यासनाशी करेल करारनी त्याले आठवण वनी. 25 म्हणीसन देवनी इस्त्राएल लोकसकडे नजर लाई; देवनी त्यासनाकडे ध्यान दिधं.
* 2:2 प्रेषित 7:20, इब्री 11:23 2:11 प्रेषित 7:23-28; इब्री 11:24 2:15 प्रेषित 7:29; इब्री 11:27 § 2:24 उत्पत्ति 15:13,14