23
न्याय अनी न्यायबुध्दी
1 खोटी अफवा उडावानं नही; खोटा साक्षीदार व्हावाकरता ज्या वाईट शेतस त्यासले साथ देवानं नही.
2 तु वाईट कराकरता गर्दिनीमांगे जावानं नही अनी गर्दीनी मांगे लागीसनी एकादा खटलामा चुकीनं न्याय व्हावाकरता साक्ष देवानं नही.
3 गरीबसना खटला व्हयी तर भेदभाव करानं नही.
4 आपला शत्रुना बैल नाहिते गधडा सुटा फिरतांना तु दख व्हयीते त्यासले फिराईसनी परत त्यानाकडे धाडी देवानं.
5 तु आपला शत्रुना गधडा भारखाल दाबायेल दखा व्हयीते त्याले तशेच सोडानं नही तर त्याले मदत करीन त्यामाईन सोडावानं.
6 तुना लोकासमाईन कोनी गरीब व्हयी त्याना खटलाना न्याय चुकीतीन करानं नही.
7 खोटा खटलासपाईन दुर राहावानं; निर्दोष अनी न्यायी यासले मारानं नही, कारन दुष्टासले मी निर्दोष ठरावावु नही.
8 लाच लेवानी नही; कारन लाच डोळासले आंधळी करस अनी न्यायीसनी शब्दले पलटाई देतस.
9 एकादा परकावर जुलुम करानं नही, कारण त्यासनं मन कशे राहास हाई तुम्हले माहिती शे; कारण तुम्हीबी मिसर देशमा पारका व्हतात.
सातवा वरीस अनी सातवा दिन
10 सव वरीस आपला वावर पेरानं अनी तिना उत्पन्न साठाडानं;
11 पण सातवा वरिशले तिले विसावा देईसनी तिले पडीत राहू देवानं, म्हणजे तुना लोकासमाईन कोणी गरीब व्हतीन ते तिमा उगाडेल खातीन अनी त्यासनी खायेल जे उरायेल व्हयी ते वनपशु खातीन. तुना द्राक्षमळा अनी जैतुन जंगल यानाबारामा तशेच करानं.
12 सहा रोज तु कामधंदा कर अनी सातवा रोजले आराम करानं, म्हणजे तुना बैल अनी गधडा यासले आराम भेटी अनी तुना दाससनी संतती अनी विदेशी यासना जीव तृप्त व्हयी.
13 मी जे काही तुम्हले सांगेल शे त्या सर्वासनी बारामा सावध राहावानं, दुसरा देवसनं नावसुध्दा लेवानं नही, त्यासना नाम उच्चार तोंडमाईन आयकाले येवाले नही पाहिजे.
तीन वार्षीक सण
(निर्गम 34:18-26; अनुवाद 16:1-17)
14 वरिशमा तीनदाव तु मनाकरता मेळा भराईसनी सण करानं.
15 बेखमीर भाकरीसनं सण पाळ; त्या सणासमा मना आज्ञापरमानं अबीब महिनामा नेमेल येळनं सात रोज तु बेखमीर भाकरी खा, कारण तोच महिनामा तुम्हीन मिसर देशमाईन बाहेर निघेल व्हता; कोनीच रिकामा हात लईसनी मनं दर्शनले येवानं नही.
16 जवय वावरमा पैयरेल धान्यनं पहिलं पिक तयार व्हयी तवय तु कापणीनं सण पाळ अनी वरिशनं शेवटले तु आपला वावरमा कष्ट करेल फळनं साठा करशी तवय साठानं सण पाळ.
17 वरशमा तीनदाव तुम्हना माधला बठा माणसानी परमेश्वर देवनं दर्शन लेवानं.
18 मना यज्ञपशुसनं रंगत खमिरनं भाकरीसनीसंगे अर्पानं नही; अनी मनाकरता करेल सणसमासली वपा सकाळपावोत राहु देवानं नही.
19 आपला जमीननं पहिला उत्पन्नमाधला पहिला भाग आपला देव यहोवा याना मंदिरमा तु आणानं. कोकरू त्याना मायनं दुधमा शिजाडानं नही.
आज्ञा अनी समाचार
20 दख, मी एक दूत तुन्हामोरे धाडी राहीनु, तो वाटमा तुनं रक्षन करी अनी जे ठिकान मी तयार करेल शे तठे तुले धाडसू.
21 त्यानामोरे तुम्ही सावध राहीसनी त्याना म्हणनं मानानं; त्यानी आज्ञा मोडानी नही; कारण तो तुम्हना अपराधनं माफ कराऊ नही; त्यानामा मना नाव शे.
22 जर तु खरच मनं म्हणनं ऐकशी अनी मी तुले सांगस ते बठ करशी तर मी तुना शत्रुना शत्रु, तुना विरोधीना विरोधी व्हसु.
23 मना दूत तुनामोरे चालीसनी तुले अमोरी, हित्ती, परिज्जी, कनानी, हिव्वी, अनी यबुसी लोकेसकडे लयी जासू अनी मी त्यासना नाश करसू.
24 त्यासना देवले तु नमन करानं नही, त्यानी पुजापाट करानी नही अनी त्यासनासारखा काम करानं नही, तर त्यासना नाश करानं अनी त्यासना खांबसनं तुकडा तुकडा करी टाकानं.
25 तु आपला देव यहोवा यानी उपासना करानं म्हणजे तो तुम्हना अन्नपानीले बरकत देई अनी तुनामाधला रोगराई काढी टाकी.
26 तुना देशमा कोनबी गर्भपात व्हावाले नही पाहिजे नाहिते कोनी वांझ राहावू नही अनी मी तुले बराच आयुष्य दिसुं
27 ज्या ज्या लोकेसमा तु जाशी त्यासले मी आगोदरच मनी भिती घालीसनी त्यासले भिवाडसू अनी तुना शत्रु तुले पाठ दखाडतीन आशे करसू.
28 मी तुनापहिले गांधीलमाशी धाडसू, त्या हिव्वी, कनानी, अनी हित्ती यासले तुनामोरेतीन पळाडसु.
29 मी त्या बठासले एक वरिशमा हाकालावु नही; तशे करं ते देश उजाड व्हयी अनी वनपशु बराच व्हयीसनी तुले त्रास देतीन.
30 तुनी संख्या व्हईसनी तु देशना ताबा लिसी तोपावत मी बागेबागे तुनामोरेतीन त्यासले काढसु
31 तांबडा समुद्रपाईन ते पलिष्टीसना समुद्रपावोत अनी जंगलपाईन ते फरात नदिपावत तुना देशनी हद्द् करसू; त्या देशमाधला लोके तुना काबुमा आणसु अनी तु त्यासले तुनामोरेतीन हाकली दिशी.
32 तु त्यासनासंगे किंवा त्यासना देवनीसंगे करार करानं नही.
33 त्या तुना देशमा राहावाले नही पाहिजे; त्या राहीनात त्या मनाविरुध्दमा तुले पाप कराले लावतीन; कारन तु त्यासना देवनी पुजापाट करशी अनी त्या तुले पक्का फाशीवर आणतीन.