30
धूपवेदी
(निर्गम 37:25-28)
धुप जायाकरता एक वेदी बनाड; ती बाभुळनी लाकुडनी राहावाले पाहिजे; तिनी लांबी एक हात अनी रूंदी एक हात आशी ती चौकोन राहावाले पाहिजे; अनी तिनी उची दोन हात राहीसनं तिना शिंग आंगनच राहावाले पाहिजे. ती वेदीना वरना भाग अनी तीन्या चारी बाजु अनी तीना शिंग आशी ती बठी शुध्द सोनाघाई मढावानं; अनी तीना आजुबाजूले सोनानं कंगोरा बनाडानं. सोनान्या कडया बनाडीसनं त्या तिन्या कंगोरानंखाल तिन्या दोनी आंगले दोन कोनासले दोन दोन लाई देवानं; या कडयासमां वेदी उचली लई जावाना दांडा घालता येतीन. दांडा बाभुळना लाकुडना बनाडीसनं सोनाघाई मढाई लेवानं; आज्ञापटन्या कोशनाजोडे ज्या पडदा शेतस त्यासनासमोर, म्हणजे आज्ञापटवरला जे दयासनजोडे मी तुले दर्शन देत जासू त्यानामोरे हाई वेदी ठेवानी; हाई वेदीवर अहरोननी सुगंधी द्रवघाई धुप जाळानं; रोज सकासले तो तेलवात करी तवय हाई धुप त्यानी जाळानं. तशेच संध्याकायले तो दिवा लाई तवय त्यानी कायम धुप जाळानं; हाई धुप तुम्हीन पिढयानपिढया कायम परमेश्वरनामोरे जायत राहावानं. त्यानावर येगया धूप, होमबली, अन्नबली तशेच कोनतेबी प्रकारनं पेयार्पण करानं नही;
10 अहरोननी वरीसमां एकदाव तिना शिंगासले प्रायश्चित करानं; पिढयानपिढया वरीसमां एकदाव प्रायश्चितकरता अर्पन करेल पापबलीनं रंगतघाई तिनाकरता त्यानी प्रायश्चित करानं; हाई वेदी परमेश्वरकरता परमपवित्र शे.
जीवबद्दल प्रायश्चित करता खंड
11 मंग परमेश्वर मोशेले बोलना; 12 तु इस्त्राएल लोकेसना संख्याप्रमानं त्यासनी मोजनी करशी तवय मोजानं येळले त्यासनावर मरी येवाले नही पाहिजे‍ म्हनीसनं त्यासनामाईन प्रत्येकनी आपला जीवबद्दल परमेश्वरले त्या येळले खंड देवानं. 13 जेवढा लोकेसनी मोजनी व्हई तेवढासनी पवित्रस्थानमासला शेकेलना चलनप्रमानं अर्धा शेकेल देवानं. शेकेल म्हणजे वीस गेरे हाऊ आरधा शेकेल परमेश्वरकरता समर्पित करेल हिस्सा शे. 14 वीस वरीसना अनी त्यानापेक्षा जास्त वयना लोकेसमां ज्यासनी मोजनी व्हई त्यामाधला प्रत्येकनी परमेश्वरकरता हाऊ हिस्सा अर्पण करानं; 15 तुम्हीन आपला जीवबद्दल प्रायश्चित म्हनीसनं परमेश्वरकरता हाऊ हिस्सानं अर्पण करशात तवय मोठा लोकेसनी अर्धा शेकेलनावर देवानं नही, किवा गरीब लोकेसनी त्यानापेक्षा कमी देवानं नही. 16 इस्त्राएल लोकेसपाईन प्रायश्चितना पैसा लिसनं दर्शनमंडपनं कामले लावानं; हाऊ पैसा इस्त्राएल लोकेसना जीवबद्दल प्रायश्चित देयेलनं स्मारक म्हनीसनं त्यासनाकरता परमेश्वरनामोरे राही;
पितळनं भांड
17 मंग परमेश्वरनी मोशेले सांग; 18 धवाकरता तु पितळनं एक भांड बनाडानं; त्याले पितळनी बैठक करानी; ते दर्शनमंडप अनी वेदी यासना मजारमां ठेईसनं त्यामां पानी भरानं. 19 अहरोन अनी त्याना पोर्‍यासनी आपला हातपाय त्यामा धवानं; 20 दर्शनमंडपमां जावानं आगोदर अनी वेदीपान सेवा कराकरता म्हणजे परमेश्वरकरता हवन जाळाले जावानं येळले त्यासनी आपला हातपाय धवानं, नाहिते त्या मरतीन. 21 हाई प्रकारंतीन त्यासनी हातपाय धवानं, नाहिते त्या मरतीन; अहरोन त्याना वंश यासनाकरता पिढयानपिढया हाई कायमनं विधी व्हावाले पाहिजे.
अभिषकनं तेल
22 मंग परमेश्वरनी मोशेले सांगं; 23 तु उत्तम प्रकारनं मसाला ले, म्हणजे पवित्रस्थाननं चलनप्रमानं पाचशे शेकेल पाक गंधरस, त्याना निमा म्हणजे अडीचशे शेकेल सुगंधी दालचिनी अडीचशे शेकेल सुगंधी बच, 24 सहा किलो तेजपान, अनी चार लिटर जैतुननं तेल हाई लिसनं. 25 त्यासना अभिषेकनं पवित्र तेल म्हणजे गंधनं रिवाजप्रमानं एकजागे करेल सुगंधी तेल तयार कर; हाई अभिषेकनं पवित्र तेल शे. 26 हाई तेलघाई दर्शनमंडप अनी आज्ञापटनं कोश, 27 मेज अनी त्यानावरना बठा सामान, दिवट अनी त्यासना उपकरनं, धुपवेदी, 28 होमवेदी अनी तिना बठा सामान अनी बैठकनासंगे पितळना भांडा यासले अभिषेक करानं; 29 त्यासले पवित्र करानं म्हणजे ती परमपवित्र व्हतीन; ज्याना हातना स्पर्श त्यासले व्हई त्या पवित्र व्हतीन. 30 अनी याजक हाई नातातीन मनी सेवा कराकरता अहरोन अनी त्याना पोर्‍या यासले अभिषेक करीसनं पवित्र करं; 31 इस्त्राएल लोकेसले मनी हाई आज्ञा सांग पिढयानपिढया तुमले मनाकरता पवित्र अभिषेकनं तेल हाईच राही. 32 हाई तेल कोनतेबी माणसासनी आंगले लावानं नही अनी यानासारखा एखादानी मिळाडानं नही; हाई पवित्र शे; अनी याले पवित्र समजानं. 33 एखादानी त्यासासारखा मिळाडीसनं तयार करं किवा एखादाले ते लावं तर त्यानी मोजणी करामा येवाव नही.
पवित्र सुंगधी तेल
34 मंग परमेश्वर मोशेले बोलना तु सुंगंधी मसाला म्हणजे उत्तम गंधरस, जटामासी, गंधबिरुजा अनी शुध्द उद हाई लेवानं; हाई बठा एकसारखं लेवानं; 35 अनी गंधनं रिवाजप्रमानं मीठ मिळाडीसनं निर्मळ, शुध्द अनी पवित्र आशे धुपद्रव्य तयार करान: 36 त्यामासलं काही कुटिसनं त्यानी बुकटी करानं अनी ती जराशी लिसनं दर्शनमंडपमासला जे कोशनामोरे मी तुले दर्शन देत जासू त्यामां ठेवानं; ती तुम्हीन परमपवित्र समजानं. 37 जे धुपद्रव्य तु तयार करशी त्यानासारखा मिळाडीसनं तुम्हीन कोनीबी स्वताले तयार करानं नही; हाई परमेश्वरकरता पवित्र समजानं. 38 कोनी वास लेवाकरता आशे काही तयार करी तर त्यानी मोजणी करामा येवाव नही.
30:38 निर्गम 36:37