29
अहरोन अनी त्याना पोऱ्या यासना समर्पणनी विधी
(लेवीय 8:1-36)
1 त्यासनी याजक हाई नातातीन मनी सेवा करानी म्हणीसनं त्यासले पवित्र कराकरता जे तुले करानं शे ते हाई; एक वासरू अनी दोन निर्दोष मेंढा लेवानं.
2 अनी बेखमीर भाकर, तेलमां मळेल बेखमीर चानकी अनी तेल लायेल बेखमीर चानकी लेवान्या; हया बठा गहुनं पिठनं राहवाले पाहिजे.
3 हया बठा एक टोपलीमां टाक अनी तो वासरू अनी मेंढा यासनासंगे ती टोपली लिसनं ये;
4 मंग अहरोन अनी त्याना पोर्या यासले दर्शनमंडपना दारनामोरे लयीसनं आंग धव;
5 अनी त्या कपडा लिसनं अहरोनले त्याना अंगरखा अनी एफोदना झगा घाल; त्याले एफोद अनी उरपट बांध अनी एफोदना बुट्टीदार पट्टा त्याना कंबरले बांध;
6 त्याना डोकाले फेटा घाल अनी फेटाले पवित्र मुकूट लाव.
7 मंग अभिषेकनं तेल त्याना डोकावर वतीसनं त्याले अभिषेक कर.
8 मंग त्याना पोर्यासले जोडे आणीसनं त्यासना आंगमां अंगरखा घाल;
9 अनी अहरोन अनी त्याना पोर्यासले कमरबंद बांध; त्यासना डोकासले फेटा बांध; याप्रकारं हाई कायमनं विधीतीन त्यासले याजकपद भेटाले पाहिजे. अहरोन अनी त्याना पोर्या यासना संस्कार करानं;
10 तो वासरू दर्शनमंडपनामोरे लई येवानं. अहरोन अनी त्याना पोर्या यासनी आपला हात त्यासना डोकावर ठेवानं;
11 मंग परमेश्वरनामोरे दर्शनमंडपना दारजोडे तो वासरू मारानं;
12 वासरूनं रंगत लिसनं तु आपली आंगठीघाई ते वेदीना शिंगले लावानं अनी बाकीना बठा रंगत वेदीना पायनाजोडे वतानं.
13 त्यानी आतडीवरनी बठी चरबी, काळीज वरना पडदा, दोनी गुर्दा अनी त्यानावरनी चरबी हाई बठा लिसनं त्यासना वेदीवर होम करानं;
14 पण वासरूनं मास, त्याना कातडा अनी ईष्टा हाई छावनीनाबाहेर लिसनं आंगनमां जाळानं; कारन हाई पाप अर्पन बली शे;
15 एक मेंढा लिसनं त्याना डोकावर अहरोन अनी त्याना पोर्या यासनी आपला हात ठेवानं;
16 अनी तो मेंढा मारीसनं त्याना रंगत वेदीना आजुबाजूले शितडानं;
17 मंग तो मेंढा कापीसनं त्याना तुकडा करानं अनी त्यानी आतडी अनी पाय धयीसनं ती त्याना तुकडा अनी डोकं यानासंगे ठेवानं;
18 मंग बठा मेंढानं वेदीवर होम करानं; ते परमेश्वरकरता होमबली शे; तो परमेश्वरकरता मधुर सुगंध हवन शे;
19 मंग दुसरा मेंढा लिसनं त्याना डोकावर अहरोन अनी त्याना पोर्या यासनी आपला हात ठेवानं;
20 मंग तो मेंढा मारानं अनी त्याना काही रंगत लिसनं अहरोन अनी त्याना पोर्या यासना उजवा कानना शेंडाले अनी त्यासना उजवा हातना अनी उजवा पायना आंगठाले लावानं अनी बाकीना वेदीना आजुबाजूले शितडानं;
21 वेदीवरना रंगत अनी अभिषेकनं तेल यामासला काही लिसनं अहरोनवर अनी त्याना कपडासवर, तशेच त्यानासंगे त्याना पोर्यासवर अनी त्यासना कपडासवर शितडानं; यावरतीन तो अनी त्याना कपडा अनी त्यानासंगे त्याना पोर्या अनी त्यासना कपडा पवित्र वतीन.
22 तो मेंढा संस्कारना शे म्हणीसनं त्यानी चरबी, त्यानी चरबीदार शेपुट, त्यासनी आतडयासवरनी चरबी अनी काळीजनावरना पडदा, दोनी गुर्दा अनी त्यानावरनी चरबी अनी उजवा फरा हाई ले;
23 त्याप्रमानं परमेश्वरनामोरे ठेयेल बेखमीर भाकरनी टोपलीमाईन एक भाकर तेलमां मळेल पिठनी एक चानकी अनी एक भाकर लेय;
24 अनी या बठा अहरोन अनी त्याना पोर्या यासना हातवर ठेव अनी ते वोवाळनीनं अर्पन म्हनीसनं परमेश्वरनामोरे वोवाळ.
25 मंग त्या वस्तु त्याना हातमाईन लिसनं वेदीवरना होमबलीवर होम करानं; हाई परमेश्वरनामोरे मधुर सुगंध शे; हाई परमेश्वरले अर्पन करेल हवन शे;
26 मंग अहरोनना संस्कारकरता मारेल मेंढानं छाती लिसनं वोवाळनी म्हनीसनं परमेश्वरनामोरे वोवाळ; तो तुना हिसा शे;
27 अनी अहरोन अनी त्याना पोर्या यासना संस्कारकरता मारेल मेंढानं वोवाळेल छाती अनी समर्पन करेल फरा हया तु पवित्र करानं;
28 इस्त्राएल लोकेसकडतीन भेटनारा अहरोननं अनी त्याना पोर्यासना हाऊ कायमनं हक्क शे; हाई त्यासनाकडतीन इस्राएलसना शांती अर्पणनं यज्ञमाईन परमेश्वरकरता समर्पित करेल दान शे;
29 अहरोननं पवित्र कपडा त्यानानंतर त्याना पोर्यासकरता राहावाले पाहिजे; हया कपडासनासंगे त्यासना अभिषेक व्हईन त्यासनावर संस्कार व्हवाले पाहिजे.
30 त्या पोर्यासमाईन जो त्याना जागवर याजक व्हयी त्यानी पवित्रस्थानमा सेवा कराकरता दर्शनमंडपमां जातस तवय हया कपडा सात रोज घालाले पाहिजे;
31 संस्कारकरता मारेल मेंढा लिसनं त्याना मास एखादं पवित्र जागवर शिजाडं;
32 मंग अहरोन अनी त्याना पोर्या यासनी त्या मेंढासना मास अनी टोपलीमाधली भाकर दर्शनमंडपना दारनाजोडे खावानं;
33 त्यासना संस्कार अनी पवित्रकरन याकरता ज्या पदार्थासघाई प्रायश्चितविधी करामां येई त्या पदार्थ त्यासनी खावानं; पन दुसरा कुळमासला कोनीबी हाई खावानं नही; कारन त्या पदार्थ पवित्र शेतस;
34 समर्पन करेल काही मास किवा भाकर सकासपावोत राहिनी तर उरेल आगमां जाळी टाकानं; ते खावानं नही कारन ते पवित्र शे.
35 मी तुले आज्ञा देयेल बठया गोष्टप्रमानं अहरोन अनी त्याना पोर्या यासनं कर; अनी सात रोजपावोत त्यासना संस्कार कर;
36 प्रायश्चितकरता पापबली म्हणीसनं एक वासरू रोज बली दे अनी वेदीकरता प्रायश्चित करीसनं ती शुध्द करानं अनी पवित्र कराकरता तिले अभिषेक कराले पाहिजे.
37 सात रोज वेदीकरता प्रायश्चित करीसनं ती पवित्र कर म्हणजे वेदी परमपवित्र व्हयी; ज्याना वेदीले हात लागी ते पवित्र व्हई;
रोज करानं होमार्पणं
(गणना 28:1-8)
38 वेदीवर कायमनं होम करानं ते आशे; रोज एक एक वरीसनं दोन कोकरासना होम करानं.
39 एक कोकराना होम सकासले अनी दुसरा कोकराना होम संध्याकायले करानं;
40 कुटिसनं काढेल दोन लिटर तेलमां, एक दशमांस माप पिठ मिळीसनं ते एक कोकरानासंगे अर्पन करानं; अनी दोन लिटर द्राक्षरसनं पेयार्पण करानं;
41 दुसरा कोकरा सांयकायले अर्पाणं अनी त्यानासंगे सकायपरमानं अन्न पेयार्पण अनी पेय अर्पण करानं; हाई परमेश्वरकरता मधुर सुगंध हवन शे.
42 तुमन्या पिढयानपिढया दर्शनमंडपना दारनाजोडे परमेश्वरनामोरे आशेच होमबली कायम अर्पानं; हाई जागवर तुनासंगे बोलाकरता मी तुमले भेटसू;
43 हाई जागवर मी इस्त्राएल लोकेसले भेट दिसू अनी मना तेजघाई ते मंडप पवित्र व्हई.
44 दर्शनमंडप अनी वेदी मी पवित्र करसुं; अहरोन अनी त्याना पोर्या यासनी याजक हाई नातातीन मनी सेवा करानी म्हनीसनं त्यासलेबी मी पवित्र करसुं.
45 अनी मी इस्त्राएल लोकेसमां मना निवास करसुं अनी त्यासना देव व्हसू.
46 त्यासनामां राहावाले जावाकरता ज्यानी त्यासले मिसर देशमाईन बाहेर काढ तो मी परमेश्वर त्यासना देव शे असं त्यासले कळी; मी त्यासना देव यहोवा शे.