32
सोनानं वासरू
(अनुवाद 9:6-29)
मोशेले परवतवरतीन येवाले येळ लागनं हाई इस्राएल आशे लोकेसनी दख तवय त्या अहरोनना आजुबाजूले जमीसनं त्याले बोलनात, “उठ, आमनामोरे चालतीन आशे देव आमनाकरता बनाड; कारन आमले मिसर देशमाईन बाहेल लयी आननारा माणुस मोशे यानं काय व्हयनं हाई आमले माहित नही?” तवय अहरोननी त्यासले सांग तुमन्या बाया, पोर्‍या अनी पोरी यासना कानमां सोनान्या कुंडल्या शेतस त्या काढीसनं मनाकडे लई या; मंग बठा लोकेसनी आपला कानमासला कुंडल्या काढीसनं अहरोनकडे आणं. तवय अहरोननी त्यासना हातमाईन लिधं, अनी एक साचामा टाकात, अनी एक वासरूनी मूर्ती बनाडी; तवय त्या बोलाले लागनात, हे इस्त्राएला, ज्या देवनी तुले मिसर देशमाईन सोडाईसनं आनेल शे त्याच हया तुना देव. हाई दखीसनं अहरोननी त्यासनामोरे एक वेदी बांधी अनी जाहीर करं की सकाय परमेश्वरकरता उत्सव करानं शे; मनीसनं दुसरा रोज लोके पहाटले उठीसनं होमबलीनं अर्पन करं अनी शांती अर्पन लयात; मंग त्या खावाले पेवाले बसनात अनी ऊठीसनं मोजमस्ती कराले लागनात. तवय परमेश्वर मोशेले बोलना; चाल, खाल उतर, कारन ज्या तुना माणसे तु मिसर देशमाईन आणेल शे त्या बिघडी जायेल शेतस; ज्या मार्गतीन त्या जावाले पाहिजे व्हतात मनीसनं मी त्यासले आज्ञा देयेल व्हती तो मार्ग सोडीसनं त्या बहकी जायेल शेतस; त्यासनी ओतीव वासरु बनाडीसनं त्यानी पुजा आरचा करी अनी त्याले बली अर्पन करं अनी हे, इस्त्राएला, ज्यानी तुले मिसर देशामाईन सोडायेल शे त्याच हया तुना देव आशे त्या बोलाले लागना शेतस. मंग परमेश्वनी मोशेले सांगं, मी या लोकेसले दखी लियेल शे या फक्त ताठ मानना लोके शेतस; 10 तर माले आडवं येवानं नही; मी मना कोप त्यासनावर भडकावसू त्यासले भस्म करसू अनी तुनाच एक राष्ट्र बनाडसू. 11 तवय मोशे आपला देव यहोवा यानी किवा कराले लागना, हे परमेश्वरा, तु आपला माणसासले महासामर्थ्यातीन अनी भुजबळतीन मिसर देशमाईन सोडाई आनेल शे त्यासनावर तुना कोप काबर भडकाले पाहिजे? 12 त्यासले पहाडमां मारी टाकानं अनी पृथ्वीवरतीन त्यासले नष्ट करानं मनीसनं त्यासले मिसर देशमाईन परमेश्वरनी बाहेर काढं आशे मिसरी लोकेसनी बोलानं का? आपला कोपपाईन दुर व्हय, आपला लोकेसवर अरिष्ट आणानं तू ठरायेल शे त्यापाईन दुर व्हय. 13 तुन दास अब्राहाम, इसहाक अनी इस्त्राएल यासनी आठवन करं; तु त्यासले सोतानी शपथ लिसनं सांग व्हतं की तुमनी संतती आकाशमाधली तारासनीसारखी बहुगुनित करसू, अनी हया देशनीबारामां मी तुमले सांगं तो बठा तुमनी संततीले दिसू अनी ती त्यासनी कायमनी वतनदार व्हई. 14 तवय मी मना लोकेसनी अनिष्ट करसू आशे जे परमेश्वरनी सांगं व्हतं त्यापाईन तो दुर व्हयना. 15 मंग मोशे मांगे फिरसनं आपला हातमां आज्ञापटन्या त्या दोन पाटया लिसनं डोंगरवरतीन खाल वना; त्या पाटयासवर मोरेना अनी मांगेना आशे दोनी बाजुले लिखेल व्हतं; 16 हया पाटया देवनी बनाडेल व्हत्या अनी त्यानावर खोदेल लेख देवनी लिखेल व्हतं. 17 यहोशवाने लोकेसना आवाज आयकं तवय तो मोशेले बोलना, छावनीमां रनशब्द ऐकू ई राहिनं शे. 18 तो बोलना, हाई शब्द जे‍ व्हई राहिनं शे, तो नही विजय व्हयेलसना, नही हारेलसना, मना कानवर पडी राहिना शे, तो तर गाणानं आवाज शे. 19 मोशे छावनीनाजोडे येवानंतर ते वासरू अनी नाचनारा माणसे त्याना नजरमां वनात, तवय त्याले राग वना अनी त्यानी आपली हातमाधली पाटया पर्वतना पायथाले फेकीसनं फोडी टाकं. 20 तशेच त्यासनी बनाडेल ते वासरू लिसनं त्यानी आगमां टाकं अनी त्याना कुटीसनं चुरा करी टाकं; ते त्यानी पानीमा टाकं अनी ते पानी त्यानी इस्त्राएल लोकेसले पेवाले दिधं. 21 तवय मोशे अहरोनले बोलना, तु या लोकेसले एवढं पापमां टाक आशे यासनी तुनं काय करं व्हत? 22 अहरोन बोलना, मना स्वामीना कोप मनावर येवाले नही पाहिजे; या माणसासनी प्रवृती पापकडे शे हाई तुलेबी माहीत शे. 23 त्यासनी माले सांगं की आमनामोरे चालतीन आशे देव आमनाकरता बनाड; कारन आमले मिसर देशमाईन बाहेर आननारा माणुस मोशे यानं काय व्हयनं ते आमले माहित नही. 24  मी त्यासले सांगं, ज्यानाजोडे सोनं व्हई त्यानी काढीसनं माले देवानं; त्याप्रमानं त्यासनी ते माले दिधं; ते मी आगमां टाकात तवय त्यामाईन वासरू बनना; 25 मोशेनी दखं हया माणसे बेलगाम व्हई जायेल शेतस; अहरोननी त्यासले बेलगाम होऊ दिधं त्यामुये त्या शत्रुसना मजाक पात्र व्हयनात; 26 तवय तो छावनीना परवेशना ठिकानले उभा राहीसनं बोलना, परमेश्वरनाकडतीन ज्या व्हतीन त्यासनी मनाकडे येवानं, तवय लेवी वंशमाधला बठा माणसे त्यानाजोडे जमा व्हयनात. 27 तो त्यासले बोलना, इस्त्राएलना देव यहोवा सांगस की तुम्हीन प्रत्येकसनी आपली कंबरले तलवार लटकाडानं अनी छावनीना हाई प्रवेश दारपाईन ते त्या प्रवेश दारपावोत सगळीकडे फिरीसनं आपला भाऊ, संगेना, शेजारना, या बठा माणसासले मारी टाकानं. 28 मोशेनी आज्ञाप्रमानं लेवी वंशमाधला लोकेसनी करं अनी त्या रोज तीन हजार लोकेसले मारी टाकं; 29 मंग मोशे बोलना, परमेश्वरकरता आपला समर्पन करीसनं प्रत्येक माणुसनी आपला पोर्‍या राहो का भाऊ राहो, त्यानावर चाली गयात म्हणजे परमेश्वर आज तुमले वरदान देई. 30 दुसरा रोजले मोशे लोकेसले बोलना, तुमीन हाई घोर पाप करेल शे, तरी मी आते परमेश्वरकडे जासं, माले कदाचित तुमना पापकरता प्रायश्चित करनं पडी. 31 मोशे परत परमेश्वरकडं जाईसनं बोलना, हाय! हाय! या लोकेसनी घोर पाप करेल शे, यासनी त्यासनाकरता सोनानं देव बनाडं; 32 तरी आते तु त्यासना पापसनी क्षमा करीशी ते; नही करशीते तर तु लिखेल पुस्तकमाईन माले काढी टाक. 33 परमेश्वर मोशेले बोलना, ज्यासनी मनाविरोधमां पाप करेल शे त्यालेच मी मना पुस्तकमाईन काढी टाकसू. 34 आते तु जाय, ज्या ठिकाननाबारामां मी तुले सांगेल शे तिकडे त्यासले लई जाय; दख, मना दूत तुनामोरे चालतीन, तरी ज्या रोज मी झडती लिसू त्या रोज त्यासना पापना बारामा समाचार लिसू. 35 अहरोननी बनाडेल वासरू लोकेसनीच बनाडेल व्हतं, त्याकरता परमेश्वरनी त्यासनावर पिढा धाडी.
32:2 प्रेषित 7:40 32:4 १ राजे 12:28; प्रेषित 7:41 32:6 १ करिंथ 10:7 32:13 उत्पती 22:16-17; 17:8 32:24 प्रेषित 7:40 32:32 स्तोत्रसंहिता 69:28; प्रकटीकरण 3:5