33
सीनाय पर्वतपाईन पुढे जावानी आज्ञा
मंग परमेश्वरनी मोशेले सांगं, तु अनी ज्या माणसे तु मिसर देशमाईन आनेल शेतस त्या, आठेन निघीसनं मार्गस्थ व्हावानं; अनी जो देश तुनी संततीले दिसू आशे अब्राहाम, इसहाक अनी याकोब यासले मी शपथ दिसनं सांगेल व्हतं. मी तुनामोरे एक दूत धाडसू अनी कनानी, अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी अनी यबूसी यासले मी हाकली दिसु. दुधमधनं प्रवाह वाही राहीना शेतस त्या देशमां तू जाय; तरीबी तुम्हीन ताठ मानना लोके शेतस त्यामुये मी तुनासंगे येवावू नही; वनुते रस्तामां मी तुमले भस्म करसू.
लोकेसनी हाई वाईट बातमी ऐकी तवय त्या विलाप कराले लागनात; अनी कोनीबी आपला दागदागिना घालात नही. परमेश्वर मोशेले बोलना, तु इस्त्राएल लोकेसले सांग की तुमीन ताठ मानना लोके शेतस; मी थोडा येळबी तुमनासंगे राहीनू तर मी तुमले भस्म करसू; त्याकरता तुमीन आपला दागदागिना आपला आंगवरतीन उतारी ठेवानं; म्हणजे तुमनं काय करानं ते मी दखसू.
यामुये होरेब पर्वतपाईन इस्त्राएल लोक बिन दागदागिनना राहीनात.
परमेश्वरना उपस्थितीना मंडप
मोशे छावनीबाहेर बराच दुर जाईसनं तंबू लिसनं उभा करी; अनी त्याले तो दर्शनमंडप सांगे, कोणले परमेश्वरले काही ईचारानं व्हई म्हणजे तो छावनीबाहेर त्या दर्शनमंडपकडे जायेत. आशे व्हस जास की जवय मोशे त्या मंडपजोडे जाये तवय बठा लोके उठीसनं‍ ज्यानात्याना तंबूमां दारपान उभा राहेत अनी तो मंडपमा जातस तोपावोत त्यानाकडे नजर लावेत.
मोशे मंडपमां प्रवेश करे तवय मेघस्तंभ उतरीसनं मंडपना दारपान उभा राहे, अनी परमेश्वर मोशेनीसंगे भाषण करे. 10 त्या मंडपना दारपान मेघस्तंभ ऊभा शे आशे बठा लोके दखेत तवय त्या बठा उठीसनं ज्यानात्याना तंबुना दारपान दंडवत घालेत. 11  एखादा मित्रनंसंगे भाषन करतसं तशे परमेश्वर मोशेनीसंगे समोरासमोर भाषन करे. मोशे छावनीकडे परत येस, तरी त्याना सेवक नुनाना पोर्‍या यहोशवा हाऊ तरुण माणुस मंडप सोडीसनं बाहेर नही जाये.
परमेश्वरनासंगे रावानं वचन
12 मोशे परमेश्वरले बोलना, दख, तु माले सांगस की या माणसासले लई जाय; पण तु मनासंगे कोनले धाडसी हाई माले तु आजुन कळाडं नही; तरी तु सांगेल शे की मी तुले तुनं नावतीन वळखस अनी तुनावर मनी कृपादृष्टी शे.
13 याकरता तुनी मनावर कृपादृष्टी शे तर तुना मार्ग माले दखाड म्हणजे तुनी माले वयख व्हई अनी त्यामुये तुनी कृपादृष्टी मनावर व्हई; दख, हाई राष्ट्र तुनी प्रजा शे. 14 परमेश्वर बोलना मी प्रत्यक्ष ईसु अनी तुले विश्राती दिसू. 15 तो त्याले बोलना, तू प्रत्यक्ष नही वना तर तु आमले आठेतीन मोरे लि जावानं नही. 16 तुनी कृपादृष्टी मनावर अनी तुनी प्रजावर व्हयेल शे हाई समजानं कसावरतीन? तु आमनासंगे येवामुये मी अनी तुनी प्रजा पृथ्वीवरना दुसरा बठा लोकेसपेक्षा येगळा व्हयेल शेतस यावरतीन ते समजानं का? 17 परमेश्वर मोशेले बोलना, तुना सांगाप्रमानं हाई मी करसू; कारन मनी कृपादृष्टी तुनावर व्हयेल शे अनी मी तुले तुनं नावतीन वळखस. 18 तो बोलना, कृपा करीसनं माले तुनं तेज दखाड. 19 तो बोलना, मना सर्वा चांगुलपन तुनामोरे चालाडसू; तुनामोरे तुनं नावनी घोषना करसू; ज्यानावर कृपा करानं वाटी त्यानावर मी कृपा करसू अनी ज्यानावर दया कराले वाटी त्यानावर दया करसू. 20 आजुन तो बोलना तु मना तोंड दखु शकस नही, कारन मनं तोंड दखीसनं कोनीबी माणुस जीवत राहावावू नही. 21 परमेश्वर बोलना, मनाजोडे एक जागा शे; आठे हाई खडकवार उभा ऱ्हाय;
22 आशे घडी की, मनं तेज जोडेतीन जाई तवय मी तुले खडकना भेंगमां ठेवसू; मी निंघी जास तोपावोत मना हातघाई तुले झाकसू; 23 मंग मी मना हात काढी लिसू अनी तुले पाठमांगेन दखायसू; पण मनं तोंड दखावाऊ नही.
33:1 उत्पती 12:6; 26:3; 28:13 33:3 प्रेषित 7:51 33:10 गणना 12:8; अनुवाद 34:10 33:11 गणना 12:8; अनुवाद 34:10 33:19 रोम 9:15