35
आरामकरता नियम
1 मोशेनी इस्त्राएल लोकेसनी बठी मंडयीले एकजागे करीसनं त्यासले सांगं, ज्या गोष्टी करानीबारामां परमेश्वरनी आज्ञा करेल शे त्या हया शेतस;
2 सव रोज काम करानं, पण सातवा रोज तुमले पवित्र दिवस, परमेश्वरकरता परमविश्रामनं दिवस आराम शे; त्यारोज कोनी काम करी त्यासले मारी टाकानं.
3 आरामना रोज तुम्हीन आपला घरमां ईस्तव पेटाडानं नही.
पवित्र तंबूकरता अर्पन
(निर्गम 25:1-9)
4 मोशेनी इस्त्राएल लोकेसनी बठी मंडयीले सांगं परमेश्वरनी आज्ञा दिधी ती हाई शे:
5 तुम्हीन आपलाकडला अर्पन परमेश्वरकरता आणानं; ज्यासनी मनपाईन ईच्छा व्हयी त्यानी परमेश्वरकरता अर्पण लई येवानं; सोनं, रुपे, पितय
6 निया, जांभया अनी किरमिजी रंगनं सूत अनी तलम सणसनं कापड, बकर्यासनं केस;
7 मेंढयासनं लाल रंग देयेल कातडी, तरस्यानं कातडं, बाभुळनं लाकूड,
8 दिवानं तेल, अभिषेकनं तेलकरता अनी सुगंधी धुपकरता मसाला,
9 एफोद अनी उरपट यामां खोचाकरता गोमेदमनी अनी दुसर रत्न लई येवानं;
परमेश्वरना उपस्थितीना तंबूकरता वस्तू
10 अनी तुमनामाईन जे कोनी बुध्दीमान ह्रदयनं व्हई त्या बठासनी ईसनं ज्या ज्या वस्तु करानी आज्ञा परमेश्वरनी देयेल शे त्या बठया तयार करान्या, त्या हया शेतस:
11 निवासमंडप, त्यासना तंबू अनी त्यानावरना आच्छादन, त्याना आकडा, फया, अडसर, खांब अनी खाचा;
12 कोश अनी त्याना दांडा, दयासन अनी आंतरपट;
13 मेज अनी त्यासना दांडा, त्यानावरना बठा भांडा अनी समर्पित करेल भाकर;
14 उजेडकरता दिवट अनी त्यानं उपकरनं दिवा अनी दिवासनं तेल;
15 धूपवेदी, तिना दांडा, अभिषेकनं तेल, सुगंधी धूप, निवासमंडपना दारकरता दारपट;
16 होमवेदी अनी तिन्या पितयनी जायी, दांडा अनी तिना सामान, पितयनं भांडा अनी त्यानी बैठक,
17 आंगनन पडदा, त्याना खांब अनी खाचा अनी आंगननं प्रवेश दारकरता पडदा;
18 निवासमंडप अनी आंगन याकरता मेखा अनी तनावे;
19 पवित्रस्थानमां सेवा कराकरता चांगला ईनेल कपडा अनी याजकनं काम कराकरता अहरोन याजकनं पवित्र कपडा अनी त्याना पोर्यासना कपडा.
लोक अर्पन आनतस
20 मंग इस्त्राएल लोकेसनी बठी मंडयी मोशेनी मोरेतीन निंघी गयी.
21 ज्यासना मनमां स्फुर्ती व्हयनी अनी ज्यासना मनपाईन इच्छा व्हयनी त्यानी दर्शनमंडपनं काम त्यामासली सर्वी सेवा अनी पवित्र कपडा यानाकरता परमेश्वरले अर्पण आनं.
22 ज्यासले ज्यासले मनपाईन इच्छा व्हयनी त्या बठा बाया माणसे वनात, त्यासना नथा, कुंडले, मुद्रीका, कंकने आशे सोनानं बठा प्रकारनं दागिना लयात; परमेश्वरले सोनं अर्पन करनारा प्रत्येक माणसे वनात.
23 निया, जांभया अनी किरमिजी रंगनं सुत अनी तलम सणसनं कापड, बकर्यासनं केस, तांबडा रंग देयेल मेंढयासनी कातडी अनी तहशानी कातडी ज्या माणसासपान व्हती ती त्या लई वनात.
24 चांदी अनी पितय यासना अर्पन करनारा प्रत्येकनी परमेश्वरकरता अर्पण आनं अनी सेवानं कामकरता उपयोगमां येनारा बाभुळना लाकूड ज्या प्रत्येक माणुसपान व्हतात ते तो लई वना.
25 ज्या बाया बुध्दीमान व्हत्या त्या बठयासनी निया, जांभया अनी किरमिजी रंगना सुत अनी तलम सणसना कापड आपला हातघाई ईनेल व्हतात त्या आनात.
26 अनी ज्या बायासना मनमां स्फुर्ती व्हयीसनं त्यासले बुध्दी वनी अनी त्या बठयासनी बकर्यासना केस ईनी टाकं.
27 सरदार मंडयीनी एफोद अनी उरपट यामा खोचाकरता गोमेदमणी अनी रत्ने,
28 अनी दिवाकरता, अभिषेककरता अनी सुगंधी धुपकरता मसाला अनी तेल आनं.
29 जे करानं बारामां परमेश्वरनी मोशेनीकडतीन जी आज्ञा देयेल व्हती त्या बठासाठी इस्त्राएल लोकेसनी खुशीतीन परमेश्वरकरता अर्पण लय; ज्या ज्या बाया अनी माणसासले मनपाईन स्फुर्ती व्हयनी त्यासनी त्यासनी हाई अर्पन आनं.
परमेश्वरना उपस्थितीकरता कारागीर
30 मंग मोशे इस्त्राएल लोकेसले बोलना, दख, यहुदा वंशमासला उरीना पोर्या अनी हूरना नातू बसालेल याले परमेश्वरनी नाव लिसनं बलायेल शे.
31 अनी त्यानी त्याले देवना आत्मानी परीपुर्ण करीसनं आक्क्ल, बुध्दी ज्ञान अनी बठा प्रकारनं कला हाई देयेल शेतस.
32 तो कलाकुसरना काम करी; सोना, रुपे अनी पितय यासना काम करी.
33 जडवाकरता रत्नासले पैलू पाडी; लाकडासना नक्षीदारना काम करी, अनी आशे बठा प्रकारनं कारागीरनं काम करी.
34 परमेश्वरनी त्यानामां अनी दान वंशमासला अहीसामकना पोर्या अहलियाब यानामां शिक्षन देवानं सामर्थ्य ठेयेल शे.
35 कोरीव काम करनारा चतुर कारागीर निया, जांभया अनी किरमिजी रंगन सुत अनी तलम सणसना कापडवर नक्षी काढनारा, ईनकाम करनारा, बठा प्रकारनं सोनारंना काम करनारा अनी चतुरतीन कामनी योजना करनारा आशेना बठा कारागीरासना काम करनारासकरता या दोनीसना हृदय आकलन पुरा करेल शे.