36
परमेश्वरन्या बठया आज्ञा प्रमानं पवित्र स्थाननं सेवा कराकरता बठा प्रकारनं काम कसं करानं ते समजाले पाहिजे म्हणीसनी यानामां परमेश्वरनी बुध्दी अनी समज घालेल शे; त्यानी हाई काम करानं.
लोक अनेक भेटवस्तू आणतस
मंग बसालेल अनी अहलियाब यासले अनी ज्या ज्ञानी माणसंना हृदयमा परमेश्वरनी बुध्दी घालेल व्हती त्यासले मोशेनी बलावं. इस्त्राएल लोकेसनी पवित्रस्थाननी सेवा कराकरता अनी ते बांधाकरता जे अर्पण आणेल व्हतं ते‍ त्यानी माशेनी मोरेतीन लिधं; लोकेसनी रोज सकासले आपला स्वखुशीतीन अर्पण त्यानाजोडे आणाले लागनात. ज्या बुध्दिमान माणसे पवित्र स्थानना काम करत व्हतात त्या बठा आपआपला काम सोडीसनी मोशेकडे वनात. त्या मोशेले सांगाले लागनात; परमेश्वरनी जे काम कराले आज्ञा देयेल शे ती कराले जी सामग्री लागस त्यानापेक्षा जास्त लोके लयी राहीना शेतस. तवय मोशेनी बठी छावणीभर आशे हुकूम फरमावं की एकादा माणुसनी नाहिते बाईनी पवित्रस्थानकरता आजुन कष्टना काम करीसनी लवानं नही हाई प्रमानं आजुन अर्पण आणानं प्रतिबंध व्हयनं. त्यासना हातमा जी सामग्री व्हती ती त्यासले काम कराले पूरीसनी उरी जाई आशी व्हती.
निवासमंडपनी रचना
(निर्गम 26:1-37)
त्यासमासला ज्या हुशार माणसे काम करत व्हतात त्या बठासनी पडदासना निवासमंडप करं; हया पडदा त्यासनी कातेल तलम सणसना कापडनं अनी निया, जांभया अनी किरमिजी रंगनं सुतघाई तयार करेल अनी त्यामा हुशार कारागीरकडतीन करुब* काढाई लिधं. एक एक पडदसनी लांबी अठ्ठावीस हात, अनी रूंदी चार हात व्हती; त्या बठा पडदा एकच मापना व्हतात. 10 त्यासनी त्यामासला पाच पडदा येरायेरमा जोडं, दुसरा पाच पडदा पण एकमेकसले जोडात. 11 त्यानी जठे एक पडदा जोडं व्हतं तठे पडदानं काठले निया सुतनी फंदा लायी; अनी दुसरा पडदानी काठले तशीच फंदा लायी. 12 एक पडदाले त्यानी पन्नास फंदा करं दुसरा पडदानं काठलेबी पन्नास फंदा करं हया फंदा येरायेरना मोरे व्हतात. 13 तशेच सोनानं पन्नास आकडं बनावं; त्या आकडासघाई त्यानी पडदासले आशे जोडं की बठा एकजागे व्हयीसनी एक निवासमंडप व्हयनं. 14 निवासमंडपावर तंबूकरता बोकडयानं केसनं आकरा पडदा त्यासनी बनाडं. 15 एक एक पडदानी लांबी तीस हात अनी रुंदी चार हात व्हतात; हया आकरा पडदा एक मापना व्हतात. 16 त्यानी पाच पडदा येगळं जोडं अनी सव पडदा येगळं जोडं. 17 जोडीसनी करेल एक शेवटला पडदानं काठले त्यानी पन्नास फंदा करात, तशेच दुसरा कनानं शेवटला पडदानं काठले त्यानी पन्नास फंदा करात. 18 हाई तंबू जोडीसनी एक कराकरता त्यासनी पितळनं पन्नास आकडा बनाडं 19 या तंबुसकरता तांबडा रंग देयेल मेंढानं कातडासनं एक आच्छादन अनी त्यानावर शुस मासाना कातडाना एक आच्छादन करं. 20 मंग निवासमंडपले उभा लावाकरता त्यानी बाभळासना लाकडसना फळया कर्‍यात. 21 प्रत्येक फळी दहा हात लांब अनी दिड हात रुंदी व्हती. 22 प्रत्येक फळी दुसरी फळीले जोडाकरता त्यानी तिले दोन दोन कुसा करात; 23 निवासमंडपकरता ज्या फळया त्यासनी कर्‍यात त्यासमाईन वीस दक्षिणनं बाजुले लावं; 24 त्या वीस फळयासनी खाल लावाकरता चांदीन्या चाळीस खाचा करात. एक एक फळीनं खाल तिना दोन कुसाकरता त्यानी दोन दोन खाचा कर्‍यात. 25 त्याप्रमानं निवासमंडप‍न्या दुसरा म्हणजे उत्तर बाजुकरता त्यासनी वीस फळया कर्‍यात. 26 त्यासनी त्याकरता चांदीन्या चाळीस खुरच्या बनाडयात म्हणजे एक एक फळीनं खाल दोन खाचा. 27 निवासमंडपन्या मांगल्या म्हणजे पश्चिम बाजुकरता त्यासनी सव फळया बनाडात. 28 अनी मांगला बाजुनं निवासमंडपनं कोपराकरता त्यासनी दोन फळया बनाडात. 29 या फळया खालपाईन दोन दोन राहीसनी त्या दोन्ही वरन्या भागले एक एक कडीनं त्यासनी जुळाडं; दोनी कोपरासकरता त्यासनी आश्या दोन फळया बनाडात. 30 हाई प्रकारं आठ फळया अनी चांदीन्या सोया खाचा व्हयन्यात, म्हणजे एक एक फळीनं खाल दोन दोन खाचा व्हत्यात. 31 त्यासनी बाभुळना लाकडासना अडसर बनाडं, निवासमंडपना एक बाजुले फळयासकरता पाच. 32 दुसरा बाजुकरता पाच अनी निवासमंडपनं पश्चिमले म्हणजे मांगली बाजुकरता पाच; 33 अनी त्यासनी फळयासनी मधला भागले लावाले मधला अडसर एक टोकपाईन ते दुसराटोकपावोत जाई आशे करं. 34 त्या फळया त्यासनी सोनाघाई मढावं अडसर लावान्या कडया सोनासना बनाडं अनी अडसरबी सोनाघाई मढावं. 35 मंग त्यासनी निळया, जांभळया अनी किरमिजी रंगन्या सुतसना अनी तलम सणसना कापडनं एक अंतरपट बनाडं अनी त्यामा चतुर कारागीरकडतीन करुब काढं 36 अनी त्याकरता त्यासनी बाभुळना लाकडसना चार खांब करात अनी त्या सोनाघाई मढावं; त्यान्या आकडया सोनासघाई कर्‍यात अनी त्यानाकरता चार चांदीन्या खाचा बनाडात. 37 त्यासनी तंबुना दारकरता निळया, जांभळया अनी किरमिजी रंगना सुतासना अनी कातेल तलम सणसना कापडनं नक्षीदार पडदा बनाडं. 38 अनी त्यासनी त्याना पाच खांब अनी आकडा बनाडं; त्यान्या शिरोभाग अनी त्यान्या साखळी सोनाघाई मंढावं; अनी त्यासन्या पाच खाचा पितळन्या बनाडयात.
* 36:8 दोन पखंवाला प्राणी, ( देवदूत) 36:9 बारा मिटर लांबी/ अनी दोन मिटर रूंदी