19
सदोम अनं गमोरा नगरना नाश
मंग संध्याकाळना येळले त्या दोन दूत सदोमले वनात, तवय लोट हाऊ सदोमना वेशीमा बठेल व्हता; त्यासले दखीसन लोट त्यासनाजोडे गया, अनी भुमीपावत तोंड करीसन त्यासले नमन करं; तो त्यासले बोलना, दखा, मना धनीसवन, कृपा करीसन आपला दासना घर या; अनी आपला हातपाय धुईसन आठेच रातले मुक्काम करा, मंग सकासले उठीसन आपला वाटले लागी जा, पण त्या बोलनात, नही आमी रातभर रस्तामाच मुक्काम करसुत.
पण त्यानी त्यासले खुपच रावन्या करामुये त्या त्याना घर गयात; त्यानी त्यासनाकरता भोजन बनाडं; त्यानी बेखमीर भाकरी बनाड्यात मंग त्या जेवनात.
त्या झोपाना पहिलेच तठे त्या नगरना माणसंसनी, म्हणजे सदोमना माणसे, तरूणपाईन ते म्हातारापावत, सगयाच माणसंसनी चारीबाजुतीन ईसन त्या घरले घेरी लिधं. त्या लोटले ओरडीसन बोलाले लागनात, आज रातले ज्या माणसे तुनाकडे येयल शेतस, त्या कोठे शेतस? त्यासले बाहेर आण, म्हणजे आम्हीन त्यासनासंगे समागम करसुत. तवय लोट दारना बाहेर त्यासनाजोडे गया अनं त्यानी आपला मांगेतीन दार लाई लिधं. अनी बोलाले लागना, भाऊसवन, मी तुमले ईनंती करसं आशे दुष्कर्म करू नका. हाई दखा, मन्या दोन पोरी शेतस, त्या अजुन बी कुवार्‍या शेतस, मी तिसले तुमनाजोडे आणु का? तुमले वाटी तश तिसनासंगे वर्तन करा, पण ह्या माणसंसले काही करू नका, कारण त्या आसरासाकरता मना घर येल शेतस.
त्या बोलनात, बाजुले व्हय, हाऊ आठे थोडा दिन रावाकरता वना अनी आते आमले शहानपण शिकाडी राहीना शे! आते त्यासनापेक्षा तुनीच चांगली खबर लेतस, अश म्हणीसन त्या लोटले जोरमा ढकलु लागनात अनं दार तोडाले जोडे वनात. 10 पण त्या माणसंसनी बाहेर हात काढीसन लोटले घरमा आपलाजोडे ओढीसन दार लाई लिधं. 11 अनी ज्या धाकला मोठा माणसे घरना दारजोडे जमेल व्हतात त्यासले त्यासनी आंधळ करी टाकं; मंग त्या घर दखी दखी थकनात.
लोटना बचाव
12 तवय त्या माणसे लोटले बोलनात, तुना आठे कोण कोण शेतस? तुना पोऱ्या-पोरी, जावई, अनी जो कोणी बी हाई नगरमा तुना व्हई त्या सर्वासले लिसन तू हाई ठिकाणतीन निंघी जाय. 13 कारण आम्हीन हाई स्थळना नाश करनार शेतस, ह्या लोकसनाविषयी परमेश्वरनापुढे खुपच ओरड व्हयेल शे, अनी हाई नगरना नाश कराले परमेश्वरनी आमले धाडेल शे. 14 तवय लोट बाहेर जाईसन आपला जावईले ज्यानासंगे त्यानी पोरना लगीन व्हनार व्हतं, त्याले सांगं, उठा हाई स्थळमाईन बाहेर निंघा, कारण परमेश्वर हाई नगरना नाश करनार शे; पण त्याना जावईले वाटनं तो आमनासंगे गंमत करी राहीना.
15 पहाट व्हताच दूतसनी लोटले आग्रह करीसन सांगं, ऊठ, तुनी बायको, अनं तुन्या दोनी पोरी ज्या आठे शेतस तिसले लिसन निंघ, नहीते हाई नगरना शिक्षामा तुना बी नाश व्हई. 16  पण लोट संकोच करू लागना, तवय परमेश्वरनी कृपा त्यानावर व्हती म्हणीसन त्या माणसंसनी त्याना अनी त्याना बायकोना अनी त्याना दोनी पोरीसना हात धरीसन त्यासले नगरना बाहेर आणीसनं सोडं. 17 मंग आशे व्हयनं त्यासले बाहेर आणावर दूत त्याले बोलना, आपला जीव लिसन पळ; मांगे दखानं नही अनं खोरामा कोठेच थांबानं नही; डोंगरकडे पळी जाय, नहीते तुना नाश व्हई. 18 पण लोट त्यासले बोलना, नही प्रभु नही! 19 दख, तुना ह्या दासवर तुनी कृपादृष्टी व्हयेल शे; मना जीव वाचाडं हाई तुनी मनावर अपार दया प्रकट व्हयेल शे; पण माले डोंगरकडे पळी जाता येवाऊ नही; काय सांगता येस हाई संकट मनावर ईसन मी मरी जासु. 20 तर दख, पळी जावाले हाई नगर जोडे राहीसन धाकलंबी शे; दखा, ते कितलं धाकलं शे; माले तिकडे पळी जावु दे, म्हणजे मना जीव वाची.
21 तवय तो त्याले बोलना, दख, तुनी हाई गोष्टले बी मान्य करस; तू सांगस त्या नगरना मी नाश कराऊ नही. 22 पटकन, तिकडे पळी जाय; कारण तू तठे जास नही तोपावोत माले काहीच करता येवाऊ नही. यावरीन त्या नगरना नाव सोअर (धाकलं) आशे पडनं.
लोटले वाचाडानं
23 लोट सोअरमा जाईसन पोचना तवय पृथ्वीवर याळ उगी वना. 24 तवय परमेश्वरनी सदोम अनं गमोरा नगरवर गंधक *अनं अग्नी यासना वर्षाव आकाशमाईन करं. 25 अनी त्यानी त्या नगरसले, सर्व तळवटीसले, अनी त्या नगरमा सर्व राहानारा रहिवासीसले अनी तठे जमिनमा उगेल सर्व काही यासना नाश करं. 26 पण लोटनी बायको त्यानामांगे चाली राहिंती तिनी वळीसन मांगे दखं, तोच ती मिठना खांब बनी गई. 27 इकडे अब्राहाम मोठी पहाटलेच उठीसन जठे परमेश्वरनापुढे उभा राहिना व्हता‍ त्या ठिकाणमा गया. 28 त्यानी सदोम अनं गमोरा अनी सर्वा तळवटीना प्रदेश यासनावर नजर टाकी दखं, त्या प्रदेशमाईन भट्टीना धुरनामायक धुर वर जाई राहिंता. 29 याप्रकारं देवनी त्या तळवटीना नगरंसना नाश करं, त्या येळले देवनी अब्राहामनी आठवण करी, अनी लोट राही राहिंता तठला नगरंसना नाश कराना येळले लोटले त्या नाशमाईन वाचाडं.
लोटना पोरी
30 नंतर लोट आपल्या दोनी पोरीसनासंगे सोअरमाईन निंघीसन डोंगरमा जाईसन राहिना; कारण त्याले सोअरमा रावाले भ्याव वाटनं, अनी तो आपला दोनी पोरीसले लिसन एक गुफामा राहावाले लागना. 31 एक दिन मोठी पोर धाकलीले बोलनी, आपला बाप धैयडा व्हयेल शे, अनी जगना रितीरिवाजप्रमाणे आपलाजोडे येतीन, आशे कोणीच माणुस पृथ्वीवर नही. 32 तर चल, आपण आपला बापले द्राक्षरस पाजूत अनी त्यानाजोडे निजुत; आशे प्रकारतीन आपण आपला बापना वंश चालाडूत. 33 त्यासनी ती रातले आपला बापले द्राक्षरस पाजं अनी मोठी पोर त्यानाजोडे जाईसन निजनी; पण ती कवय निजनी अनी कवय उठनी हाई त्याले समजनं नही.
34 मंग दुसरा रोज मोठी पोर धाकलीले बोलनी, दख, कालदिन रातले मी बापनाजोडे निजनू; तर आज रातले बी आपण त्याले द्राक्षरस पाजुत अनी तू त्यानाजोडे जाईसन निज. हाई प्रकारतीन आपण आपला बापना वंश चालाडूत. 35 त्या रातले बी त्यासनी आपला बापले द्राक्षरस पाजं अनी धाकली पोर जाईसन त्यानाजोडे निजनी; पण ती कवय निजनी अनी कवय उठनी हाई त्याले समजनं नही. 36 याप्रकारमा लोटन्या दोनी पोरी बापपाईन गर्भवती व्हयन्यात. 37 मोठी पोरले पोऱ्या व्हयना, त्यानं नाव तिनी मवाब आशे ठेवं; आजपावोत ज्या मवाबी वंशज शेतस‍ त्यासना हाऊ मूळ बाप शे. 38 धाकली पोरले बी पोऱ्या व्हयना, तिनी त्यानं नाव बेनअम्मी आशे ठेवं; आजपावोत ज्या अम्मोनी वंशना शेतस त्यासना हाऊ मूळबाप शे.
19:11 २ राजे 6:18 19:16 २ पेत्र 2:7 19:23 मत्तय 10:15; लूक 10:12; २ पेत्र 2:6 * 19:24 गंधक ज्वलनशील 19:26 लूक 17:32 19:37 मवाब आपला बापतीन 19:38 बेनअम्मी मनं नातेवाईकना पोर्‍या