20
अब्राहाम अनी अबीमलेख
1 अब्राहाम तठेन निंघीसन कनानं दक्षिणले प्रवास करीसन कादेश अनं शूर यासना मजारमा मुक्काम करं अनी काही दिन गरार आठे राहावाले लागना.
2 आपली बायको सारा हिनाबद्दल अब्राहामनी आशे सांगं की, हाई मनी बहीण शे, तवय गरारना राजा अबीमलेख यानी माणसे धाडीसन साराले आपलाजोडे ठेई लिधं.
3 पण त्या रातले देव सपनमां ईसन अबीमलेखले बोलना, तू हाई जी बाई आणेल शे तिनामुये तुना नाश व्हई, कारण ती लगीन व्हयेल बाई शे.
4 अबीमलेख तिनाजोडे काही जायेल नव्हता, म्हणीसन तो बोलना, हे प्रभू, तू नितीमान राष्ट्रना बी नाश करशी का?
5 ती मनी बहीण शे आशे तो सोता माले बोलना नही का? तसच तो मना भाऊ शे आशे ती बी माले बोलनी नही का? मी सात्विक मनतीन अनं स्वच्छ हाततीन हाई करेल शे.
6 देवनी त्याले स्वप्नमा सांगं, तू सात्विक मनतीन हाई करेल शे हाई माले बी ठाऊक शे, अनी मीच तुले मनाविरूध्द पाप व्हवापाईन वाचाडेल शे; म्हणीसन मी तुले तिले हात बी लावु दिधं नही.
7 आते त्या माणुसनी बाई त्याले वापस दे, कारण तो संदेष्टा शे; तो तुनाकरता प्रार्थना करी अनी तू वाची जाशी; पण जर तू त्यानी बाई वापस नही दिधी, तर समजी ले तू अनं तुना जितला बी लोके शेतस बठा पक्का मरतीन.
8 मंग अबीमलेख मोठी पहाटमाच उठीसनं आपला सर्व सेवकसले बलाईसन या सर्वा गोष्टी त्यासले सांग्यात; तवय त्या माणसे भयान घाबरनात.
9 तवय अबीमलेखनी अब्राहामले बलाईसन त्याले सांगं, तू आमनासंगे हाई काय करं? मी तुना आशे कोणतं अपराध करं की, तू मनावर अनी मना राज्यवर आशे महापातक आणात? करानं नही अश वर्तन तू मनासंगे करेल शे.
10 अबीमलेख अब्राहामले ईचारं, हाई गोष्ट कराकरता तुना मनमा काय व्हतं?
11 अब्राहामनी उत्तर दिधं, मी हाई यानाकरता आशे करं की, माले आशे वाटनं हाई ठिकाणले आठे कोनले बी परमेश्वरनं भय नही शे, म्हणीसन मनी बायकोमुये या लोके माले मारी टाकतीन.
12 तसच ती खरंच मनी बहीण शे, ती मना बापनी पोर शे; पण मनी मायनी ती पोर नही, म्हणीन ती मनी बायको व्हयेल शे.
13 अनी अश व्हयनं की, देवनी माले मना बापना घर सोडीसन निंघानी आज्ञा करी तवय मी तिले सांगं, तू मनावर इतली कृपा कर की, आपण जठे बी जाशुत तठे हाऊ मना भाऊ शे अश मनाबद्दल सांग.
14 तवय अबीमलेखनी मेंढरं, बैल, दास अनं दासी आनीसन अब्राहामले दिधं, अनी त्यानी बायको सारा हाई बी परत त्याले आणी दिधी.
15 "मंग अबीमलेख बोलना, "मना देश तुले मोकळा शे; तुले वाटी तठे राय.
16 तो साराले बोलना, दख, मी तुना भाऊले एक हजार चांदीना नाणा दि राहिनु शे; ज्या लोके तुनासंगे शे त्या सर्वासना नजरमा तु निर्दोष शे अनी त्या सर्वासले समजी की तुनी काहीच चुकी करेल नही शे.
17 मंग अब्राहामनी परमेश्वरकडे प्रार्थना करी, तवय परमेश्वरनी अबीमलेख, त्यानी बायको अनं त्याना दासी यासले बरं करं, अनी त्यासले पोऱ्या व्हवाले लागनात.
18 कारण अब्राहामनी बायको सारा हिनामुये परमेश्वरनी अबीमलेखना घराणामातील सर्व बायासनं गर्भाशय बंद करेल व्हतं.