21
इसहाकना जन्म
1 तवय परमेश्वरनी सांगेल प्रमाणे सारावर आशिर्वादीत करं अनी तिले देयल वचन पुरं करा.
2 सारा गर्भवती व्हयनी, देवनी सांगेल येळले अब्राहामले म्हतारंपणमा तिनापाईन पोऱ्या व्हयना.
3 अब्राहामले सारापाईन पोऱ्या व्हयना त्यानं नाव इसहाक ठेवं.
4 जवय अब्राहामना पोऱ्या आठ दिनना व्हयना तवय देवनी सांगेल आज्ञा प्रमाणे त्यानी सुंता व्हयनी.
5 जवय त्याना पोऱ्या इसहाक व्हयना तवय अब्राहाम शंभर वरीसना व्हता.
6 सारा सांगु लागनी, "देवनी माले आनंद अनं हसु देयल शे; जो कोणी हाई ऐकी तो मनासंगे आनंद करी."
7 आखो ती बोलनी, "कोणी अब्राहामले सांगु शकी की, सारा पोऱ्यासले दूध पाजी? तरी बी त्याना म्हतारपणमा मनापाईन त्याले पोऱ्या व्हयेल शे."
8 अनी तो बाळ मोठा व्हयना तवय त्यानं दूध तोडं; इसहाकनं दूध तोडं त्या दिनले अब्राहामनी मोठी मेजवानी दिधी.
हागार अनी इश्माइलले काढी टाकं
9 तवय मिसरी दासी हागारले अब्राहामपाईन व्हयेल पोऱ्याले इसहाक संगे खेळतांना सारानी दखं.
10 तवय ती अब्राहामले बोलनी, "हाई दासीले अनं हिना पोऱ्याले काढी टाका; मना पोऱ्या इसहाक यानासंगे हाई दासीना पोऱ्या वारीस ऱ्हावाले नको.
11 अब्राहामले आपला पोऱ्यानाबद्दल हाई गोष्ट खुप वाईट वाटनी.
12 तवय देव अब्राहामले बोलना, हाऊ पोऱ्या अनं हाई दासी यासनाबद्दल तू वाईट वाटीसन लेवु नको; सारा तुले जे काही सांगस ते सर्वा ऐकी ले; तुना वंशजना नाव इसहाकच चालावनार शे.
13 अनी हाई दासीना पोऱ्यापाईन बी मी एक राष्ट्र बनाडसु; कारण तो पण तुनाच वंशज शे.
14 नंतर अब्राहामनी पहाटमाच उठीन भाकरी अनं पाणीघाई भरेल चामडानी थैली लिधी अनी ती लिसन हागारना खांदावर ठेई अनी तिना पोऱ्या तिनाजोडे दिसन तिले वाट लायं, ती निंघीसन बैर-शेबाना रानमा भटकत राहीनी.
15 जवय थैलीमाधलं पाणी संपी गयं तवय तिनी आपला पोऱ्याले झुडूपना खाल ठि दिधं.
16 "अनी ती काही अंतरवर जाईसन त्यानासमोर बसनी; कारण ती बोलनी, "मना पोऱ्याले मी मरतांना नही दखु शकस." म्हणीसन ती थोडं दुर जाईसन त्यानाकडे तोंड करीसन बठनी अनी हंबरडा फोडीन रडाले लागनी.
17 देवनी पोऱ्यानं रडानं आवाज आयकं; अनं देवना दूतनी आकाशमाईन हाक मारीसनं हागारले बोलना, हागार, तुले काय व्हयनं शे? घाबरू नको, कारण जठे पोऱ्या शे तठेतीन देवनी त्याना आवाज आयकेल शे.
18 ऊठ, पोऱ्याले उचलीसनं आपला हातमां धर, त्यानापाईन मी एक मोठं राष्ट्र बनाडनार शे.
19 मंग देवनी तिना डोया उघडात अनं तिले पाणीनी विहीर दखायनी; तवय तिनी जाईसनं थैलीमा पाणी भरं अनं पोऱ्याले पाजं.
20 देव त्या पोऱ्यानासंगे व्हता, अनं तो पारानना रानमा धाकलाना मोठा व्हईसन तिरंदाज बनना.
21 तो पारानाना रानमा वस्ती करीन राहिना, अनी त्यानी मायनी त्याले मिसर देशनी बायको करी दिधी.
अबीमलेखनीसंगे अब्राहामना वचन
22 त्या येळले अश व्हयनं की, अबीमलेख अनं त्याना सेनापती पीकोल ह्या अब्राहामले बोलनात, ज्या काही तुम्हीन करतस त्यामा देव तुम्हनासंगे शे.
23 यामुये तू आते मनासंगे परमेश्वरनी हाई शपथ खाय की, तुम्हीन मना संतानासंगे कपटीन वागाऊ नही, अनी जशी तुम्हीन मनावर कृपा करी, तशी मी तुमनावर अनं ज्या देशमा मी प्रवासी म्हणीसन राहिनु शे, तो हाई देशवर कृपा करसु.
24 अब्राहाम बोलना, बरं, मी हाई शपथ लेस.
25 मंग अबीमलेखना चाकरंसनी पाणीनी एक विहिर आपला ताबामा लेयल व्हती, त्यानाबद्दल अब्राहामनी अबीमलेखले दोष लायं.
26 अबीमलेख बोलना, हाई काम कोणी करेल शे हाई माले माहित नही; तुम्हीन माले हाई पहिले सांगेल नव्हतं; अनी मी पण हाई ऐकेल नव्हतं, आजच ऐकी राहीनु शे.
27 मंग अब्राहामनी मेंढरं अनं बैल आणीसन अबीमलेखले दिधं अनी त्या दोन्हीसनी एकमेकससंगे करार करा.
28 अब्राहामनी कळपमाईन कोकरूमाधलं सात माद्या येगळ्या काढी ठेयात.
29 तवय अबीमलेख अब्राहामले बोलना, तुम्हीन ह्या सात कोकरू कसाले येगळा काढी ठेयल शेतस?
30 तो बोलना, तुम्हीन ह्या सात कोकरू मना हाततीन ल्या, म्हणजे यानी हाई साक्षी राही की, हाई विहिर मी खंदेल शे.
31 यावरीन त्या ठिकाणना नाव बैर-शेबा (शपथनी विहिर) असं पडनं, कारण तठे त्या दोन्हीजणसनी शपथ लिधी.
32 बैरशेबा आठे त्यासनी करार करावर अबीमलेख त्याना सेनापती पीकोल ह्या निंघीसन पलिष्टयासना देशले परत गयात.
33 मंग अब्राहामनी बैर-शेबा आठे एशेल नावना झाड लायं, अनी तठे सनातन देव परमेश्वर याना नावनी आरधना करी.
34 अब्राहाम हाऊ पलिष्टयासना देशमा बराच दिन प्रवासी म्हणीसन राहिना.