22
देव अब्राहामले इसहाकनं अर्पण कराले लावस
मंग या गोष्टी घडण्यात तवय आशे व्हयनं की, देवनी अब्राहामनी परीक्षा लिधी; अनी त्यानी अब्राहाम, अशी हाक मारी, तवय अब्राहाम बोलना, काय आज्ञा? देव बोलना, तुना पोऱ्या, तुना एकुलता एक आवडता इसहाकले ज्यानावर तू प्रिती करस त्याले लिसन मोरिया देशमा जाय अनी मी तुले सांगसु त्या डोंगरवर त्यानं अर्पण कर.
तवय अब्राहाम मोठी पहाटमाच उठीसन आपला गधडावर गासडा बांधं, आपलासंगे दोन सेवक अनं आपला पोऱ्या इसहाक याले संगे लिधं, अनी होमार्पणकरता लाकडे फोडी लिधात, मंग देवनी सांगेल ठिकानपान तो निंघना. तिसरा रोजले अब्राहामनी वर नजर करीसन ती जागा दुरतीन दखी. अब्राहाम आपला सेवकसले बोलना, तुम्हीन आठेच गधडानाजोडे थांबा, पोऱ्या अनी मी पलीकडे जाईसन देवनी आराधना करीसनं मंग तुमनाजोडे परत येतस. तवय अब्राहामनी होमार्पणकरता लाकडे लिसन आपला पोऱ्या इसहाक यानी पाटवर ठेवात, अनी आपला हातमा ईस्तव अनं सुरा लिधा, अनी दोन्ही संगेसंगे चालनात. तवय इसहाकनी आपला बापले सांगं,
बाबा!
तो बोलना, काय सांगस बाळा? त्यानी सांगं, दखा, ईस्तव अनं लाकडे पण लेयल शेतस पण होमार्पणकरता कोकरू कोठे शे?
अब्राहाम त्याले बोलना, बाळा, देव स्वत: होमार्पणकरता कोकरू दखी दी; अनी त्या दोन्ही संगेसंगे चालनात.
देवनी त्याले सांगेल ठिकानपान त्या वनात तवय अब्राहामनी तठे वेदी बांधी, तिनावर लाकडे रचात अनी आपला आवडता पोऱ्या इसहाक याले बांधीसन वेदीवरना लाकडसवर ठेवं. 10 तवय अब्राहामनी आपला पोऱ्याना वध कराकरता हात पुढे करीसन सुरा लिधा. 11 तवय परमेश्वरना दूत अब्राहामले आकाशमाईन हाक मारीन बोलना, "अब्राहाम, अब्राहाम!" त्यानी सांगं, "काय आज्ञा?"
12 मंग तो बोलना, "तू तुना हात आपला पोऱ्यावर चालावू नको, त्याले काही करू नको; आते माले समजेल शे की, तु देवले भ्याईसन चालनारा शे, कारण तू आपला पोऱ्याले, आपला एकुलता एक पोऱ्याले बी मनाकरता सोडं नही."
13 तवय अब्राहामनी नजर वर करीसन दखं, ते त्याले आपलामांगे झुडपा शिंगं अटकेल एक एडका दिसना; मंग अब्राहमनी तो एडका लिसन आपला पोऱ्याना बदलामा अर्पण करं. 14 "अनी अब्राहामनी त्या ठिकाननं नाव "याव्हे-यिरे म्हणजे परमेश्वर दखी दी" अस ठेवं; तवयपाईन परमेश्वरना डोंगरवर दखी देवामा ई अस आजपावत बोलामा येस.
15 परमेश्वरना दूतनी आकाशमाईन अब्राहामले दुसरांदाव हाक मारीसन बोलना, 16 परमेश्वर सांगस, मी स्वत:नी शपथ लिसन सांगस की, तू हाई कृत्य करा; आपला पोऱ्याले, आपला एकुलता एक पोऱ्याले मनापाईन राखी ठेया नही; 17 यामुये मी तुले आशिर्वादीत करसु, अनं भरभराट‍ करीसन तुनी संतती आकाशमाधलं तारा इतला, समुद्रकाठना वाळू इतली व्हई आशे मी करसु; तुनी संतती आपला शत्रूसना नगरेसवर अधिकार करी लेतीन. 18 तू मना शब्द आयकं म्हणीसन पृथ्वीवरना राष्ट्र तुना संततीमुये आशिर्वादीत व्हतीन. 19 मंग अब्राहाम आपला सेवकसकडे परत वना, अनी त्या उठीसन बैर-शेबा आठे वनात; अनी अब्राहाम बैर-शेबामा रावाले लागना.
नाहोरनं वंशज
20 या गोष्टी घडन्यात तवय कोणीतरी अब्राहामले सांगं, दख, तुना भाऊ नाहोर यानापाईन मिल्काले बी पोऱ्यानी संतती व्हयेल शे. 21 मिल्काना पोऱ्या या व्हतात, ऊस हाऊ त्याना ज्येष्ठ पोऱ्या, त्याना भाऊ बूज अनं अरामना बाप कमुवेल. 22 अनी केसद, हजो, पिलदाश, यिदलाप, अनं बथुवेल. 23 बथुवेलपाईन रिबका व्हयनी; अब्राहामना भाऊ नाहोर यानापाईन मिल्काले ह्या आठ पोऱ्या व्हयनात; 24 अनी त्यानी उपपत्नी रेऊमा हिले बी तेबाह, गहाम, तहश, अनं माका ह्या व्हयनात.
22:1 इब्री 11:17-19; उत्पती 31:11; निर्गम 3:4 22:2 २ इतिहास 3:1 22:16 इब्री 6:13-14 22:17 इब्री 11:12 22:18 प्रेषित 3:25; गलती 3:16