24
इसहाककरता बायकोना शोध
अब्राहाम आते म्हतारा व्हईसन खूप वयना व्हई जायेल व्हता; परमेश्वरनी अब्राहामले बठया गोष्टीसमा आशिर्वादीत करेल व्हतं. अब्राहामना मालमत्ताना सर्वा कारभार दखनारा एक सर्वसमा जुना सेवक व्हता, त्याले त्यानी सांगं, तू तुना हात मना मांडीनाखाल ठेव. मी तुले परमेश्वरनी, आकाश अनं पृथ्वी यासना देवनी शपथ लेवाले सांगस की, ज्या कनानी लोकसमा मी ऱ्हाई राहिनु शे. त्यासना पोरीपाईन कोणती बी मना पोऱ्याकरता तू बायको दखावु नही. तर मना देशले मना नातेवाईकसजोडे जाईसन तठेन मना पोऱ्या इसहाक करता बायको दखी लयशी. त्याना सेवक त्याले बोलना, कदाचित ती बाई मनासंगे हाई देशमा येवाले राजी नही व्हयनी ते मंग ज्या देशमाईन तुम्हीन वनात तठे तुमना पोऱ्याले मी परत ली जावानं का? तवय अब्राहाम बोलना, खबरदार! मना पोऱ्याले तठे ली जावानं नही. स्वर्गना ज्या परमेश्वर देवनी माले मना बापना घरमाईन, मनी जन्मभुमीमाईन आणं अनी माले शपथ खाईसन सांगं की, हाऊ देश मी तुना संततीले दिसु. तो तुनापुढे त्याना दूत धाडी, अनी तठेनच तू मना पोऱ्याकरता बायको आण. पण ती बाई तुनासंगे येवाले राजी नही व्हयनी तर तू मनी शपथपाईन मोकळा व्हसी; पण मना पोऱ्याले तिकडे कधीच ली जावानं नही. तवय त्या सेवकनी आपला मालक अब्राहामना मांडीनाखाल हात ठेईसन हाई गोष्टनी शपथ लिधी. 10 मंग तो सेवक आपला मालकना उंटसपाईन दहा उंट लिसन निंघना; त्यानाजोडे त्याना मालकन्या सर्वा प्रकारन्या मौलवान वस्तु व्हत्यात; तो उत्तरले मेसोपोटामिया माधलं नाहोरना नगरमा गया. 11 संध्याकाळले बाया पाणी भराले बाहेर निंघतस त्या येळले त्यानी आपला उंट नगरना बाहेर एक विहिरनाजोडे बसाडं. 12 अनी तो बोलना, हे परमेश्वरा, मना मालक अब्राहाम याना देवा, तू आज कृपा करीसन मना कार्य सफल कर; मना मालक अब्राहाम यानावर दया कर. 13 दख, मी हाई पाणीनी विहिरनाजोडे उभा शे, अनी गावमाधल्या पोरी पाणी भराले बाहेर ई ऱ्हाईन्या शेतस. 14 आते असं व्हवू दे की, जी पोरले मी सांगसु, माले पाणी पेवाकरता घागर खाल उतार, अनी ती माले म्हणी तू पण पी अनी तुना उंटसले बी पाणी पाजस, तीच पोर तुना सेवक इसहाक यानाकरता निवडेल शे, यावरीन माले समजी की, तू मना मालकवर दया करेल शे.
15 अनी तसच व्हयनं जो ते सांगी राहिंता, तवय अब्राहामना बंधु नाहोर यानी बायको मिल्का हिना पोऱ्या बथुवेलनी पोर रिबका खांदावर घागर लिसन तठे वनी. 16 हाई पोर दखावाले देखनी व्हती; ती कुवारी व्हती; तिनी माणुस दखेल नव्हता; ती विहिरमा उतरनी अनं घागर भरीसन वर वनी. 17 तवय तो सेवक धावत जाईसन तिले गाठीसनं बोलना, तुनी घागरमाईन माले थोडं पाणी पाज. 18 ती त्याले बोलनी, प्या, बाबा; अनी तिनी लगेच आपला हातवर घागर उतारीसन त्याले पाणी पाजं. 19 त्याले भरपुर पाणी पाजावर ती बोलनी, तुमना उंटसले मी पाणी आणीसनं त्यासले पोटभर पाजस. 20 मंग तिनी लगेच घागर कुंडीमा रिकामी करी अनी परत विहिरनाजोडे पाणी भराले धावत गई; अश करीसन तिनी त्याना सर्वा उंटसकरता पाणी काढं. 21 तवय तो माणुस आश्चर्य व्हईसन तिनकडे दखी राहिना; परमेश्वरनी आपला प्रवास सफल करं की नही हाई ईचार करीसन गप्प राहिना.
22 मंग अश व्हयन की, उंटसना पाणी पेवावर त्या माणुसनी अर्धा शेकेल भार सोनानी एक नथ अनं तिना हातमा घालाकरता दहा शेकेल भार दोन सोनान्या बांगड्या काढयात, 23 अनी तो तिले बोलना, तू कोणी पोर शे हाई माले सांग; तुना बापना घर थांबाकरता आमले जागा शे का? 24 ती त्याले बोलनी, नाहोरपाईन मिल्काले व्हयेल बथुवेलनी मी पोर शे. 25 ती त्याले आखो बोलनी, आमना आठे भरपुर चारा अनी थांबाकरता जागा बी शे. 26 तवय त्या माणुसनी झुकीसन परमेश्वरनी आरधना करी. 27 तो बोलना, मना मालक अब्राहाम याना देव यहोवा धन्यवादित शे; त्यानी मना मालकवर दया करानं अनी त्यानासंगे सत्यमा चालानं सोडं नही; परमेश्वरनी माले सरळ वाट दखाडीसन मना मालकना भाऊसना घर पोचाडेल शे.
28 तवय त्या पोरनी पयत जाईसन तिनी मायना घरनासले हाई गोष्ट सांगी. 29 रिबकाले एक भाऊ व्हता; त्यानं नाव लाबान व्हतं, तो विहिरनाजोडे त्या माणुसकडे धावत गया. 30 त्यानी नथ अनं आपला बहिणना हातमाधल्या बांगड्या दखेल व्हत्यात, अनी तो माणुस माले अश बोलना, हाई रिबकानं तोंडनं शब्द आयकीसनं तो त्या माणुसकडे वना अनी दखं तर तो उंटसपान विहिरनाजोडे उभा व्हता. 31 तवय त्यानी त्याले सांगं, अहो परमेश्वरना आशिर्वाद "मजार या, बाहेर का बर उभा शेतस? मी आपलाकरता घर अनी उंटसकरता जागा करी ठेयल शे.
32 तवय तो माणुस घर वना; अनी लाबाननी उंटसन्या कंठाळी सोडीसन त्यासले चारा अनं भुसा दिधा अनी त्या माणुसले अनं त्यानासंगेनासले पाय धुवाले पाणी दिधं. 33 जवय त्यानासमोर जेवण वाढी दिधं तवय तो त्यासले बोलना, "जोपावत मी आठे येवानं कारण तुमले सांगस नही," तोपावत मी भोजन करावु नही, तवय तो बोलना, "मंग सांगा.''
34 तो बोलना, "मी अब्राहामना सेवक शे." 35 परमेश्वरनी मना मालकनं कल्याण करेल शे; तो मोठा व्हयेल शे; त्यानी त्याले गुरं, मेंढरं, सोनं, रूपे, दासदासी, उंट अनं गाढवं बी देयल शेतस. 36 मना मालकनी बायको सारा हिले म्हतार पणमा त्यानापाईन पोऱ्या व्हयना, त्याले त्यानी सर्वाकाही देयल शे. 37 अनी मना मालकनी माले शपथ लेवाले लाईसन सांगेल शे की, ज्या कनानीसना देशमा मी ऱ्हाई राहिनु शे, त्यासन्या पोरीसमाईन कोणती बी पोर मना पोऱ्याले बायको दखु नको; 38 तर मना बापना घर मना नातेवाईकस कडे जाय अनी तठेन मना पोऱ्याले बायको दखी आण. 39 तवय मी मना मालकले सांगं, ती पोर मनासंगे येवाले तयार व्हयनी नही ते. 40 तवय तो माले बोलना, ज्या परमेश्वरनी संगे मी चालस, तो आपला दूत तुनासंगे धाडी अनं तुना प्रवास सफल करी, अनी तू मना नातेवाईकस कडे, मना बापना घराणामाईन मना पोऱ्याले बायको आण. 41 तू मना नातेवाईकस कडे गया म्हणजे मनी शपथपाईन मोकळा व्हसी; पोर देवाले त्या तयार नही व्हयनात तरी तू मनी शपथपाईन मोकळा व्हशी.
42 मी आज हाई विहिरना जोडे वनु तवय बोलनु, मना मालक अब्राहामना देव यहोवा मी जो प्रवास करेल शे, तो सफल करशी तर. 43 दख, मी हाई विहिरनाजोडे उभा राहेल शे; तर अस व्हवू दे की, पाणी भराले जी पोर ई, तिले मी सांगसु, तुनी घागरमाईन माले थोडं पाणी पाज. 44 अनी ती माले सांगी, तू पी अनी तुना उंटसले बी मी पाणी काढस; तीच पोर परमेश्वरनी मना मालकना पोऱ्याकरता नेमेल शे अश ठरो. 45 मी मना मनमा हाई बोली राहिंतु तितलामा रिबका खांदावर घागर लिसन तठे वनी अनी तीनि विहिरमा उतरीसन पाणी भरं, मंग मी तिले बोलनु, माले थोडं पाणी पेवाले देय. 46 तिनी लगेच आपला हातवर घागर उतारीन सांगं, तू पी अनी तुना उंटसले बी मी पाणी पाजस, तवय मी पाणी पिनु अनं तिनी मना उंटसले बी पाणी पाजं. 47 मंग मी तिले इचारनु, तू कोणी पोर शे? ती बोलनी नाहोरपाईन मिल्काले व्हयेल बथुवेलनी मी पोर शे? तवय मी तिना नाकमा नथ अनं हातमा बांगड्या घालात. 48 मी नमीसन परमेश्वरले स्तवन करा अनी मना मालकनी भाऊनी पोर त्याना पोऱ्याकरता लई जावो म्हणीसन मना मालक अब्राहाम याना देव यहोवा यानी माले सरळ वाट दखाडी म्हणीन मी त्यानं स्तवन करा. 49 तर आते मना मालकसंगे कृपातीन अनं खरापणतीन वागशात तर माले तश सांगा, नही व्हई तर तश सांगा, म्हणजे मी ठरावसु माले काय करानं शे. 50 तवय लाबान अनी बथुवेल यासनी उत्तर दिधं, हाई परमेश्वरनी योजना शे; म्हणीसनं आमनाघाई तुमले चांगलं न वाईट काही बोलता नही ई ऱ्हाईनं. 51 दखा, रिबका तुमनापुढे शे; तिले लई जा; परमेश्वरनी सांगेलप्रमानी ती तुमना मालकना पोऱ्यानी बोयको होऊ द्या. 52 अब्राहामनं सेवकनी त्यासनं हाई शब्द आयकं तवय त्यानी भुमीपावत झुकीसन परमेश्वरले नमन करं. 53 मंग त्या सेवकनी सोना रूपाना दागिना अनं कपडा काढिसन रिबकाले दिधं. अनी तिना भाऊ अनं तिनी माय यासले मुल्यवान वस्तु दिधात. 54 मंग त्यानी अनं त्यानासंगेना माणसंसनी जेवण करीसन रातले तठेच मुक्काम करं; सकासले उठावर तो बोलना, मना मालककडे जावाकरता माले निरोप द्या.
55 हाई ऐकीसन तिना भाऊ अनं तिनी माय हाई बोलनात, पोरले आमनाजोडे थोडं दिन, निदान दहा दिन राहु द्या; मंग ती तुमनासंगे ई;
56 पण तो त्यासले बोलना, परमेश्वरनी मना प्रवास सफल करेल शे, "तर माले थांबाडू नका; माले निरोप द्या, माले मना मालककडे जावु द्या."
57 तवय त्या बोलनात, आम्हीन पोरले बलाईसन ईचारतस ती काय म्हणस. 58 त्यासनी रिबकाले बलाईसन ईचारं, तू हाई माणुसनासंगे जास का? ती बोलनी, "हा मी जास."
59 मंग त्यासनी आपली बहीण रिबका, तिनी दासी, अब्राहामना सेवक अनं त्याना माणसे यासले वाट लायं. 60 त्यासनी रिबकाले आशिर्वाद दिसन बोलनात,
"हे आमनी ताई, तु हजारोसनी अनी लाखोसनी माय बन,"
अनं तुनी संतती आपला वैरीसना नगरंसना अधिकारी बनोत.
61 मंग रिबका अनं तिना मैत्रीन उठन्यात अनी उंटवर बसीन त्या माणुसन्या मांगे गयात; अस प्रकारे तो माणुस रिबकाले लई गया.
62 इकडे इसहाक रानमाईन लहाय-रोई विहिरकडीन येयल व्हता; तो दक्षिणले कनानमा राही राहिंता. 63 इसहाक हाऊ संध्याकाळना येळले रानमा फिराले जायेल व्हता, त्यानी नजर वर करीसन दखं, ते त्याले उंट येतांना दखायनात. 64 रिबकानी नजर वर करीसन इसहाकले दखं, तवय ती उंटवरतीन उतरनी. 65 तिनी त्या सेवकले ईचारं, हाऊ रानमा आपला समोर ई राहिना तो कोण शे? सेवक तिले बोलना, हाऊ मना मालक शे, तवय तिनी बुरखा लिसन आपलं आंग झाकी लिधं. 66 तवय सेवकनी आपण जे काही करं ते सर्व इसहाकले सांगं, 67 मंग इसहाकनी रिबकाले आपली माय सारा हिना तंबूमा आणं अनी त्यानी तिनासंगे लगीन करीन तिनावर प्रेम करं; हाई प्रकारं आपली मायना मृत्युना बदलामां बी इसहाकले शांती भेटनी.