25
अब्राहामले व्हयेल अन्य संतती
(१ इतिहास 1:32-33)
1 अब्राहामनी दुसरी बायको करी, तिन नाव कटूरा व्हतं,
2 तिले त्यानापाईन जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक अनं शुह ह्या पोऱ्या व्हयनात.
3 यक्षानानले शबा अनं ददान ह्या पोऱ्या व्हयनात; अनी ददानना पोऱ्या अश्शुरी, लटूशी अनं लऊमी ह्या व्हतात.
4 मिद्यानना पोऱ्या एफा, एफर, हनोख, अबीदा, अनं एल्दा ह्या व्हतात. हया सर्व कटूरना वंश.
5 अब्राहामनी सर्वकाही इसहाकले दिधं.
6 अनी अब्राहामले उपपत्न्या व्हत्यात त्यासन्या पोऱ्यासले त्यानी देणग्या दिसन आपला जीवमा जीव व्हतं तोपावत आपला पोऱ्या इसहाक यानापाईन येगळं करीसन पुर्व दिशाले धाडी दिधं.
अब्राहामना मृत्यु
7 अब्राहामनं आयुष्यनं सर्व वरीस एकशेपंचाहत्तर व्हतं.
8 अब्राहाम पुरं आयुष्य जगना म्हणजे म्हतारा व्हईसन मरण पावना, अनं आपला पुर्वजसले जाईन भेटना.
9 मंग त्याना पोऱ्या इसहाक अनं इश्माएल यासनी त्याले एफ्रोन बिन सोहर हित्ती याना मम्रेनासमोरनी वावरमाधली मकपेलना गुहामा मूठमाती दिधी.
10 हाई शेत अब्राहामनी हेथीपाईन ईकत लियेल व्हतं, अनी तठेच अब्राहाम अनं त्यानी बायको सारा यासले मूठमाती दिधी.
11 अब्राहामना मृत्युनंतर देवनी त्याना पोऱ्या इसहाकले आशिर्वाद दिधा; जो त्या येळले लहाय-रोई विहिरनाजोडे ऱ्हाई राहिंता.
इश्माएलना वंशज
(१ इतिहास 1:28-31)
12 सारानी मिसरी दासी हागार हिनापाईन अब्राहामले इश्माएल नावना पोऱ्या व्हयना, त्यानी हाई वंशावळी.
13 इश्माएलना पोऱ्यासना नावे त्यासना वंशप्रमाणे ह्या शेतस, नबायोथ, हाऊ इश्माएलना पहिला पोऱ्या अनी केदार, अदबील, मिबसाम,
14 मिश्मा, दुमा, मस्सा,
15 हदद, तेमा, यतूर, नापीश अनं केदमा.
16 ह्या इश्माएलना पोऱ्या व्हतात; त्यासना गाववरीन अनं गोटावरीन त्यासले ह्या नावे पडेल शेतस, ह्या आपापला वंशना बारा सरदार व्हतात.
17 इश्माएलना आयुष्यना वय वरीस एकशेसदतीस व्हवावर तो मरण पावना अनं आपला पुर्वजसले जाईन भेटना.
18 त्यानं वंशज हवीलापाईन शूर देशपावत वस्ती करीसन राहिनात; हाऊ देश मिसरना पुर्वले राहीसन अश्शुरकडे जातांना लागस; अश प्रकारे तो आपला भाऊबंधूसना देखत पुर्वले जाईसनं राहिना.
एसाव अनी याकोब यासना जन्म
19 अब्राहामना पोऱ्या इसहाक यानी वंशावळी हाई शे, अब्राहामनी इसहाकले जन्म दिधा.
20 इसहाक चाळीस वरीसना व्हयना तवय त्यानी अरामी लाबान यानी बहिण पदन-अरामना माधलं अरामी बथुवेल यानी पोर रिबका हाई बायको करी.
21 इसहाकनी आपली बायको करता परमेश्वरकडे प्रार्थना करी, कारण ती वांझ व्हती; परमेश्वरनी त्यानी प्रार्थना ऐकी अनी त्यानी बायको रिबका गर्भवती व्हयनी.
22 पण तिना गर्भमा पोऱ्या एकमेकसना संगे भांडण कराले लागनात, तवय ती बोलनी, माले काबंर अश व्हई राहिनं शे? हाई काय शे म्हणीसन ती परमेश्वरले ईचाराले गई.
23 परमेश्वर तिले बोलना, तुना गर्भमा दोन राष्ट्र शेतस; तुना उदरमाईन दोन वंश निंघतीन; एक वंश दुसरा वंशपेक्षा शक्तीशाली व्हई; अनी मोठा धाकलानी सेवा करी.
24 तिना प्रसूतिना दिन भरानी येळ वनी; तवय दखा, तिना उदरमा दोन जुळा पोऱ्या व्हतात.
25 पहिला पोऱ्या लाल रंगना व्हता अनी त्याना सर्वा आंग केसना वस्त्रनामायक व्हतं; त्यानं नाव एसाव ठेवात.
26 त्यानानंतर त्याना भाऊ जन्मना; एसावनी टाच त्याना हातमा व्हती; त्यानं नाव याकोब अश ठेवात (टाच धरनारा किंवा युक्तीमा हिराई लेणारा) तिनी त्याले जन्म दिधा तवय इसहाक साठ वरीसना व्हता.
एसावनाकडतीन मोठा भाऊना अधिकार ईकसं
27 त्या पोऱ्या मोठा व्हयनात, एसाव हाऊ रानमा फिरनारा हुशार पारधी व्हयना; अनं याकोब हाऊ तंबूमा राहनारा साधा माणुस व्हता.
28 एसाव मास आणे ते इसहाकले भलतं आवडे म्हणीसनं तो त्याले आवडे, पण याकोब रिबकाना आवडता व्हता.
29 एकदाव याकोबनी वरण बनाडेल व्हतं, तवय एसाव रानमाईन थकी बंगीसन वना.
30 तवय एसावनी याकोबले सांगं, ते लाल दखास ना, त्यानामाईन लवकर माले खावाले आण, मी भयान गळी जायेल शे; त्यावरीन त्यानं नाव अदोम (लाल) अश पडनं.
31 याकोब त्याले बोलना, पहिले तुना मोठा पणना हक्क माले मोबदला दे.
32 एसाव त्याले बोलना, दख, मी मराले टेकनु शे; तर माले मना मोठा पणना हक्कना काय उपयोग?
33 याकोब बोलना, तर आत्तेच मनासंगे शपथ खाय; तवय त्यानी शपथ खाईन आपला मोठा पणना हक्क याकोबले मोबदला दिधा.
34 तवय याकोबनी एसावले भाकर अनं मसुरनं वरण दिधं; तो खाईपिसन उठना अनं चालता व्हयना; अस प्रकारतीन एसावनी आपला मोठा पणना हक्क तुच्छ लेखं.