3
मानवनं पापी व्हवानं वर्णन
परमेश्वर देवनी बनाडेल सर्वा वनचरमा साप पक्का लबाड व्हता. तो आदामनी बाईले बोलना, "तुम्हीन बागमाधला कोणतं बी झाडनं फळ खावानं नही अश देवनी तुमले सांगं हाई खरं शे का?"
बाईनी सापले सांगं, "बागमाधला झाडंसनं फळ खावानी आमले परवांगी शे, पण बागना मध्यभागमा जे झाड शे त्यानाविषयी देवनी आमले सांगेल शे की, त्यानं फळ खावानं नही; त्याले स्पर्श बी करानं नही, करशात तर मरशात." साप त्या बाईले बोलना, "तुम्हीन खरोखर मरावुत नहीत." कारण देवले हाई माहिती शे की, ज्या दिनले तुम्हीन त्यानं फळ खाशात त्याच दिनले तुमना डोया उघडतीन, अनी तुम्हीन देवना मायक चांगलं अनी वाईट जाणनारा व्हशात."
त्या झाडनं फळ खावाले चांगलं, दखाले मनोहर, अनी समजदार कराले इष्ट शे अश त्या बाईले दिसनं, तवय तिनी त्या झाडनं फळ तोडीसन खादं अनं आपलासोबत आपला नवराले बी ते दिधं; अनं त्यानी पण ते फळ खादं. तवय त्या दोनी नवरा बायकोसना डोया उघडनात अनी आपन नंगा शेतस अश त्यासले समजनं; तवय त्यासनी आपलं अंग झाकाकरता अंजिरना झाडना पानं शिईसन स्वतःले झाकी लिधं.
मंग संध्याकाळना थंडा वारा सुटना तवय परमेश्वर देव एदेन बागमा फिरी राहिंता, त्याना आवाज आदामले ऐकु वना, तवय परमेश्वर देवना नजरतीन आदाम अनं त्यानी बाई बागना झाडसमा लपनात. तवय परमेश्वर देवनी आदामले हाक मारीसन सांगं, "तु कोठे शे?"
10 आदामनी देवले सांगं, "मी बागमा तुना आवाज ऐका, पण मी नंगा शे, म्हणीसन भ्याईसन लपनु."
11 देवनी त्याले सांगं, "तु नंगा शे हाई तुले कोणी सांगं? ज्या झाडनं फळ तु खावानं नही अशी आज्ञा मी तुले देल व्हती त्यानं फळ तु खादं का?"
12 आदाम बोलना, "जी बाई तु माले सोबतमा दिधी तिनी त्या झाडनं फळ माले दिधं अनी ते मी खादं."
13 परमेश्वर देव त्या बाईले बोलना, "हाई तु काय करं? बाई बोलनी, सापनी माले भुरळ घाली म्हणीसन मी ते खादं."
परमेश्वरना न्याय
14 तवय परमेश्वर देव सापले बोलना, "तु हाई करं म्हणीसन सर्वा ग्रामपशु अनं वनचर यासनापेक्षा तु शापग्रस्त हो; तु पोटघाई चालशी अनी आयुष्यभर माती खाशी; 15 अनी तु अनं बाई, तुनी संतती अनं तिनी संतती यासनामा मी परस्पर वैर स्थापन करसु; ती तुना डोका फोडी, अनं तु तिनी टाच फोडशी."
16 परमेश्वर बाईले बोलना, "मी तुना दु:ख अनं तुना गर्भधारणा बहुगुणित करसु; तु क्लेशमा पोऱ्यासले जन्माले घालशी; तरी तुना ओढा नवराकडे राही अनी तो तुनावर स्वामीत्व चालाडी."
17 आदामले तो बोलना, "तु तुना बाईना ऐकनास अनी ज्या झाडनं फळ खावानं नही म्हणीसन मी तुले आज्ञा करेल व्हती त्यानं फळ तु खादं; म्हणीन तुनामुये भुमीले शाप येल शे; तु आयुष्यभर कष्ट करीसन तिना उपज खाशी; 18 ती तुले काटा अनं कुसळ दि; तु शेतमाधलं पिक खाशी; 19 तु आपला निढळना घामघाई भाकर मियाडीसन खाशी अनं शेवट परत मातीले जाईसन मिळशी; कारण तिनापाईनच तुनी उत्पती शे, तु माती शे अनी मातीले परत जाईसन मिळशी."
20 आदामनी त्यानी बाईना नाव हव्वा ठेवं, कारण ती सगया जीवधारी जणसनी माय शे. 21 परमेश्वर देवनी आदाम अनं त्यानी बाई यासनाकरता चर्मवस्त्र बनाडीसन त्यासले घालात.
आदाम अनं हवाले बागमातीन काढी टाकं
22 मंग परमेश्वर देव बोलना, "मानवले चांगलं अनी वाईट कळीसन तो आमनामातीन एकसमान व्हयेल शे; तर आते कदाचित मानव आपला हात जिवनना झाडले लाईन त्याना बी फळ तोडीसन खाई अनं सर्वाकाळ जिवत राही." 23 पण ज्या भुमीमाईन त्यासले बनाडेल व्हतं तिनी मशागत कराले पाहिजे म्हणीसन परमेश्वर देवनी त्यासले एदेन बागमाईन बाहेर काढी दिधं. 24 देवनी मानवले बाहेर काढी दिधं अनी जिवनना झाडकडे जाणारा वाटनी राखण कराकरता एदेन बागना पुर्व भागले करूबीम* अनं गरागर फिरणारी ज्वालारूपी तलवार ठेई.
3:1 प्रकटीकरण 12:9; योएल 2:24; प्रकटीकरण 20:2 3:5 यहेज्केल 28:2 3:24 यहेज्केल 28:16 * 3:24 करूबीम विशेष प्रकारना स्वर्गदूत अर्थात पंखधारी प्राणी