30
मंग राहेलनी दखं, की, याकोबले आपलापाईन काही पोऱ्यासोऱ्या व्हई नही राहिनात, तवय ती आपली बहीणना हेवा कराले लागनी अनी ती याकोबले बोलनी, तुम्हीन माले बी पुत्रवती करा, नही ते मी मरी जासु. तवय याकोब राहेलवर संताप करीन बोलना, मी काय देवना जागवर शे का? म्हणीसनं तुले गर्भना फळपाईन वंचित ठेयेल शे. मंग ती बोलनी, दखा, हाई मनी दासी बिल्हा शे; हिनाजोडे जाय, म्हणजे हाई मनी मांडीवर प्रसूत व्हईसन हिनामुये मना घर नांदाले लागी. तवय तिनी आपली दासी बिल्हा त्याले बायको करी दिधी अनी याकोब तिनाजोडे गया. बिल्हा याकोबपाईन गर्भवती व्हईन तिले पोऱ्या व्हयना. तवय राहेल सांगाले लागनी, देवनी मना न्याय करेल शे, अनी मना आवाज ऐकीसन माले एक पोऱ्या देल शे; म्हणीन तिनी त्यानं नाव दान ठेवं. मंग राहेलनी दासी बिल्हा हाई याकोबपाईन परत गर्भवती व्हईन तिले दुसरा पोऱ्या व्हयना. तवय राहेल बोलनी, मी आपली बहिणनासंगे खुप झगडा करीसन यश मियाडेल शे; अनी तिनी त्यानं नाव नफताली ठेवा.
जवय लेआ हिनी हाई दखं की, माले पोऱ्या व्हवानं थांबी जायेल शे, तवय तिनी आपली दासी जिल्पा याकोबले बायको करी दिधी. 10 लेआ हिनी दासी जिल्पा हिले याकोबपाईन पोऱ्या व्हयना. 11 तवय लेआ बोलनी, मी कितली नशीबवान! अनी तिनी त्या पोऱ्यानं नाव गाद *ठेवं. 12 लेआ हिनी दासी जिल्पा हिले याकोबपाईन दुसरा पोऱ्या व्हयना. 13 तवय लेआ बोलनी, मी कितली धन्य शे! बाकीन्या बाया माले धन्य म्हणतीन, म्हणीन तिनी त्यानं नाव आशेर ठेवं.
14 गहूना कापणीना येळले रऊबेन शेतमा गया तवय त्याले तठे पुत्रदात्रीनं फळं भेटनात, ती त्यानी आपली माय लेआ हिनाजोडे आणीसन दिधी; तवय राहेल लेआले बोलनी, पुत्रदात्रीनं फळं तुना पोऱ्यानी आणेल शेतस त्यामाईन थोडसं माले बी दे. 15 पण ती तिले बोलनी, तू मना नवराले ली लियेल शे, हाई धाकली गोष्ट शे का? अनी आते तू मना पोऱ्यानी आणेल पुत्रदात्रीनं फळं बी लेवाले दखस का? मंग राहेल तिले बोलनी, बरं तुना पोऱ्यानी आणेल पुत्रदात्रीनं फळना बदलामा आज रातले तो तुनासंगे झोपी.
16 संध्याकायना येळले याकोब शेतमाईन घर वना तवय लेआ त्यानाजोडे जाईसन त्याले बोलनी, तुमले आज मनाजोडे येणच पडी; कारण मी खरंच तुमले मना पोऱ्यानी आणेल पुत्रदात्रीनं फळंसना बदलामा भाडातीन लियेल शे, तवय त्या रातले तो तिनासंगे झोपना. 17 देवनी लेआ हिनं ऐकं, अनी ती गर्भवती व्हईन याकोबपाईन तिले पाचवा पोऱ्या व्हयना. 18 तवय लेआ बोलनी, मी मनी दासी मना नवराले दिधी म्हणीसन देवनी माले हाई वेतन देल शे; अनी तिनी त्यानं नाव इस्साखार ठेवा. 19 याकोबपाईन लेआ परत गर्भवती व्हयनी तिले सहावा पोऱ्या व्हयना. 20 तवय लेआ बोलनी, देवनी माले उत्तम वरदानतीन संपन्न करेल शे, हाई खेपले मना नवरा मनासंगेच राही, कारण मी त्याना सहा पोऱ्यासले जन्म दियेल शे. म्हणीन तिनी त्यानं नाव जबुलून§ ठेवा. 21 त्यानानंतर तिले एक पोर व्हयनी तिनं नाव तिनी दीना ठेवात.
22 मंग देवनी राहेलनी प्रार्थना ऐकी; अनी त्यानी तिनं ऐकीसन तिनी कूस वाहती करी. 23 ती गर्भवती व्हईन तिले पोऱ्या व्हयना; ती बोलनी, देवनी मनी निंदा व्हवानं दूर करेल शे. 24 अनी तिनी त्यानं नाव योसेफ ठेईसन सांगं, परमेश्वर माले पोऱ्यानी अजून एक जोड देवो.
याकोबनी लाबानसंगे करेल देवान घेवान
25 राहेलले योसेफ व्हयना तवय याकोब लाबानले बोलना, माले निरोप द्या म्हणजे मी स्वदेशी आपला ठिकाणमा जासु. 26 मी ज्यासनाकरता तुमनी सेवा करी त्या मन्या बायका अनं पोऱ्या माले परत द्या म्हणजे मी जास, मी तुमनी सेवा कशी करेल शे हाई तुमले माहित शे. 27 तवय लाबान त्याले बोलना, तुनी मनावर कृपा व्हई तर आठेच मनासंगे राही जाय, तुनामुये परमेश्वरनी माले आशिर्वादित करेल शे, हाई माले समजी जायेल शे. 28 आखो तो बोलना, तुना वेतन काय राही ते माले सांग, ते मी तुले दिसु. 29 याकोब त्याले बोलना, मी तुमनी सेवा कशी करी अनी तुमना जनावरे मनाजोडे कशा व्हतात हाई तुमले चांगलं माहीत शे. 30 मी येवाना पहिले तुमनाजोडे थोडसं व्हतात, आते त्या कितला पट वाढी जायेल शेतस; जठे मना पाय लागना तठे परमेश्वरनी तुमले आशिर्वाद देयल शे. तर आते मी स्वत:ना घरदारना कवय दखु? 31 लाबान त्याले बोलना, मी तुले काय देऊ? याकोब बोलना, माले काहीच देऊ नका? मनी फक्त एकच गोष्ट मान्य करशात तर मी पहिलं सारखा तुमनं कळपले चारसु अनं त्यासना संभाळ करसु. 32 आज मी तुमना सर्वा कळपमा फिरीसन त्यामाईन मेंढरंसमा ठिपकादार, काबऱ्या, अनी काळा रंगना मेंढरं, तसच बकरीसमाईन ठिपकादार, अनं काबऱ्या रंगना बकऱ्या येगळा काढसु; हाईच मना वेतन राही. 33 जर सकाय उठीन तुम्हीन मना वेतनना हिशोब लेवाले वनात तर मनी इमानदारीनी साक्ष तुमले बी पटी; म्हणजे बकरीमाईन ज्या ठिपकादार, अनं काबऱ्या नहीत अनं मेंढरंमाईन ज्या काळा रंगना नहीत अश मनाजोडे निंघनात तर त्या चोरीना शेतस अश समजानं.
34 तवय लाबान बोलना, ठिक शे, तुना सांगाप्रमाणे होऊ दे. 35 तवय त्याच दिनले बांडे अनं ठिपकादार, एडके, थोडसं ढवळा रंगना सर्व ठिपकादार अनं काबऱ्या बकऱ्या, अनी मेंढरासमाईन सगयी काळी मेंढरं या येगळा करीसन लाबाननी आपला पोऱ्यासना हातमा सोपी दिधं. 36 त्यानी आपलामा अनं याकोबमा तीन दिनना अंतर ठेवात; अनी याकोब लाबानना बाकीना उरेल कळप चारत राहिना.
37 मंग याकोबनी लिबने, बदाम, अनी अर्मोन, ह्या झाडासन्या हिरव्या अनं कोवळ्या काठया काढात अनी त्यासन्या मजारन्या सालना ढवळा आंग उघडी करात. 38 त्या सोलेल काठया त्यानी त्या बकऱ्यासना समोर त्यासना पाणी पिवाना नालामा अनं कुंडामा ठेवात; अनी जवय त्या पाणी पिवाले जायेत तवय गाभन व्हई जायेत. 39 त्या छड्यासना समोर बकऱ्या, मेंढ्या गाभन व्हत्यात तिसले बांडी, ठिपकादार, अनं काबऱ्या असा पिल्ला व्हई जायेत.
40 मंग याकोबनी मेंढरूसना पिल्लासले येगळं करं अनी लाबानना कळपमा माधला बांड्या अनं काळ्या मेंढरंकडे कळपनं तोंड करं; त्यानी आपला कळपले येगळं करं, लाबानना कळपमा ठेवं नही. 41 धष्टपुष्ट मेंढ्या गाभन व्हयेत तवय त्यासना नजरसमोर नालामा तो त्या छड्या ठि दे, याकरता की, त्यासनी त्या छडीसना दरम्यानमा गाभन व्हवाले पाहिजे. 42 मेंढ्या कमजोर राहिन्यात म्हणजे त्या छड्या त्यासनासमोर तो ठेय नही, या प्रकारमा दुबळ्या त्या लाबानन्या अनं धष्टपुष्ट त्या याकोबन्या व्हयन्यात. 43 अश रितीतीन तो माणुस खुप संपन्न व्हई गया, अनी पुष्कळ शेरडे, मेंढरं, दास, दासी उंट अनं गाढवी त्यानी मियाडं.
* 30:11 गाद नशीबवान 30:13 आशेर धन्य 30:14 पुत्रदात्रीनं फळं हाई फळ जर बाईनी खादं तर तिले दिवस राहतस § 30:20 जबुलून सन्मान