29
याकोबनी लाबानसंगे भेट
तवय याकोब आपली वाटले लागना अनी पुर्वकडना लोकसना देशमा जाईन पोहचना. तठे त्यानी दखं की, शेतमा एक विहिर शे; अनी तिना जोडे मेंढरंसना तीन कळप बसेल व्हतात; कारण लोके त्या विहिरनं पाणी काढीसन कळपले पाजेत, विहिरनं तोंडनाजोडे एक मोठा धोंडा ठेयेल व्हता. सर्व कळप एकजागेवर गोया व्हवावर विहिरना तोंडवरना धोंडा लोटीसन मेंढरंसले पाणी पाजेत अनी मंग तो परत त्याना जागमा विहिरना तोंडवर ठेई दियेत. याकोब त्यासले बोलना, मना बंधूसवन, तुम्हीन कोठला शेतस? त्या बोलनात, आम्हीन हारान गावना शेतस. मंग तो त्यासले ईचारना, तुम्हीन नाहोरना पोऱ्या लाबानले वळखतच का? त्या बोलनात, हा आम्हीन त्याले वळखतच. तवय त्यानी सांगं, तो बरा शे का? त्या बोलनात, हा बरा शे, अनी ती दख, त्यानी पोर राहेल मेंढरंसले लिसन इकडे ई ऱ्हायनी शे. त्यानी सांगं, दखा, दिन अजून बराच शे, जनावरंसले एकत्र गोया करानी येळ अजून व्हयेल नही, तर मेंढरंसले पाणी पाजा अनी चाराले परत लई जावा. त्या बोलनात, तश आमले करता येस नही; सर्व कळप एकत्र गोया व्हवावर विहिरना तोंडवरना धोंडा लोटतस अनी मंग आम्हीन मेंढरंसले पाणी पाजतस. तो त्यासनासंगे बोली राहिंता तवढामा राहेल आपला बापना मेंढरं लईसन तठे वनी; कारण ती मेंढरंसले चारे. 10 जवय याकोबनी आपला मामा लाबान यानी पोर राहेल अनी आपला मामानं मेंढरंसले दखं, तवय त्यानी जोडे जाईन विहिरना तोंडवरना धोंडा लोटीसन आपला मामा लाबान याना मेंढरंसले पाणी पाजा. 11 मंग याकोब राहेलना मुका लिसन जोरजोरमा रडना. 12 याकोबनी राहेल ले सांगं, मी तुना बापना नातेवाईक, रिबकाना पोऱ्या शे; तवय ती पयत जाईसन आपला बापले हाई माहिती सांगी.
13 मंग अश व्हयनं की, लाबाननी आपला भाचा याकोब यानी खबर ऐकताच तो त्याले भेटाले धावत गया, अनी त्याले मिठ्ठी मारीसंन त्याना मुका लिधात; अनी त्याले आपला घर ली वना, तवय याकोबनी लाबानले सर्व हकीकत सांगी दखाडी. 14 तवय लाबान त्याले बोलना, हा तू खरोखर मना हाडमासना शे, याकोब त्यानाजोडे महिनाभर राहिना.
याकोब राहेल अनी लाबानकरता सेवा करसं
15 तवय लाबान याकोबले बोलना, "तू मना नातेवाईक म्हणीसनं फुकट मनी सेवा करानी का? तुनी मजुरी काय राही हाई माले सांग." 16 लाबानले दोन पोरी व्हत्यात, मोठी पोरनं नाव लेआ अनी धाकली पोरनं नाव राहेल. 17 लेआनं डोळा निस्तेज व्हतात, पण राहेल दिसाले सुरेख अनी देखणी व्हती. 18 याकोबनं राहेलवर प्रेम व्हतं म्हणीसनं तो बोलना, आपली धाकली पोर राहेल हिनाकरता मी सात वरीस तुमनी सेवा करसु. 19 त्यानावर लाबान त्याले बोलना बरं ठिक शे, परका माणुसले देवापेक्षा हाई उत्तम शे, त्याकरता तु मनाजोडे राहाय. 20 तवय याकोबनी राहेल करता सात वरीस सेवा करी; अनी राहेलवर प्रेमना कारण त्याले ती सात वरीस फक्त थोडाच दिनसारखा वाटनात. 21 मंग याकोब लाबानले बोलना, आते मनी सात वरीसनी सेवा पुरी व्हयेल शे, आते माले मनी बायको वापस द्या म्हणजे मी तिनाजोडे जासु. 22 तवय लाबाननी तठला सर्वा लोकसले एकत्र गोया करीसन मेजवाणी दिधी. 23 संध्याकायले अश व्हयनं की, त्यानी आपली पोर लेआ हिले याकोबना जोडे आणं, अनी तो तिनाजोडे गया. 24 लाबाननी आपली दासी जिल्पा, हिले आपली पोर लेआले दिधी, यानाकरता की, ती तिनी दासी व्हवाले पाहिजे. 25 सकाळ व्हयनी तवय याकोबनी दखं, की, हाई ते लेआ शे, तवय त्यानी लाबानले ईचारं, तू मनासंगे हाई काय करं? मी राहेलनाकरता तुमनी सेवा करी नही का? तरी तुम्हीन माले का बरं फसाड? 26 तवय लाबान त्याले बोलना, मोठी पोरना पहिले धाकली पोरना लगीन करानं हाई आमनाकडे रित नही शे. 27 हाऊ सप्ता पुरा व्होऊ दे, मंग आम्हीन ती पण तुले दिसुत, त्यानाबद्दल तुले अजून सात वरीस मनी सेवा करना पडी. 28 याकोबनी अश करीसन त्याना सप्ता पुरं करा, तवय लाबाननी आपली पोर राहेल याकोबले बायको करी दिधी. 29 लाबाननी आपली दासी बिल्हा हिले आपली पोर राहेल करता दासी म्हणीन दिधी. 30 तवय याकोब राहेलना जोडे बी गया; पण लेआ पेक्षा राहेलवर त्यानं जास्त प्रिती व्हती म्हणीन तो लाबानजोडे अजून सात वरीस राहिन त्यानी सेवा करी.
याकोबना कुटूंब
31 मंग परमेश्वरनी दखं की, लेआ नावडती शे; म्हणीसनं त्यानी तिनी कूस वाहती करी अनी राहेल वांझ राहिनी. 32 लेआ गर्भवती व्हईन तिले पोऱ्या व्हयना, त्यानं नाव तिनी रऊबेन ठेवं; ती बोलनी, परमेश्वरनी मना दु:खकडे नजर करेल शे, आते मना नवरा मनावर प्रिती करी. 33 ती परत गर्भवती व्हईसन तिले पोऱ्या व्हयना, तवय ती बोलनी मी नापसंत शे हाई देवनी ऐकेल शे, म्हणीन त्यानी माले हाऊ एक पोऱ्या दियेल शे; तिनी त्यानं नाव शिमोन ठेवं. 34 ती परत गर्भवती व्हईन तिले पोऱ्या व्हयना; तवय ती बोलनी, आते माले तीन पोऱ्या व्हयेल शेतस, आते तरी मना नवरा मनासंगे जडी राही; म्हणीसनं तिनी त्या पोऱ्यानं नाव लेवी ठेवं. 35 ती आखो गर्भवती व्हईन तिले पोऱ्या व्हयना; ती बोलनी मी आते परमेश्वरनी आराधना करसु; यानावरीन तिनी त्यानं नाव यहूदा ठेवं; मंग पुढे तिले पोऱ्या व्हवानं थांबनं.