32
याकोब एसावले भेटानी तयारी करस
इकडे याकोब आपला वाट धरीसनं जाई राहिंता तवय देवदूत त्याले भेटनात. त्यासले दखीसनं याकोब बोलना, हाई देवना सैन्य शे, म्हणीन त्या ठिकानना नाव त्यानी महनाइम* ठेवात.
मंग याकोबनी सेईर देशमा म्हणजे अदोम प्रांतमा आपला भाऊ एसाव यानाकडे आपला पहिले संदेशवाहकसले धाडं. त्यानी त्यासले आज्ञा दिधी की, मना बंधू एसाव याले जाईसन सांगा की, आपला सेवक याकोब म्हणस, लाबाननाजोडे प्रवासी व्हईसन आजपावत ऱ्हायनु. तर आते मनी गुरं, गाढवं, शेरडंमेंढरंसना कळप, दास अनं दासी शेतस; मना बंधूनी मनावर कृपा व्हवाले पाहिजे म्हणीन हाऊ निरोप मी धाडी राहिनू शे. संदेशवाहकसनी परत ईसन याकोबले सांगं, “आम्हीन आपला बंधू एसाव याले जाईन भेटनुत; तो आपलाले भेटाले ई राहिना शे, त्यानासोबत चारशे माणसे शेतस.” तवय याकोब भलताच घाबरना अनी चिंतामा पडना अनी आपलासोबतना माणसे, शेरडंमेंढरं गुरं अनं उंट यासन्या त्यानी दोन टोळ्या करात. तो बोलना, “एसावनी ईसन एक टोळीना नाश करा तर दुसरी टोळी पळीसन वाची जाई.”
मंग याकोब बोलना, हे परमेश्वरा, मना बाप अब्राहाम अनं इसहाक यासना देव, तू माले सांगस की, तू आपला देशले आपला भाऊबंदसमा परत जाय; मी तुना कल्याण करसु. 10 तू करूणा अनं सत्यता दखाडीसन आपला दासकरता जे काही करेल शे, त्याले मी पात्र नही; मी फक्त मनी काठी लिसन हाई यार्देन नदी उतरी जायेल व्हतु, अनी आते मनाजोडे दोन टोळ्या व्हई जायेल शेतस. 11 मी प्रार्थना करस की, माले मना भाऊ एसावना हाततीन सोडाव; कारण माले त्यानी भिती वाटस, अस नको व्हवाले की तो ईसन मनावर हमला करी, अनी पोऱ्यासले बी मायनासोबत मारी टाकी. 12 तू माले वचन देयल शे की, मी तुना खरंच कल्याण करसु, अनी तुनी संतती समुद्रना वाळूना कणनामायक वाढावसु ज्यासनी मोजनी करता येस नही.
13 ती रातले तो तठेच राहिना; अनी आपलाजोडे जे व्हतं त्यामाईन त्यानी आपला भाऊ एसाव यानाकरता भेट तयार करी. 14 दोनशे बकऱ्या अनं वीस बोकडं, दोनशे मेंढ्या अनं तीस एडका, 15 तीस दूध देनारी उंटनी अनी त्यासना पिल्ला, चाळीस गायी अनं दहा बैल, वीस गाढवी अनं दहा शिंगरं. 16 या सगयासना त्यानी येगयेगळा कळप करात, अनी आपला चाकरासना स्वाधीन करीसन त्यासले सांगं, तुम्हीन कळपा कळपामा अंतर ठेईसन मनापुढे चाला. 17 त्यानी सर्वासना पुढला चाकरले सांगं की, तुले मना भाऊ एसाव भेटना अनं ईचारना की, तू कोना दास शे? कोठे जाई राहिना? अनी हाई तू लई जाई राहिना शे ह्या जनावरं कोणा शेतस? 18 तवय त्याले सांग की, आपला सेवक याकोब याना ह्या शेतस; त्यानी ह्या आपला बंधू एसाव याले भेट म्हणीसनं धाडेल शे; अनी दखा, तो बी आमना मांगे मांगे ई ऱ्हाईना शे. 19 मंग त्यानी दुसराले तिसराले अनी बाकीना कळप हाकलनारासले तसंच आज्ञा दिसन बोलना की, जर तुमले एसाव भेटना तर अशच बोलानं. 20 अनी सांगा, दखा, तुमना दास याकोब बी आमनामांगेन ई ऱ्हायना शे, याकोबले वाटनं की, पुढं भेट धाडीन त्याले शांत करा अनी मांगेतीन त्याना दर्शन लिधा तर तो आपलावर संतुष्ट व्हई. 21 अस त्यानी ती भेट पुढं गयी अनं तो ती रातले तंबू करीसन राहिना.
पनिएल आठे याकोबनी करेल झुंज
22 मंग तो रातलेच उठीन आपला दोन्ही बायका, दोन्ही दासी अनी अकरा पोऱ्या यासले लिसन यब्बोक नदीना उतारतीन पार गया. 23 त्यानी त्यासले नदीना पलीकडे उतारी दिधं, अनी आपला सर्व काही तिकडे धाडी दिधं. 24 याकोब एकलाच मांगे राहिना, तवय एक माणुस ईसन त्यानासंगे पहाट व्हस तोपावत कुस्ती खेळना. 25 याकोबवर मी यशस्वी व्हवावु नही हाई दखीसन त्यानी त्याना जांघले स्पर्श करा म्हणीन याकोबनी जांघनी जागा कुस्ती कराना येळले सुजनी. 26 तवय तो बोलना, “पहाट व्हई राहिनी माले जाऊ दे,” पण याकोब बोलना, “जोपावत तू माले आशिर्वाद देस नही तोपावत मी तुले जाऊ देवावू नही.” 27 तवय त्यानी ईचारं, "तुना नाव काय शे?" तो बोलना, "याकोब" 28 तवय त्यानी सांगं, "आतेपाईन तुले याकोब म्हणावुत नहीत, तर इस्त्राएल म्हणतीन, कारण तू देवनासंगे अनी मनुष्यनासंगे लढीसन यशस्वी व्हयेल शे." 29 तवय याकोबनी त्याले सांगं, "कृपा करीसन माले तुनं नाव सांग" पण तो बोलना, "मनं नाव काबंर ईचारस?" मंग त्यानी त्याले तठेच आशिर्वाद दिधा. 30 मंग याकोबनी त्या ठिकाणनं नाव पनिएल अस ठेवं, कारण तो बोलना, मी देवना मुख प्रत्यक्ष दखीसन बी मना जीव वाची जायेल शे. 31 तो पनिएल सोडीन जाई राहिंता तवय सकाळ व्हयनी; अनी आपली मांडीमुये लंगडा व्हईन चाली राहिंता. 32 म्हणीन §इस्त्राएल लोक जनावरंसना जांघना स्नायू आजपावत खातस नही; यानं कारण हाईच शे की, त्यानी याकोबना जांघना स्नायूले स्पर्श करा.
* 32:2 महनाइम दोन सैनिक 32:12 उत्पती 22:17 32:28 उत्पती 35:10 32:28 याकोब देवसंगे लढनारा 32:29 शास्ते 13:17-18 32:30 पनिएल देवनं मुख § 32:32 याकोबना लोके